जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
जात वैधता प्रमाणपत्रासाठी (Caste Validity Certificate) निर्गमित करण्याची प्रक्रिया 01 ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन झाली आहे. या लेखात आपण जात वैधता प्रमाणपत्राकरिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते सविस्तर जाणून घेणार आहोत.
जात वैधता प्रमाणपत्र विविध प्रकारच्या राखीव जागांसाठी म्हणजेच शिक्षण(Education), निवडणूक(Election), सेवा( Service) आणि इतर( Other) साठी अर्ज केला जातो. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी, जातीच्या दाखल्याबरोबरच जात वैधता प्रमाणपत्राची मागणी विविध शैक्षणिक संस्थांकडून करण्यात येत आहे.
त्या अनुरोधाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून, त्यांनी जातीचा दाखला प्राप्त झाल्याबरोबर जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) प्राप्त करुन घेण्यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया – Caste Validity Certificate:
जात वैधता प्रमाणपत्राकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी https://bartievalidity.maharashtra.gov.in/index.php हि वेबसाईट ओपन करायची आहे.
आता नवीन युजर नोंदणीसाठी (New User ? Register Here) वर क्लिक करून नोंदणी करा

आता इथे खालील चित्रामध्ये जसा तपशील दिला आहे तसा भरा आणि नोंदणी करा.

मोबाईल नंबर टाकल्यावर ओटीपी येईल तो तिथे टाका आणि एक मेल आयडी वर मेल येईल तो व्हेरिफाय करा. त्यानंतर युजर नेम म्हणजेच मेल आयडी आणि पासवर्ड मोबाईल नंबर वर मॅसेज येईल तो घेऊन लॉगिन करा. आता Terms and Conditions चे पेज येईल ते वाचून I agree वर क्लिक करून Proceed वर क्लिक करा
अर्जाचा प्रकार: (Type of Application) :
- शिक्षण(Education)
- निवडणूक(Election)
- सेवा( Service)
- इतर( Other)
अर्जाचा प्रकार निवडून आवश्यक तपशील भरा आणि Submit बटन वर क्लिक करा.

नंतर Applicant Information विंडो ओपन होईल त्यामध्ये अर्जदाराची माहिती भरा.

सक्षम प्राधिकरणाकडून जातीचे प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या कागदपत्राचे नाव:
- अर्जदार शाळा एलसी / टीसी
- फादर स्कूल एलसी / टीसी
- ग्रँड फादर स्कूल एलसी / टीसी
- जुने 7/12
- 8 अ
- स्वत: ची घोषणा
- प्रतिज्ञापत्र
- वडिलांचे जात प्रमाणपत्र
- आजोबांचे जातीचे प्रमाणपत्र
- बोनाफाईड प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- रक्ताच्या नात्यात जातीचे वैधता प्रमाणपत्र
- कोतवाल पुस्तकाची प्रत
- सेवा पुस्तकाची प्रत
- अर्जदाराचा फोटो आयडी
अर्जदाराची सर्व माहिती भरून पत्ता, कुटूंबाची माहिती, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा.
पुढील लेख देखील वाचा!
- जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !
- जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार! जात वैधता ऑफलाइन अर्ज PDF फाईल.
- जातीचे व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी!
- मंडणगड पॅटर्न शालेय स्तरावर मिळणार जात प्रमाणपत्र ! – Mandangad Pattern Caste Certificate
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!