Home Guard Bharti : होमगार्ड भरती 2024; ऑनलाईन अर्ज करा !
शासन संचलित होमगार्ड संघटनेच्या मानसेवी तत्वावर होमगार्डची भरती करण्यात येत आहे. होमगार्ड संघटनेचे सदस्यत्व तीन वर्षांकरिता दिले जात असून दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन वर्षांच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पूर्ण नोंदणीकृत करता येते. सध्या होमगार्ड नोंदणीसाठी 2 ते 14 ऑगस्ट 2024 कालावधीमध्ये ऑनलाईन अर्जप्रक्रिया राबविण्यात येत आहे.
होमगार्ड नोंदणीसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसून होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणीनुसार, आपत्कालीन परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था परिस्थितीमध्ये कर्तव्य दिली जातात. बंदोबस्त काळात कर्तव्य भत्ता प्रतिदीन 570 व उपहार भत्ता 100 रूपये दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात खिसा भत्ता 35, भोजनभत्ता 100 व साप्ताहिक कवायतीसाठी 90 रूपये कवायत भत्ता देण्यात येतो. होमगार्ड सदस्यत्व घेतलेल्या सदस्यांना विनामूल्य सैनिकी, अग्नीशमन, प्रथमोपचार प्रशिक्षण, गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार व पदके, तीन वर्ष सेवा पूर्ण झालेल्या होमगार्डना राज्य पोलीस दल, वन, अग्नीशमन दलामध्ये 5 टक्के आरक्षण, स्वत: चा व्यवसाय सांभाळत देशसेवा करण्याची संधी मिळते.
होमगार्डसाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी इयत्ता 10 वी उत्तीर्ण असून वय 20 ते 50 वर्षांच्या आत असावे. शारिरीक पात्रतेसाठी उंची पुरूषांकरीता 162 से.मी, महिलांकरीता 150 से.मी आणि छाती पुरूषांकरीता न फुगविता किमान 76 से.मी व फुगवून 81 से.मी असावी. शारिरीक क्षमतेसाठी पुरूष उमेदवारांकरीता 1600 मीटर धावणे, महिलांकरीता 800 मीटर धावणे, गोळाफेक चाचणी घेण्यात येणार आहे, असे समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई यांनी प्रसिद्ध पत्रकान्वये कळविले आहे.
होमगार्ड भरती 2024 – Home Guard Bharti :
एकूण : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | होमगार्ड | — |
एकूण | — |
शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
उंची | छाती | धावणे | |
पुरुष | 162 से.मी. | 76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त | 1600 मीटर |
महिला | 150 से.मी. | — | 800 मीटर |
वयाची अट: 20 ते 50 वर्षे.
फी : फी नाही.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2024
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – IOCL Bharti : इंडियन ऑइल मध्ये 467 जागांसाठी भरती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!