उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त सूचना – Health Tips
आपण या लेखात उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त सूचना (Health Tips) विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत, यामध्ये आरोग्य म्हणजे काय? उत्तम आरोग्यासाठी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे याची सविस्तर माहिती पाहूया.
आरोग्य म्हणजे काय?
आरोग्य हि संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते. आरोग्य म्हणजे स्थूल मानाने शारीरिक, मानसिक, सामाजिक, संतुलनाची स्थिती होय. आरोग्यास असंतुलन निर्माण झाल्यास रोग जडतात.
जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसिक, दृष्ट्या सक्षम असते, ती आरोग्यसंपन्न मानली जाते. म्हणून कार्यात्मक योग्यता हा स्वास्थ्याचा मुख्य निकष आहे.
उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त सूचना – Health Tips :
१. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे १०.०० ला झोपणे.
२. सकाळी ५.०० -५.३० किंवा त्याच्या आत उठणे.
३. ब्रश करायच्या आधी एक ग्लास गरम पाणी लिंबू पिळून पिणे.
४. १० मिनिटे वज्रासन करणे.
५. कमीत कमी १० सूर्यनमस्कार घालणे.
६. फक्त १० मिनिटे प्राणायाम व कमीतकमी ५ मिनिटे ओंकार करणे
७. रोज न चुकता एक आवळा खाणे किंवा आवळ्याचा रस पिणे.
८. ८.३०-९.०० वाजता भरपूर नाष्टा (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)
९. १२.३० ला थोडे हलके जेवण.
१०. ऑफिस मधेच दर १ तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.
११. संध्याकाळी ७ – ७.३० ला एकदम कमी जेवण.
१२. कंपल्सरी १५ मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.
१३. १०.०० वाजता १ ग्लास गरम पाणी पिणे आणि १०.०० ला झोप.
उत्तम आरोग्यासाठी खालील काळजी घेणं गरजेचं:
१. आहार :
दैनंदिन जेवणात स्निग्ध पदार्थ, खनिज या घटक तत्त्वांनी युक्त सकस आणि संतुलित ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास आरोग्य चांगले राहते. तुमचा आहार जेवढा चांगला तेवढं तुमचं आरोग्य उत्तम राहणास मदत होते. रात्रीच्या जेवणानंतर चालायला जाणे टाळावे, किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात. म्हणजे शंभर पावले चालणे होय.
२. पाणी:
जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवणानंतर एक तासाने पाणी पिणे, पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये. रोज कमीत कमी ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.
३. स्वच्छता:
आहार घेतांना स्वच्छता बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. जेवण बनवतांना स्वच्छतेला अधिक प्राधान्य द्यावे. स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. अस्वच्छतेमधून मलेरिया, गॅस्ट्रो यासारखे हानिकारक रोग उदभवतात. वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.
४. व्यायाम:
नियमित व्यायाम हा चांगल्या आरोग्याचा दुसरा मंत्र आहे. व्यायाम केल्याने आरोग्याचा दर्जा वाढतो. नियमित व्यायाम केल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
५. विश्रांती:
विश्रांती तेवढीच महत्त्वाची आहे. आरोग्य आणि विश्रांती या दोघांचा सहसंबंध आहे. योग्यवेळी विश्रांती घेतल्याने तुम्ही उत्साही राहता. नियमित झोप ही तेवढीच महत्त्वाची आहे. शरीर जेव्हा थकते त्यावेळी योग्य विश्रांती घेणं गरजेचं आहे.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.