शासकीय कामे होत नसतील तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची? जाणून घ्या सविस्तर – (आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली) Grievances Maharashtra
शासकीय कामे जर होत नसतील तर त्याची तक्रार कोठे करायची याची सविस्तर माहिती आपण येथे घेणार आहोत. या तक्रारीदवारे शासकीय अधिकाऱ्यांना त्या तक्रारींचे निवारण करावेच लागते, व केलेल्या तक्रारीचा अहवालाची प्रत तुम्हाला पाठवावी लागते. आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली मुख्यमंत्री यांच्या देखरेखीखाली काम करते.
“आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली” शासन निर्णय:
तक्रार निवारण प्रणालीच्या कार्यपध्दतीचा विस्तृत शासन निर्णय बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
1. शासन निर्णय-1
2. शासन निर्णय-2
तक्रार दाखल करण्यापूर्वी हे अवश्य वाचा:
तक्रारींचे वेळेत आणि प्रभावी निराकरण होण्यासाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून खबरदारी घ्या. जिल्हा स्तरापर्यंतच्या कार्यालयांशी संबधित तक्रारी “जिल्हा पातळीवर” तर धोरणात्मक बाबींशी संबधित तक्रारी “मंत्रालय पातळीवर” दाखल करा.
http://14.143.90.243/aaplesarkarv2/uploads/files/Precaution_Marathi.pdf
शासकीय कामे होत नसतील तर आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची?
मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. ऑनलाईन तक्रार करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गूगल प्ले स्टोअर वरून “आपले सरकार” अँप इन्स्टॉल करा किंवा गूगल क्रोम वरून “आपले सरकार” ची खालील वेबसाईट ओपन करा
आपले सरकार वेबसाईट:
https://aaplesarkar.maharashtra.gov.in
आपले सरकार मोबाईल अँप:
वेबसाईट किंवा अँप ओपन झाल्यावर मराठी भाषा निवडा. मी इथे वरील आपले सरकारची वेबसाईट ओपन करणार आहे.
वेबसाईट ओपन झाल्यावर, पुढे तक्रार निवारण, माहितीचा अधिकार, माझे सरकार ,महा योजना असे ऑपशन दिसतील त्यापैकी तक्रार निवारण या पर्यायावर क्लिक करा.

तक्रार निवारण या पर्यायावर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र शासनाची तक्रार निवारण प्रणाली ओपन होईल त्यामध्ये “तक्रार दाखल करा” या पर्यायावर क्लिक करा

आता नागरिक लॉगिन मध्ये मोबाईल क्रमांक व इ-मेल टाईप करून Verify (सत्यापित) करा आणि तक्रार निवारण प्रणाली मध्ये लॉग-इन करा. कृपया तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर/ई मेल आयडी वर प्राप्त झालेल्या वन टाईम पासवर्डची (ओटीपी) नोंद करा.

तक्रार दाखल करा: पुढे तक्रार दाखल करा असा ऑपशन येईल त्यावरती क्लिक करा.
नावाची नोंद करा: इथे तुमचे नाव लिहा.
प्रशासन स्तर: त्यानंतर तुम्हाला दोन ऑपशन दिसतील एक म्हणजे जिल्हा स्तरावरील तक्रार व दुसरी मंत्रालय स्तरावरील तक्रार. आपल्याला कोणत्या स्तरावरील तक्रार करायची आहे तिथे क्लिक करू शकता. जर आपण जिल्हा स्तरावरील तक्रार या ऑपशन वर क्लिक केलं तर खाली तुमचा जिल्हा निवडायचा आहे व तालुक्याचे नाव निवडायचे आहे.
प्रशासनाचा प्रकार: प्रशासनाचा प्रकार निवडायचा आहे.
तुमची तक्रार: तक्रारींचे स्वरूप निवडून नंतर तक्रारीचा मजकूर टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाका आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे. सबमिट झाल्यावर तुमची तक्रार सेव्ह झाल्याचा आपल्याला एक टोकन मॅसेज येतो.
तक्रारीची स्थिती:
आपल्या तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करून तक्रार यादीतून तक्रार निवडा किंवा टोकन नंबर नोंदवा.
https://grievances.maharashtra.gov.in/mr/pg-portal-grievance/track-grievance-verification
प्रलंबित तक्रारींबाबत:
आपली तक्रार २१ दिवसांमध्ये निकाली न निघाल्यास शासन निर्णय क्र. संकीर्ण -२०१६ दि २४ ऑगस्ट २०१६ मधील भाग- ब, अनु. क्र. ६ नुसार आपण संबधित नोडल अधिकाऱ्यांना विचारणा करू शकता. संपर्क क्रमांकासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://grievances.maharashtra.gov.in/mr/officer-contact
तांत्रिक सहाय्य:
तक्रार दाखल करताना काही तांत्रिक अडचणी उदभवल्यास कॉलसेंटर/हेल्पलाईनवर संपर्क साधा. 1800 120 8040.
मोबाईल अँप्लिकेशन वापरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी:
मोबाईल अप्लिकेशन वापरताना तांत्रिक अडचणी आल्यास मदतीसाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.
http://14.143.90.243/aaplesarkarv2/uploads/files/MobileApp_issues_Marathi.pdf
हेही वाचा – माहिती अधिकाराचा अर्ज ऑनलाईन मोबाईलद्वारे कसा करायचा ? जाणून घ्या सविस्तर
मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
सर,मी आपले सरकार पोर्टलवर वित्त विभागाकड़े तक्रार दाखल केली आहे दोन महिने पुर्ण झालेत पण कांहीच प्रतिसाद दिलेला नाही.त्यानंतर मी संबंधीत नोडल ऑफिसर वित्त,लेखा व कोषागारे यांचेकडे मेल करुन वेतन निश्चितीचे काम झाले नसलेबाबत कळविले आहे त्यांचेकडुनही प्रतिसाद मिळालेला नाही तरी शासन धोरणाप्रमाणे कामे वेळेत व्हावीत अशी अपेक्षा व विनंती आहे आप्पासाहेब भोसले से.निवृत्त उप विभागीय अधिकारी , 9422270781
मित्रा , आपले सरकार आणि नगरपालिका या मध्ये तक्रार केली तर कोणीच लक्ष देत नाहीत आणि तक्रारीचा निवारण होत नाहीत मी पण थकलो तक्रार करून.
सर नमस्ते मी बर्याच ग्रामपंचायती च्या गैरव्यव्हार पुराव्यानिशी तक्रार आपले सरकारवर केलेत परंतु आधिकारी तान न घेता आर्जदारा समक्ष पहानी न करता तक्रारी निकाली काडतात या वर वरीष्ठांनी कार्यवाही केली पाहीजे
सर नमस्कार. सर मी आपले सरकार पोर्टल वर दोनदा तक्रार दाखल केले होते. तक्रार आयडी नंबर.Dist/C L TH/2018/5031.Dist/PLTH/2018/2978.सदर उल्हासनगर ०३ चोपडा कोर्ट केस नंबर आर सी सी १०००४७७(४७७) मधील पोलिस रिपोट जावक नंबर मधील पाहिजे आरोपी बाबत तक्रार केले होते. मात्र मला सुचना पत्र देण्यात आले की अभिलेख तपासणीत तुमचे कोर्ट नंबर ४४७ प्रमाणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व कर्मचारी यांना आदेश देण्यात आले आहे. सदर कोर्टात पोलिसांनी पाहिजे आरोपी बाबत विनंती केले आणि ऑनलाइन तक्रारीत आदेश देण्यात आले मात्र आजतागायत पाहिजे आरोपी हे अटक आरोपींना माहिती असून पोलिसांना अपयश येते आहे.
सर मी संजय गांधी निराधार योजना मध्ये दि ३ ऑगस्ट २०२३ कलेक्टर ऑफिस छत्रपती संभाजी नगर / औरंगाबाद महाराष्ट्र येथे अर्ज दाखल केला होता अद्याप त्यावर काय कारवाई झाली काही माहिती नाही
मला संजय गांधी निराधार योजना पात्र लाभार्थी यादी कोठे बघायला मिळेल