कृषी योजनावृत्त विशेष

अन्न व पोषण सुरक्षा अभियानात विविध बाबींसाठी अनुदान

राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान, तसेच कडधान्य व खाद्यतेल अभियान (गळितधान्य) योजनेतील विविध लाभांसाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, गट यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीज प्रक्रिया संच:

राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान कडधान्य योजनेत शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीजप्रक्रिया प्रकल्पाचा लाभ घेता येतो. उत्पादित बियाण्यावर प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे उत्पादन करणारे शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीज प्रकिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी यंत्रसामुग्री, तसेच बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 10 लक्ष रू. पर्यंत अनुदान मिळते. त्यासाठी शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीला बँकेकडे कर्जासाठी प्रकल्प प्रस्ताव द्यावा लागतो. बँकेने कर्ज मंजूर केल्यावर ते अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी पात्र होतात.

गोदाम सुविधा:

अन्नधान्य उत्पादनाच्या सुधारित साठवणुकीसाठी व मूल्यवृद्धीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे. योजनेत 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लक्ष 50 हजार यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान मिळते. इच्छूक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना किंवा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार पात्र ठरेल.

बीज प्रक्रिया संच व गोदाम सुविधेसाठी जुलैच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा. जिल्ह्यासाठी प्राप्त लक्ष्यांकापेक्षा अधिक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीचे अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समितीच्या मान्यतेने सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होते.

मनुष्यचलित बीजप्रक्रिया यंत्र:

वैयक्तिक शेतकरी व शेतकरी गटामार्फत बीजप्रक्रिया यंत्र अनुदानावर देण्यात येते. या मनुष्यचलित ड्रम किंवा यंत्राच्या खरेदीसाठी किमतीच्या 50 टक्के किंवा प्रतियुनिट कमाल 8 हजार रू. अनुदान मिळते. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी व शेतकरी गटांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

सिंचन साधने व सुविधा:

सिंचन साधने व सुविधांसाठी एचडीपीई पाईप किमतीच्या 50 टक्के किंवा 50 रू. प्रति मीटर मर्यादेत, तसेच पीव्हीसी पाईप किमतीच्या 50 टक्के 35 रू. प्रतिमीटर मर्यादेत, एचडीपीई लॅमिनेटेड वूव्हन ले फ्लॅट ट्युब किमतीच्या 50 टक्के 20 रू. प्रति मी. मर्यादेत, खरेदीसाठी एका शेतक-याला 15 हजार रू. मर्यादेत अनुदान मिळते. त्याचप्रमाणे, अल्प व अत्यल्प भूधारक, अनुसूचित जाती, जमाती, महिला आदी लाभार्थ्यांना विजेचा पंप संच, डिझेल पंप यासाठी किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 10 हजार रू. प्रति पंप संच याप्रमाणे, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला किमतीच्या 40 टक्के किंवा कमाल 8 हजार रू. प्रति पंप संच अनुदान मिळते. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज आवश्यक.

ग्राइंडर, पल्व्हरायझर, पॉलिशर:

अन्नधान्यासाठी ग्राइंडर, पल्व्हरायझर, पॉलिशर यासाठी अनु. जाती, जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक यांना किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 60 हजार रू. प्रति नग, तसेच सर्वसाधारण गटातील लाभार्थ्याला किमतीच्या 40 टक्के किंवा कमाल 50 हजार रू. प्रतिनग अनुदान. महाडीबीटीवर अर्ज आवश्यक.

मनुष्यचलित टोकन यंत्र:

गळितधान्य पीकाच्या पेरणीत सुलभता आणण्यासाठी व बियाण्याची बचत करण्याच्या हेतूने मनुष्यचलित टोकन यंत्र व मनुष्यचलित सायकलवर चालणारे सीड ड्रील याचाही अभियानात समावेश आहे. यासाठी अनुदान गटामार्फत किंवा वैयक्तिकही मिळते. मनुष्यचलित टोकन यंत्र खरेदीसाठी 10 हजार रू. प्रतियंत्र व मनुष्यचलित सायकलवर चालणारे सीड ड्रील खरेदीसाठी 5 हजार रू. प्रतियंत्र किंवा किमतीच्या 50 टक्के यात जे कमी असेल त्यानुसार अनुदान मिळते. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो.

छोटे तेलघाणी सयंत्र:

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानात (गळितधान्य) उत्पादित मालाच्या मूल्यवृद्धीसाठी छोटे तेलघाणी सयंत्रासाठी अनुदान मिळते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक व महिला शेतक-यांसाठी किमतीच्या 60 टक्के किंवा कमाल 1 लाख 80 हजार रू. आणि इतर शेतक-यांना किमतीच्या 50 टक्के किंवा 1 लाख 50 हजार रू. अनुदान मिळते. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार लुधियाना येथील सीआयपीएचईटी व तत्सम केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या मिनी ऑईल मिल, तेलघाणी मॉडेलला अनुदान अनुज्ञेय आहे. त्यासाठी महाडीबीटीवर अर्ज करणे आवश्यक आहे.

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.