ग्रामपंचायत गैरव्यवहारात थेट फौजदारी गुन्हे दाखल करा!
आपण या लेखात ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचारी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि कर्मचारी यांच्यावर फौजदारी (Grampanchayat Gairvyavhar Thet Faujdari Gunhe) खटले कसे दाखल होणार? प्र.क्र.253/ पंरा-३ परिपत्रक मध्ये काय आहे ते सविस्तर पाहूया.
ग्रामपंचायत गैरव्यवहारात थेट फौजदारी गुन्हे दाखल करा – Grampanchayat Gairvyavhar Thet Faujdari Gunhe:
ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध थेट (Grampanchayat Gairvyavhar Thet Faujdari Gunhe) फौजदारी कारवाई करा, असा अध्यादेश ग्रामविकास खात्याने काढला आहे. ग्रामपंचायतीमध्ये विविध योजना राबविल्या जातात. अनेक योजनांमध्ये आर्थिक गैरव्यवहार घडल्याची प्रकरणे दररोज आपल्यासमोर येतात. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी (Grampanchayat Gairvyavhar Thet Faujdari Gunhe) कारवाई करा, असा अध्यादेश ग्रामविकास खात्याने काढला आहे.
ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता अथवा ग्रामपंचायत मालमत्तेचा अथवा निधीचा अपहार करणे तसेच ग्रामपंचायतीतील मूळ दस्तऐवजामध्ये खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे हा गुन्हा असल्याने या गुन्ह्यास जबाबदार असणाऱ्या संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सचिव, ग्रामसचिव, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याविरुद्ध फौजदारी (Grampanchayat Gairvyavhar Thet Faujdari Gunhe) गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा यासाठी राज्य सरकारने परिपत्रक (जीआर) काढला आहे.
पहिली तक्रार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे करा:
ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि इतर कर्मचाऱ्याचा भ्रष्टाचार पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून द्यावा.
पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी त्यावर त्याची प्राथमिक चौकशी महिन्याभरात करतील, तसेच चौकशी अंती कर्मचारी दोषी आढळ्यास फौजदारी (Grampanchayat Gairvyavhar Thet Faujdari Gunhe) गुन्हा दाखल करणार.
दुसरी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे करा:
संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने जर एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण पूर्ण केली नाही किंवा चैकशी करण्यास टाळाटाळ केली तर संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्यावर नियमानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार करावी.
शासन परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
खालील लेख देखील वाचा !
- भ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा!
- ग्रामपंचायतीचे काम कसे चालते? सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मानधन किती? ग्रामस्थ म्हणून गावच्या विकास कामात कसं सहभागी व्हायचं आणि विकासकामांवर लक्ष कसे ठेवायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- आपल्या गावासाठी सरकारने दिलेला निधी ग्रामपंचायतीने कुठे खर्च केला? ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर लक्ष कसं ठेवायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच व उप-सरपंच अविश्वास ठराव!
- सरपंच किंवा उप-सरपंच मरण पावल्यामुळे, त्याने राजीनामा दिल्यामुळे, अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यामुळे रिक्त झालेले पद भरणे संदर्भात सविस्तर माहिती!
- ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य निरर्हता/अपात्र नियम विषयीची संपूर्ण माहिती!
- ग्रामपंचायत सरपंच, उप-सरपंचाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य विषयीची सविस्तर माहिती!
- एका ग्रामपंचायतीला दरवर्षी किती निधी मिळतो? सरपंच गावाच्या विकासासाठी किती निधी गावात आणू शकतो? जाणून घ्या सविस्तर माहिती!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!