ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ !
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी राज्यामध्ये करण्यात येत आहे. सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी पंचायतराज संस्थेमार्फत प्राधान्याने करावयाची आहे. क्षेत्रीय पातळीवर ग्रामपंचायतस्तरावर अभिलेख व नोंदवहया ठेवण्याची जबाबदारी ही सरपंच व ग्रामसेवकांची असुन या कामात मदत करण्याची व प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी ही ग्राम रोजगार सेवकांची असल्यामुळे त्यांचे काम हे अर्धवेळ स्वरूपाचे आहे.
ग्रामपंचायतींना या कामांमध्ये मदत करण्यासाठी ग्राम रोजगार सेवकाची उपलब्धता संबंधित ग्रामसभेमार्फत करून घेण्यात आलेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाच्या प्रमाणात ग्राम रोजगार सेवकांना मानधन (Gram Rojgar Sevak Mandhan Vadh) देणे अपेक्षित आहे. तथापि, कमी काम असलेल्या ठिकाणी ग्राम रोजगार सेवकांना अत्यल्प मानधन मिळते या अनुषंगाने ग्रामरोजगार सेवकांकडून वारंवार निवेदने पाठपुरावा देखील करण्यात आलेला आहे. त्यांना समाधानकारक नियमित मानधन (Gram Rojgar Sevak Mandhan Vadh) मिळण्यासाठी प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन होता.
ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ ! Gram Rojgar Sevak Mandhan Vadh:
नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक क्र. मग्रारो-२०२३/प्र.क्र.३३/रोहयो-७, दिनांक १६मे, २०२३ नुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एकूण निर्माण होणाऱ्या संचयित मनुष्यदिवसाच्या अनुषंगाने प्रतिमाह एकत्रित मानधनात देण्यात येत होते. या सर्व बाबी लक्षात घेता मनरेगा अंतर्गत ग्राम रोजगार सेवकांना आतापर्यंत वेळोवेळी देण्यात आलेल्या मानधनामध्ये (Gram Rojgar Sevak Mandhan Vadh) सुधारणा करण्याचीबाब शासनाच्या विचाराधिन होती. याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
राज्यातील ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
१) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्राम पातळीवर काम करणा-या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा रुपये ८,००० इतके मानधन (Gram Rojgar Sevak Mandhan Vadh) देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२) ज्या ग्रामरोजगार सेवकांनी १०००० पेक्षा जास्त (१०००१ व त्यापुढे) मनुष्य दिवस निर्माण केले आहे अशा ग्रामरोजगार सेवकांना १०००० पुढील मन्यष्यदिनाच्या अकुशल मजुरी खर्चाच्या २% प्रोत्साहन मानधन (Gram Rojgar Sevak Mandhan Vadh) देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
३) २००० दिवसापर्यंत मनुष्य दिवस निर्मिती करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमाह १००० रूपये व २००१ व त्यापेक्षा अधिक मनुष्य दिवस पुर्ण करणा-या ग्राम रोजगार सेवकांना प्रतिमाह २००० रूपये इतका प्रवास भत्ता व डेटा पॅक करीता मानधन उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
४) ग्राम रोजगार सेवक यांचे मानधन अदा करण्याची कार्यपद्धती सध्या आहे त्याप्रमाणे राहील. ग्राम रोजगार सेवक मानधन वितरण संगणीकृत प्रणाली आयुक्त, मनरेगा, नागपूर यांचे स्तरावर विकसित करण्यात यावी सदर प्रणाली करिता शासन स्तरावरून वेगळ्याने निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
५) ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ८,००० रुपये मानधनासाठी राज्यस्तरावरील २५०५ ००२२ (२०) इतर प्रशासकिय खर्च या लेखाशीर्षातून तात्पुरत्या स्वरूपात भागविण्यात यावा व या खर्चासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्याची कार्यवाही करण्यात येऊन विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे निधीची मागणी करण्यात यावी.
६) २% प्रोत्साहन अनुदान, ग्रामरोजगार सेवकांना प्रवास भत्ता व डेटा पंक व विमा या बाबींवरील होणाऱ्या खर्चाकरीता केंद्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या ६% प्रशासकीय खर्च किंवा राज्यस्तरावरील ३% प्रशासकीय खर्च यामधून या बाबीसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
ग्रामरोजगार सेवकांना यापूर्वी देण्यात येणारे विविध भत्ते निष्कासित करण्यात येत आहे. या शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ पासून एकत्रित मानधन देण्याच्या अनुषंगाने करण्यात यावी. मात्र प्रोत्साहान मानधनासाठी मनुष्यबळाची गणना ०१ एप्रिल २०२४ पासून करण्यात यावी.
शासन निर्णय:
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम रोजगार सेवकांचे मानधनात सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी यथे क्लिक करा.
पुढील लेख देखील वाचा!
- ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना!
- ग्राम रोजगार सेवकांच्या तक्रारी संदर्भात शासन नियम!
- ग्रामपंचायत स्तरावर अतिरीक्त ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती !
- ग्राम रोजगार सेवक मनरेगा हजेरीपट निर्गमित करणार !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!