Gram Panchayat Tied Grant Fund 2024-25 : १५ व्या वित्त आयोगातील पहिल्या हप्त्याचा निधी जमा; असा करावा लागणार खर्च !
पंधराव्या केंद्रिय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्यासाठी सन २०२४-२५ (Gram Panchayat Tied Grant Fund 2024-25) च्या बंधित निधीच्या (टाईड ग्रॅट) पहिल्या हप्त्यापोटी रु. ९७१.६५ कोटी इतका निधी मुक्त केला असल्याचे वित्त मंत्रालय, भारत सरकार यांनी वितरण आदेशान्वये कळविले आहे. त्यानुसार १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाकडून राज्य शासनास प्राप्त झालेला निधी राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत शासनाने खालील निर्णय घेतला आहे.
१५ व्या वित्त आयोगातील पहिल्या हप्त्याचा निधी जमा : Gram Panchayat Tied Grant Fund 2024-25:
पंधराव्या केंदीय वित्त आयोगाचा सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या बंधित निधीचा (Gram Panchayat Tied Grant Fund) स्वरूपातील पहिल्या हप्त्याचा केंद्रशासनाकडून मुक्त करण्यात आलेला रू. ९७१.६५ कोटी इतका निधी खालीलशासन निर्णयातील विवरणपत्रात (प्रपत्र- अ) दर्शविल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण स्थनिक स्वराज्य संस्थाना (जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरांसाठी) अनुक्रमे लेखाशीर्षाखाली (२५१५२६३७/२५१५२६५५/२५१५२६७३) वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विवरणपत्र अनुसार निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीव्दारे (बीम्सवर) वितरीत करण्यात येत आहे. सदर निधी (Gram Panchayat Tied Grant Fund) पंचायत राज संस्थाना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांमध्ये अनुक्रमे १०:१०:८० या प्रमाणात वितरीत करण्यात येत आहे.
सर्व जिल्हा परिषदांनी e-Gramswaraj-PFMS-Treasury net यांच्या इंटीग्रेशनने कोषागारात देयक सादर करुन पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या ICICI बँकेतील खात्यात १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा (Gram Panchayat Tied Grant Fund) निधी जमा करणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा परिषदेचा निधी ग्रामविकास विभागामार्फत e-Gramswaraj-PFMS Treasury net यांच्या इंटीग्रेशनने अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई येथे देयक सादर करुन जिल्हा परिषदेच्या ICICI बँकेतील खात्यात निधी (Gram Panchayat Tied Grant Fund) जमा करणे आवश्यक आहे.
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या (Gram Panchayat Tied Grant Fund) वितरणाचे नियोजन, सनियंत्रण व समन्वयानाची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांची राहील.
वित्त मंत्रालय (व्यय), केंदीय वित्त आयोग, भारत सरकार यांचे पत्र क्र. F15 (4) FC- XV/FCD/2020-25 दि.०१.१२.२०२३ आणि पंचायत राज भारत सरकार यांचे पत्र क्र.M- ११०१५/१६१/२०२०-FD, दि.०७.०६.२०२२ अन्वये ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिन्ही स्तरावर म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मध्ये प्रशासक कार्यरत आहे अशा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना १५ व्या केंद्रिय वित्त आयोगाचे वितरण केले जाणार नाही. सध्या राज्यात २६ जिल्हा परिषदा, २८९ पंचायत समिती आणि ७९६ ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक कार्यरत आहेत. अशा या सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना या आदेशाद्वारे १५ व्या केंद्रिय वित्त आयोगाच्या सन २०२४-२५ च्या बंधित निधीच्या (Gram Panchayat Tied Grant Fund) पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले नाही.
पंधराव्या वित्त आयोगाच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी वितरीत केलेल्या अनुदानातून घ्यावयाची कामे, त्याचे नियोजन, समन्वय व नियंत्रण याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. तसेच बंधित निधीतून (Gram Panchayat Tied Grant Fund) करावयाची कामे, त्याचे नियोजन याबाबतच्या अतिरिक्त मार्गदर्शक सूचना शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासूनच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या वितरीत (Gram Panchayat Tied Grant Fund) निधीतून पंचायतराज संस्थानी ग्रामपंचायत विकास आराखड्यानुसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावयाची असून यासंदर्भातील सूचना ग्राम विकास विभागाकडून शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत.
वरील प्रक्रियेमध्ये गावातील सद्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करून गावाच्या गरजांची निश्चिती करून कामे ठरविण्याचे अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतीला आहेत.
बंधित निधी (Gram Panchayat Tied Grant Fund) चा वापर पुढील पायाभूत सेवांसाठी करावयाचा आहे. :-
१. स्वच्छता आणि हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल व दुरूस्ती
२. पेयजल पाणीपुरवठा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलींग.
बंधित निधी (Gram Panchayat Tied Grant Fund) च्या ५०% निधी हा वरील नमूद दोन बाबींसाठी करावयाचा आहे. जर वरील दोन बाबींपैकी एकाची पुर्णतः अंमलबजावणी झाली असेल तर त्यासाठीचा निधी पहिल्या बाबीसाठी खर्च करण्यात यावा.
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थानी प्राप्त निधीपेक्षा जास्त खर्च करू नये व जास्तीचे आर्थिक दायित्व निर्माण करू नये. तसेच केंद्रिय वित्त आयोग आणि पंचायतराज नवी दिल्ली यांच्या दि.१४.०७.२०२१ आणि दि. ११.०८.२०२१ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सुचनांनुसार सदर निधीतून माहे ऑक्टोबर-२०२४ पर्यंत किमान ५० टक्के खर्च होणे आवश्यक आहे. ५०% खर्च झाल्याशिवाय केंद्रीय वित्त आयोगाकडून पुढील हप्त्याचे वितरण केले जाणार नाही. खर्च करण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यावर राहील. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिन्ही स्तरांवर माहे ऑक्टोबर-२०२४ अखेरपर्यंत किमान ५०% खर्च करणे आवश्यक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिन्ही स्तरासाठी १५ च्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या बंधित निधीच्या (Gram Panchayat Tied Grant Fund) पहिल्या हप्त्यापोटी राज्यास प्राप्त निधीच्या वितरणासाठी होणारा खर्च खालील ३ लेखाशिर्षांखाली करण्यात आलेल्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून खर्ची टाकण्यात येईल.
निधी अर्थ संकल्पीय वितरण प्रणालीवर (BDS) सोडण्यात आल्यापासून ५ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात ग्रामिण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या बैंक खात्यात रक्कम जमा करण्याची संपुर्ण जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आणि मुख्य वित्त व लेखा अधिकारी, जिल्हा परिषद यांची राहील. विलंब झाल्यास होणाऱ्या विलंबाच्या कालावधीच्या व्याजाची रक्कम जिल्हा परिषदेस जमा करावी लागेल.
जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींना देय असणारा निधी काढताना संपुर्ण जिल्हयातील ग्रामपंचायतीसाठी देण्यात आलेला निधी आणि संपूर्ण जिल्हयातील ग्रामपंचायतीची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) यांच्या गुणोत्तरास ग्रामपंचायतीच्या लोकसंखेने गुणीले असता त्या ग्रामपंचायतीस किती निधी देय होतो ते कळते. ज्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक कार्यरत आहे त्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या सदर परिगणना करताना विचारत घेण्यात येऊ नये.
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी या शासन निर्णयाच्या प्रती त्यांचे अधिनस्त सर्व जिल्हा परिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत स्तरावरील अधिकाऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील.
ग्रामविकास विभाग शासन निर्णय – Gram Panchayat Tied Grant Fund GR:
15 व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या बंधित निधीच्या (Gram Panchayat Tied Grant Fund 2024-25) पहिल्या हप्त्याचे वितरण बाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
खालील लेख वाचा !
- आपल्या गावासाठी सरकारने दिलेला निधी ग्रामपंचायतीने कुठे खर्च केला? ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर लक्ष कसं ठेवायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती
- एका ग्रामपंचायतीला दरवर्षी किती निधी मिळतो? सरपंच गावाच्या विकासासाठी किती निधी गावात आणू शकतो? जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
Good inframeshan sir