वृत्त विशेषमहाराष्ट्र ग्रामपंचायतसरकारी कामे

सरपंच किंवा उप-सरपंच मरण पावल्यामुळे, त्याने राजीनामा दिल्यामुळे, अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यामुळे रिक्त झालेले पद भरणे संदर्भात सविस्तर माहिती!

आपण या लेखात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४३ (Maharashtra Gram Panchayat Act section 43) नुसार ग्रामपंचायत मधील सरपंच किंवा उप-सरपंच मरण पावल्यामुळे, त्याने राजीनामा दिल्यामुळे, अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यामुळे रिक्त झालेले पद (Gram Panchayat Rikta Pad Bharne Niyam) भरणे संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ग्रामपंचायत रिक्त पद भरणे संदर्भात नियम – Gram Panchayat Rikta Pad Bharne Niyam:

सरपंच किंवा उप-सरपंच असमर्थ झाल्यामुळे, मरण पावल्यामुळे, त्याने राजीनामा दिल्यामुळे, अनर्हतेमुळे, अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यामुळे परवानगीशिवाय अनुपस्थितीत राहिल्यामुळे किंवा त्याला पदावरून काढून टाकल्यामुळे जे रिकामी झाले असेल (Gram Panchayat Rikta Pad Bharne Niyam) व जे रिकामी झाल्याविषयी विहित केलेल्या रीतीने जिल्हाधिकाऱ्याला सूचना देण्यात आलेली असेल असे कोणतेही रिकामे पद (Gram Panchayat Rikta Pad Bharne Niyam), सरपंच किंवा उपसरपंच यांची निवड करून ग्रामपंचायत अधिनियम कलम ४३ (Gram Panchayat Rikta Pad Bharne Niyam) नुसार भरले जाईल. आणि तो सदस्य, ज्या सरपंचाच्या किंवा उपसरपंचाच्या जागी निवडून आला असेल त्या सरपंचाने किंवा उपसरपंचाने ते पद रिकामे झाले नसते तर जितक्या मुदतीपर्यंत पद धारण केले असते तितक्याच मुदतीपर्यंत पद धारण करील.

१) सरपंचाने किंवा यथास्थिती, उपसरपंचाने रिक्त (Gram Panchayat Rikta Pad Bharne Niyam) झालेले पद, ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत भरण्यात येईल.

२) थेट निर्वाचित सदस्याचे पद, रिक्त झाले असेल तर, ते पद, असे पद रिक्त झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत, पंचायतीचे सदस्य यांच्यामधून निवडणुकीद्वारे भरण्यात येईल.

३) पोट- कलम (१) अन्वये सरपंचाच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेली सभा कलम ३३, पोट- कलम (१) मध्ये वर्णन केलेल्या रीतीने जिल्हाधिकाऱ्याने बोलावली पाहिजे.

जागा रिकामी असल्यामुळे पंचायतीच्या कामकाजास बाधा न येणे:

१) पंचायतीच्या कोणत्याही सदस्यांची जागा रिकामी असेल त्या मुदतीत सदस्यत्व चालू असलेल्या सदस्यांना, कोणतीही जागा रिकामी झाली नाही, असे समजून काम चालवता येईल.

२) पंचायतीच्या सदस्यांची जागा रिकामी झाली असली किंवा तिच्या रचनेत कोणताही दोष असला तरी कलम १४५, पोट – कलम ( १ अ ) च्या उपबंधास अधीन राहून तिला कार्य करण्याचा अधिकार असेल आणि पंचायतीचे कामकाज चालू असताना ज्या व्यक्तीला तेथे बसण्याचा, मत देण्याचा किंवा अन्यथा त्यात भाग घेण्याचा हक्क नव्हता अशी एखादी व्यक्ती त्या ठिकाणी बसली, तिने मत दिले किंवा अन्यथा अशा कामकाजामध्ये भाग घेतला असे मागाहून दिसून आले असेल, तरी पंचायतीचे असे कामकाज वैध असेल.

(३) पंचायतीचे कोणतेही कृत्य किंवा कामकाज हे, प्रकरणाच्या गुणावगुणास बाधा न आणणाऱ्या अशा कोणत्याही कृत्यातील किंवा कामकाजातील कोणत्याही दोषांमुळे किंवा अनियमिततेमुळे किंवा कोणत्याही सदस्यावर नोटीस बजावण्यामध्ये झालेल्या कोणत्याही अनियमिततेमुळे किंवा केवळ अनौपचारिकतेमुळे अवैध आहे असे मानले जाणार नाही.

पुढील लेख देखील वाचा!

  1. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य निरर्हता/अपात्र नियम विषयीची संपूर्ण माहिती
  2. महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच व उप-सरपंच अविश्वास ठराव विषयीची संपूर्ण माहिती
  3. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आचारसंहिता लागू करण्याबाबत नियम : शासकीय कामामध्ये नातेवाईकाने हस्तक्षेप केल्यास सदस्य पद रद्द होणार!
  4. ग्रामपंचायतीचे विघटन (विसर्जन) ( Dissolution of Panchayat) – (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४५ नुसार)
  5. ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार उघड झालं की, अनुसरावयाची कार्यपद्धती बाबत शासन नियम !
  6. भ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा !
  7. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ सुधारित – Maharashtra Gram Panchayat Act PDF in Marathi

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.