ग्रामपंचायत मधील मनरेगाच्या कामांचं स्टेटस ऑनलाईन कसं पाहायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती!
ग्रामपंचायत मध्ये मनरेगा अंतर्गत वैयक्तिक तसंच सार्वजनिक कामांच्या माध्यमातून जसं की शेततळं बांधणं, फळबागेची लागवड या कामांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देणं हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. पण, रोजगाराची हमी मिळाल्यानंतर तुमच्या गावात मनरेगाअंतर्गत कोणती कामं सुरू आहेत, त्यांचं स्टेटस (Gram Panchayat MGNREGA Work Expenditure) काय आहे, सोबतच मनरेगाच्या मजुरीचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही, हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरतं. आता आपण घरबसल्या ही माहिती फोनवर ऑनलाईन पाहू शकतो, ती कशी हेच आपण आता सविस्तर जाणून घेऊया.
मनरेगाच्या कामांचं स्टेटस ऑनलाईन कसं पाहायचं? Gram Panchayat MGNREGA Work Expenditure:
सर्व प्रथम खालील लिंक वर क्लिक करून महात्मा गांधी नॅशनल रुरल इम्प्लॉयमेंटची वेबसाइट (नरेगा) ची वेबसाइट ओपन करा.
https://nrega.nic.in/homegp_new.aspx
नरेगाची वेबसाइट ओपन केल्यानंतर (जनरेट रिपोर्ट्स) Generate Reports – Job Card, Job Slip , MSR Register , Pending Works, UC यावर क्लिक करायचं आहे.
मग तुमच्यासमोर देशातल्या सगळ्या राज्यांची नावं ओपन होतील. यांतील महाराष्ट्र (MAHARASHTRA) या नावावर क्लिक केलं की, Gram Panchayat Module नावाचं नवीन पेज तुम्हाला तिथे दिसेल.
आता इथे सुरुवातीला फायनान्शियल ईयरमध्ये आर्थिक वर्ष निवडायचं आहे, त्यानंतर जिल्हा, तालुका आणि मग गाव निवडायचं आहे.
हे सगळं निवडून झालं की मग Prossed यावर क्लिक करायचं आहे.
यानंतर Gram Panchayat Reports नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर R1, R2, R3, R4, R5, R6 असे रकाने दिलेले असतील.
यांतल्या R5. IPPE या रकान्यातल्या कामाची यादी(List of work) पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर Work Expenditure नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
इथं सुरुवातीला कामाचा वर्ग म्हणजेच प्रकार निवडायचा आहे. तुम्हाला गावातल्या सगळ्या कामांचं स्टेटस जाणून घ्यायचं असल्यास ALL हा पर्याय निवडायचा आहे.
त्यानंतर कामाची स्थिती (Work Status) या पर्यायासमोर तुम्ही नवीन कोणती काम सुरू आहेत, किती कामांना मंजुरी मिळाली, किती पूर्ण झाली हे पाहू शकता. पण जर ही सगळी माहिती एकदाच पाहायची असल्याने मी ALL या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
शेवटी आर्थिक वर्ष (Financial Year) या रकान्यातील ALL या रकान्यांसमोर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या गावातील गेल्या काही वर्षांतील मनरेगाच्या कामांची यादी दिसून येईल.
पण, समजा तुम्हाला 2020-21 या एकाच वर्षातील कामे पाहायची असेल तर आर्थिक वर्ष (Financial Year) समोर 2020-21 हा पर्याय निवडायचा आहे.
यानंतर तुमच्यासमोर एक टेबल ओपन होईल. यात सुरुवातीला कामाचं नाव (Gram Panchayat MGNREGA Work Expenditure), कामाचं स्टेटस, आर्थिक वर्ष, कामाचा प्रकार इत्यादी माहिती दिलेली असेल.
सदरील काम मंजूर झालं असेल तर अप्रूव्ह, सुरू असेल तर ऑनगोईंग आणि पूर्ण झालं असेल तर कम्प्लिटेड अशा प्रकारचं स्टेटस तिथं तुम्हाला पाहायला मिळेल.
या लेखात, आम्ही ग्रामपंचायत मधील मनरेगाच्या कामांचं (Gram Panchayat MGNREGA Work Expenditure) स्टेटस ऑनलाईन कसं पाहायचं? विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा !
- महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्डसाठी अर्ज कसा करायचा? जॉब कार्ड यादी मध्ये ऑनलाईन नाव तपासा!
- मनरेगा संबंधित तक्रार आणि सुचना ऑनलाईन नोंदवा !
- मनरेगा अंतर्गत मजुरांना मस्टर बंद होण्याच्या 8 दिवसाच्या आत मजूरी देणे बाबत शासन नियम!
- अभिसरण, संयोजन आणि श्रमदानातून मनरेगांत पाहिजे ते काम घेणे आणि हवे तेव्हा पूर्ण करणे – पहा मनरेगाचा नवीन शासन निर्णय!
- ग्रामपंचायतच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची ? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- ग्रामपंचायतीच्या विविध बँक खात्यांचा हिशोब पहा ऑनलाईन; असे करा ग्रामपंचायत बँक पासबुक डाऊनलोड ऑनलाईन
- ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे ऑनलाईन कसं पाहायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!