सरकारी कामेमहाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेष

ग्रामपंचायतीच्या विविध बँक खात्यांचा हिशोब पहा ऑनलाईन; असे करा ग्रामपंचायत बँक पासबुक डाऊनलोड ऑनलाईन

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपातळीवर गावाच्या विकासाबाबत आर्थिक व्यवहार करणारी ग्रामपंचायत अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. गावाचे विकासाचे मुख्य केंद्र म्हणजे गावची ग्रामपंचायत होय. ग्रामपंचायतीसाठी राज्य आणि केंद्र शासन यांच्या कडून विविध प्रकारचे अनुदान मिळत असते आणि प्रत्येक ग्रामपंचायत स्वतःच्या उत्पन्नातून सुद्धा काही निधी कमवत असते. ग्रामपंचायतीच्या ई-बँकिंग सुविधेमुळे शासनासोबतचा आर्थिक व्यवहार अधिक सोपा आणि सोयीस्कर झाला आहे. तसेच बँकिंग व्यवहार ग्रामीण जनतेला आता थेट ऑनलाईन पाहता येणार आहेत. विविध निधी आणि अनुदाने थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात (Gram Panchayat Bank Passbook) जमा होत आहे. ग्रामपंचायत स्तरावर प्राप्त होणारा विविध निधीसाठी योजनेनुसार वेगवेगळी बँकेची खाती उघडावी लागतात. माहितीसाठी खाली काही बँकेची खाती दिली आहेत.

ग्रामपंचायतीची विविध बँक खाती – Gram Panchayat Bank Account:

ग्रामपंचायतीची बँक खाती ग्रामपंचायतीला प्राप्त होणारा निधी ठरलेल्या उद्देशावरच खर्च करणे बंधनकारक असते. त्यासाठी वेगवेगळी खाती बँकेत काढावी लागतात . त्याचा तपशील पुढीलप्रमाणे .

१ ) ग्रामनिधी  बँक खाते: ग्रामपंचायतीचे विविध कर उदा. घरपट्टी, जागाभाडे, व्यवसाय कर बाजार कर, इत्यादी मधून येणारा निधी या बँक खात्यात ठेवावा लागतो . हे खाते सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहीने चालते.

२ ) ग्राम पाणी पूरवठा निधी  बँक खाते: ग्रामपंचायतीने वसूल केलेली पाणीपट्टी या खात्यातच जमा करणे बंधनकारक असते. यातून गावांच्या पाणी पुरवठा योजनेचा देखभाल व दुरूस्ती खर्च भागवायचा असतो. हे खाते सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहीने चालते.

३ ) वित्त आयोग निधी बँक खाते: १५ वित्त आयोगाकडून ग्रामपंचायतीसाठी थेट आलेला अनुदान निधी या स्वतंत्र खात्यात जमा होतो. आणि वित्त आयोगाच्या गाईडलाईन्स प्रमाणेच हा निधी खर्च करावा लागतो. हे खाते सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहीने चालते.

४ ) मनरेगा निधी: महात्मा गांधी रोजगार हमी योजनचे मिळणारे अनुदान या निधीत जमा होत असते.यातील निधीमधून ग्रामरोजगार सेवकांचे मानधन इत्यादी खर्च करावा लागतो. हे खाते सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहीने चालते.

५ ) ग्राम आरोग्य , पोषण , पाणी पूरवठा व स्वच्छता समिती निधी: या निधीसाठी मिळालेले अनुदान साथ रोग, पोषण, स्त्रीयांचे आजार या प्रबोधन करण्या साठी तसचे आरोग्यविषयक बाबीसाठी खर्च करणे आवश्यक असते. हे खाते सरपंच व आशा सेविका यांच्या संयुक्त सहीने चालविले जाते.

६. अनुसूचीत जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजना निधी: जिल्हा परिषद व पंचायती समितीकडून प्राप्त होणारा हा निधी वरील नावाप्रमाणे अनु. जाती व नव बौद्ध वस्तीच्या विकासासाठी खर्च करावा लागतो. हे खाते विकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहीने चालविले जाते.

ग्रामपंचायत बँक खात्यांचा हिशोब ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस – Gram Panchayat Bank Passbook:

आपल्या ग्रामपंचायतीला शासनाकडून किती निधी मिळाला आहे आणि स्वतःचा निधी किती जमा-खर्च झाला आहे हे आपण ऑनलाईन पाहू शकतो. यामध्ये प्रत्येक दिवसाची किंवा महिन्याची रक्कम आपण बँक पासबुक (Gram Panchayat Bank Passbook) मध्ये बघू शकतो.

ग्रामपंचायतीच्या विविध बँक खात्यांचा हिशोब ऑनलाईन पाहण्यासाठी आणि ग्रामपंचायत बँक पासबुक (Gram Panchayat Bank Passbook) डाऊनलोड करण्यासाठी खालील केंद्र सरकारच्या ईंग्रामस्वराज्यच्या वेबसाईटला भेट द्या.

https://egramswaraj.gov.in

ईंग्रामस्वराज्य वेबसाईट ओपन झाल्यानंतर विविध प्रकारचे पर्याय आपल्याला दिसतील, वेबसाईट स्क्रोल करून खाली “Accounting” या पर्यायावर क्लीक करा.

Accounting - Gram Panchayat Bank Passbook
Accounting

Accounting या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे विविध पर्याय दिसतील, यामध्ये आपल्याला “ACCOUNTING ENTITY WISE REPORT” वर क्लिक करा.

खालील विविध रिपोर्ट आपण “Account Wise Cash Book Report” मध्ये पाहू शकतो, पण आपण इथे खातेनिहाय रोख पुस्तकाचा अहवाल पाहण्यासाठी “Account Wise Cash Book Report” या पर्यायावर क्लिक करूया.

  1. डे बुक (Day Book)
  2. कॅश बुक रिपोर्ट (Cash Book Report)
  3. खातेनिहाय रोख पुस्तकाचा अहवाल (Account Wise Cash Book Report)
  4. ओ अँड एम खर्च अहवाल (O & M Expendiure Report)
  5. बँक/योजनेनुसार खात्याची यादी (Bank/Scheme Wise List Of Account)
  6. त्रुटी अहवालाची नोंद (Note Of Error Report)
  7. पावती विश्लेषण अहवाल (Receipt Analysis Report)
  8. खर्चाचे विश्लेषण अहवाल (Expenditure Analysis Report)
  9. लेजर बुक रिपोर्ट (ledger Book Report)
  10. जर्नल बुक रिपोर्ट (Journal Book Report)
  11. ऑब्जेक्ट हेड वार खर्च अहवाल (Object Head Wise Expenditure Report)
  12. योजनेनुसार खर्च अहवाल (Scheme Wise Expenditure Report)
Account Wise Cash Book Report : Gram Panchayat Bank Passbook
Account Wise Cash Book Report

आता खातेनिहाय रोख पुस्तकाचा अहवालाचे पेज ओपन होईल, त्यामध्ये खालील प्रमाणे पर्याय निवडा.

  1. Financial Year मध्ये आर्थिक वर्ष (कोणत्या वर्षाची माहिती आपणास आवश्यक आहे त्यानुसार आर्थिक वर्ष)
  2. State मध्ये आपले महाराष्ट्र राज्य निवडा.
  3. Accounting Entity मध्ये “Village Panchayat” म्हणजेच ग्रामपंचायत निवडा.
  4. District मध्ये आपला जिल्हा निवडा.
  5. Block मध्ये तालुका निवडा.
  6. Village मध्ये गाव निवडा.
Account Wise Cash Book Report Gram Panchayat Bank Passbook
Account Wise Cash Book Report

बँक पासबुक (Gram Panchayat Bank Passbook) हिशोब तारीख किंवा महिनावार पाहिजे त्यानुसार निवडा आणि पुढे ग्रामपंचायतीच्या निधीची तीन प्रकारची खाती दिसतील, आपल्याला आवश्यक असलेल्या खात्याचा रिपोर्ट पाहण्यासाठी त्यावर क्लिक करून निवडा.

  1. बँक खाते (Bank Account)
  2. ट्रेझरी खाते(Treasury Account)
  3. पोस्ट ऑफिस खाते(Post Office Account)
बँक खाते प्रकार निवडल्यानंतर खालील प्रमाणे बँक नाव, खाते क्रमांक, योजनेचा प्रकार व घटक नाव निवडा आणि कोड टाकून “Get Report‘ वर क्लिक करा.
Account Wise Cash Book Report Gram Panchayat Bank Passbook
Account Wise Cash Book Report
Get report वर क्लिक केल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायत बँक खात्यांचा हिशोब पाहायला मिळेल, तो आपण PDF फाईल मध्ये डाउनलोड किंवा प्रिंट करून घेऊ शकतो. जर ग्रामपंचायत मधल्या कुठल्याही निधीच्या खात्याविषयी विषयी शंका किंवा प्रश्न आल्यास, तुम्ही ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाकडे माहितीचा अधिकार म्हणजेच RTI चा वापर करून त्या निधीसंबंधीची माहिती मागवू शकता.

हेही वाचा – एका ग्रामपंचायतीला दरवर्षी किती निधी मिळतो? सरपंच गावाच्या विकासासाठी किती निधी गावात आणू शकतो? जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “ग्रामपंचायतीच्या विविध बँक खात्यांचा हिशोब पहा ऑनलाईन; असे करा ग्रामपंचायत बँक पासबुक डाऊनलोड ऑनलाईन

  • विष्णु ज्ञानेश्वर गवारे

    जेव्हा आपण सर्व माहिती भरून बँक अकाऊंट निवडतो तेव्हा तिथे कोणताही पर्याय येत नाही. काय अडचण असेल. मार्गदर्शन करा.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.