वृत्त विशेषRTIमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमाहिती अधिकारसरकारी कामे

ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) साठी असा करा माहिती अधिकार अर्ज !

ग्रामपंचायती मध्ये प्रत्येक रुपया कोठून व कसा आला ? प्रत्येक रुपया कोठे व कसा खर्च झाला? हे जाणून घेण्याचा प्रत्येक मतदारांला हक्क आहे. ग्रामपंचायतीने दरवर्षी लेखा परीक्षण (Gram Panchayat Audit Report) अहवाल ग्रामसभेत मांडणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीने दरवर्षी लेखा परीक्षण अहवालाची प्रत प्रत्येक कर भरणाऱ्या खातेदारांना दिली पाहिजे. ग्रामपंचायतीने दरवर्षी विहित वेळेत लेखापरिक्षण (Gram Panchayat Audit Report) करुन घेणे ही सरपंच व ग्रामसवेकांची जबाबदारी असते. लेखा परिक्षकांनी ऑडिटमध्ये काढलेल्या त्रूटी समजून घ्या. तसेच त्या त्रूटीची ग्रामपंचायत पूर्तता करते की नाही यावर लक्ष ठेवा.

ग्रामपंचायत

लेखा

परीक्षण अहवालासाठी माहिती अधिकार अर्ज – Gram Panchayat Audit Report:

ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (Gram Panchayat Audit Report) साठी खालील प्रमाणे आवश्यक मुद्दे माहिती अधिकार अर्जामध्ये लिहू शकता.

                                        माहितीचा अधिकार अधिनियम २००५ – कलम ३ अन्व्ये अर्ज

                                                           (जोडपत्र “अ” नियम ३ नुसार)

प्रति, जनमाहिती अधिकारी,

ग्रामसेवक.…….. ग्रामपंचायत कार्यालय,

ता. ……… जि. ………….

अर्जदाराचे नाव व पत्ता:

माहितीचा विषय : ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (Gram Panchayat Audit Report) मिळणेबाबत.

अ) ग्रामपंचायतीने सन….ते ….. दरम्यान ) कोणकोणती विकास कामे केली? विकास कामाची यादी द्यावी. या विकास कामासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारच्या कोणत्या योजनेतून किती निधी मिळाला. सदर निधी कधी व कसा खर्च करण्यात आला.

ब) आपल्या ग्रामपंचायतीच्या मागील तीन वर्षाच्या ऑडिट रिपोर्टची छांयाकित प्रत द्यावी.

क) ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती कर्मचारी आहेत. त्यांना किती रूपये मासिक वेतन दिले जाते याचा तपशील द्यावा.

ड) ग्रामपंचायतीला सन…..ते ….. या तीन वर्षात प्रतिवर्षी कोणकोणत्या उद्देशासाठी शासनाकडून किती रूपये थेट अनुदान किंवा मदत रक्कम मिळाली या रक्कमेचा विनीयोग कोठे केव्हा व कसा झाला.

इ) सन…..पासून…..आज तारखेपर्यंत ग्रामपंचायतीच्या एकूण किती ग्रामसभा भरवल्या गेल्या. प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित पुरूष व महिला सदस्यांची नावे व पत्ते मिळावेत. ग्रामसभेत मंजूर झालेल्या सर्व ठरावांची छायांकित प्रती मिळाव्यात.

माहिती व्यक्तीश / स्पीड पोष्टाने हवी :

अर्जदार दारिद्र्य रेषेखालील (आहे/नाही, असल्यास पुराव्याची छायांकित प्रत जोडावी)

दिनांक :                                                                                                                                                    अर्जदाराची सही

स्थळ :                                                                                                                                                        मोबाईल नंबर :

माहिती अधिकार (RTI) नमुना अर्ज PDF फाईल : माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत नमुना अर्ज PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील माहिती अधिकार कायदा (RTI) संबंधित लेख देखील वाचा!
  1. माहिती अधिकार कायदा (RTI) कोणासाठी व कशासाठी? माहिती अधिकार कायद्याची व्याप्ती.
  2. माहितीचा अधिकाराचा वापर कसा करावा आणि त्याबाबतची सूत्रे (RTI).
  3. माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन मोबाईलद्वारे माहिती मिळवण्यासाठी विंनती अर्ज कसा करायचा?
  4. माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी विनंती अर्ज कसा करायचा हे जाणून घ्या सविस्तर.
  5. माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत पहिले अपील करण्यासाठी काही सुचना!
  6. माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत दुसरे अपील करण्यासाठी काही सुचना!
  7. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 नागरिकांना अवलोकनासाठी अभिलेख उपलब्ध करुन देणेबाबत शासन नियम!
  8. माहितीच्या अधिकाराचा हक्क म्हणजे काय ? जाणून घ्या सविस्तर
  9. माहिती अधिकार कायद्यान्वये सर्व नागरिकांना दिलेले अधिकार, विषयी सविस्तर माहिती!
  10. माहिती अधिकाऱ्याला कोणती माहिती देणे नाकारता येईल? जाणून घ्या सविस्तर (माहिती अधिकार कलम ८ : माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद)
  11. अर्जदारास माहितीच्या शुल्काची रक्कम अर्ज प्राप्त झाल्यानंतर 10 दिवसांत जलदगती कळविण्याबत शासन नियम!
  12. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडे अभ्यांगतांना अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्याबाबत शासन नियम!
  13. सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ते आणि व्हिसल ब्लोअर यांना पोलीस संरक्षण देणेबाबत शासन नियम!
  14. माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागविणाऱ्या अर्जदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांचे वेगळी नोंदवही ठेवण्याबाबत शासन नियम
  15. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ४(१)(क) व (ख) च्या अंमलबजावणीबाबत परिपत्रक
  16. माहिती आयोगांचे अधिकार व कार्ये, अपील व शास्ती (माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम १८ ते २० नुसार)
  17. कायदा माहितीचा अन् अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा !
  18. तलाठ्याची कर्तव्ये कोणती आहेत? तलाठ्याकडून माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज कसा करायचा?
  19. ग्रामसेवकाची कामे व जबाबदाऱ्या कोणत्या? ग्रामसेवकांकडून माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज (RTI) कसा करायचा?
  20. 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणेबाबत शासन नियम !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.