ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ‘ग्रामपंचायत अधिकारी’ पद !
राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ‘ग्रामपंचायत अधिकारी – Gram Panchayat Adhikari’ करण्यास दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून त्याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे.
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे पद ग्रामीण भागातील सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी शासन व जनता यांना जोडणारे व प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे महत्वाचे पद व घटक आहे. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचे सचिव व ग्रामसभेचे पदसिध्द सचिव म्हणून कामकाज पाहतात.
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदांच्या कामाचे स्वरूप एकच असल्याने सदर दोन्ही पदे एकत्रित करून एकच पद निर्माण करणेबाबत वाचा येथील शासन निर्णयान्दये तज्ञ समिती नेमण्यात आली होती. सदर समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन प्रशासनाच्या दृष्टीने सक्षम असे “ग्रामपंचायत अधिकारी – Gram Panchayat Adhikari” असे नामाभिदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ‘ग्रामपंचायत अधिकारी’ पद ! Gram Panchayat Adhikari:
ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील ग्रामसेवक (एस-८) व ग्रामविकास अधिकारी (एस-१२) ही दोन्ही पदे एकत्रित करून एस-८ (२५५००-८११००) या वेतनश्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नामाभिदान “ग्रामपंचायत अधिकारी” असे करण्यात आले आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या ग्राम विकास अधिकारी या पदांचे वेतन संरक्षित करुन व ही पदे मृत संवर्गामध्ये वर्गीकृत करुन तद्नंतर रिक्त होणाऱ्या या पदांवर ग्रामपंचायत अधिकारी (Gram Panchayat Adhikari) हे नामाभिदान असणाऱ्या एस-८ वेतन श्रेणीतील एकाच पदावर नवीन नियुक्त्या करण्यात येतील.
ग्रामपंचायत अधिकारी (Gram Panchayat Adhikari) या पदास सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत १० वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ विस्तार अधिकारी एस-१४ (३८६००-१२२८००), २० वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहायक गट विकास अधिकारी एस-१५ (४१८००-१३२३००) व ३० वर्षाच्या सेवेनंतर तिसरा लाभ गट विकास अधिकारी एस-२० (५६१००-१७७५००) असा अनुज्ञेय राहील.
ग्रामपंचायत अधिकारी (Gram Panchayat Adhikari) या पदांच्या पदोन्नती साखळी सुधारित होत असल्याने सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून त्या सुधारित पदोन्नती साखळी नुसार आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अनुज्ञेय होतील. सदर शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी सदर पदांवरील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभ अनुज्ञेय झालेला आहे, परंतु प्रत्यक्षात अदा करण्यात आलेला नाही अशा कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पूर्वीच्या अनुज्ञेय पदोन्नती साखळी प्रमाणे लाभ अनुज्ञेय करण्यात यावेत व तद्नंतरचे लाभ सदर शासन निर्णयाप्रमाणे सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन निश्चिती करुन अदा करण्यात येईल.
सदर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची सध्या असलेली सेवाज्येष्ठता विचारात घेऊन त्यानुसार एकत्रित पदासाठी सेवाज्येष्ठता यादी नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर तयार करण्यात येईल. यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सेवाज्येष्ठतेमध्ये बदल होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन ग्रामपंचायत अधिकारी (Gram Panchayat Adhikari) हे पद निर्माण केल्याने आवश्यकतेनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ मध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येईल.
ग्राम विकास विभाग शासन निर्णय – Gram Panchayat Adhikari GR:
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून सदर पदाचे नामाभिदान ग्रामपंचायत अधिकारी (Gram Panchayat Adhikari) करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पुढील लेख देखील वाचा!
- ग्रामसेवकाची कामे व जबाबदाऱ्या कोणत्या? ग्रामसेवकांकडून माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज (RTI) कसा करायचा?
- ग्रामपंचायतीचे काम कसे चालते? सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मानधन किती? ग्रामस्थ म्हणून गावच्या विकास कामात कसं सहभागी व्हायचं आणि विकासकामांवर लक्ष कसे ठेवायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती
- आपल्या गावासाठी सरकारने दिलेला निधी ग्रामपंचायतीने कुठे खर्च केला? ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर लक्ष कसं ठेवायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती
- एका ग्रामपंचायतीला दरवर्षी किती निधी मिळतो? सरपंच गावाच्या विकासासाठी किती निधी गावात आणू शकतो? जाणून घ्या सविस्तर माहिती
- ग्रामसभांच्या कामकाजांची नोंद आता GS NIRNAY ॲपव्दारे होणार !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!