माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागविणाऱ्या अर्जदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांचे वेगळी नोंदवही ठेवण्याबाबत शासन नियम
माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती मागविणाऱ्या अर्जदारांना वेगवेगळ्या सार्वजनिक प्राधिकरणांकडून वेगवेगळ्या नमुन्यात माहिती उपलब्ध करून देण्यात येते. तथापि, माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागविणाऱ्या अर्जदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांची वेगळी नोंदवही ( Register ) ठेवण्यात येत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून माहिती अधिकारात प्राप्त होणाऱ्या अर्जावर करण्यात येत असलेली कार्यवाही सुस्पष्ट असण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी सर्व संबंधीतांच्या निदर्शनास आणण्याची व या अनुषंगाने सर्व विभागांना सूचित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तदनुसार शासन पुढीलप्रमाणे सूचित करीत आहे.
माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागविणाऱ्या अर्जदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांचे वेगळी नोंदवही ठेवण्याबाबत शासन नियम:
माहिती अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मागविणाऱ्या अर्जदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांची वेगळी नोंदवही ( Register ) रजिस्टर ठेवण्यात यावी. सदर नोंदवहीत सर्वसाधारणपणे खालील बाबी समाविष्ट असाव्यात.
विभागाचे नाव :
सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव :
जन माहिती अधिकाऱ्याचे नाव :
वर्ष :
पदनाम:
अ. क्र. | अर्जाचा नोंदणी क्रमांक | अर्जदाराचे नाव व पत्ता | कोणाकडे अर्ज केला आहे? मा.अ./स.मा.अ. | अर्ज प्राप्त झाल्याचा दिनांक | माहिती पुरवण्याची शेवटची तारीख | अर्जदार दारिद्रय रेषेखालील आहे काय | माहितीचा थोडक्यात तपशील | मागीतलेल्या माहितीचे स्वरूप ( फॉर्म ), प्रती मागणे/तपासणी/नमुना/इलेक्ट्रॉनिक माहिती | त्रयस्थ पक्षाची माहिती आहे का ? | अर्जाचे शुल्क रुपये | अर्जाची विहित फी भरल्याचा दिनांक |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 | 11 | 12 |
माहिती शुल्क कळविल्याचा दिनांक | माहिती शुल्क भरण्याचे स्वरूप व दिनांक | माहितीचे शुल्क (further fees) | माहिती शुल्क दिल्यापासून माहिती देण्यासाठी शिल्लक दिवस. | माहिती दिल्याचा दिनांक | माहिती कशाने पाठिवली कि व्यक्तिशः नेली | माहिती कोणत्या स्वरूपात दिली. | पृथकरणीय माहिती त्रयस्थ पक्षाची माहिती आहे का? | माहिती नाकारली काय? | कोणत्या कलमाच्या आधारे नाकारली | प्रथम अपील झाले आहे का? | शेरा. |
13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 | 22 | 23 | 24 |
प्रत्येक महिन्याच्या शेवटी त्या महिन्यात आलेल्या माहिती अर्जाचा सारांश घेण्यात यावा. सदर सारांशामध्ये सर्वसाधारणपणे खालील बाबी समाविष्ट असाव्यात.
आधीच्या महिन्यातील प्रलंबित असलेल्या माहिती अर्जाची संख्या | त्या महिन्यात प्राप्त झालेल्या माहिती अर्जाची संख्या | एकूण | त्या महिन्यात निकाली काढलेल्या माहिती अर्जाची संख्या | प्रलंबित असलेल्या माहिती अर्जाची संख्या | शेरा |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 |
माहिती अधिकार अधिनियम, २००५ अन्वये अर्जदारांकडून प्राप्त होणाऱ्या प्रथम अपील अर्जांची वेगळी नोंदवही ( Register ) प्रथम अपील अधिकाऱ्याकडेही ठेवण्यात यावी. सदर नोंदवहीत सर्वसाधारणपणे खालील बाबी समाविष्ट असाव्यात.
वर्ष :
सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव:
अपीलीय अधिकाऱ्याचे नाव:
विभागाचे नाव :
पदनाम:
अ. क्र. | अपील अर्जाचा नोंदणी क्रमांक | अपील काराचे नाव व पत्ता | अपील अर्ज कोणाकडे केला आहे ?स.मा.अ./ अपिल प्राधिकारी | अपील अर्ज प्राप्त झाल्याचा दिनांक | प्रतिवादी याचे नाव व पत्ता | अपील दारिद्रय रेषेखालील आहे काय? | अपिलाचा थोडक्यात तपशील | अपील अर्जाचे शुल्क कोणत्या स्वरूपात भरले | अपील अर्जाचे विहित शुल्क भरल्याचा दिनांक | कोणत्या जनमाहिती अधिकाऱ्याने खुद्द अपील केले त्याचा तपशील | अपिलावर निर्णय दिल्याचा दिनांक | शेरा |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 |
प्रथम अपील अधिकाऱ्याने प्रत्येक महिन्याच्या शेवटी त्या महिन्यात आलेल्या प्रथम अपील अर्जाचा सारांश घ्यावा. सदर सारांशामध्ये सर्वसाधारणपणे खालील बाबी समाविष्ट असाव्यात.
आधीच्या महिन्यातील प्रलंबित असलेल्या अपील अर्जाची संख्या | त्या महिन्यात प्राप्त झालेल्या अपील अर्जाची संख्या | एकूण | त्या महिन्यात निकाली काढलेल्या अपील अर्जाची संख्या | प्रलंबित असलेल्या अपील अर्जाची संख्या | शेरा |
1 | 2 | 3 | 4 | 5 |
परिपत्रकातील तरतूदी सर्व मंत्रालयीन विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख सार्वजनीक प्राधिकरण तसेच सर्व संबंधीतांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व तदनुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत त्यांना सूचित करण्यात यावे असे निर्देश शासन निर्णयाद्वारे दिले आहेत.
शासन निर्णय: माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गंत माहिती मागविणाऱ्या अर्जदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांचे वेगळी नोंदवही ठेवण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पुढील माहिती अधिकार कायदा (RTI) संबंधित लेख देखील वाचा!
- माहिती अधिकार कायदा (RTI) कोणासाठी व कशासाठी? माहिती अधिकार कायद्याची व्याप्ती.
- माहितीचा अधिकाराचा वापर कसा करावा आणि त्याबाबतची सूत्रे (RTI).
- माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन मोबाईलद्वारे माहिती मिळवण्यासाठी विंनती अर्ज कसा करायचा?
- माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी विनंती अर्ज कसा करायचा हे जाणून घ्या सविस्तर.
- माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत पहिले अपील करण्यासाठी काही सुचना!
- माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत दुसरे अपील करण्यासाठी काही सुचना!
- माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 नागरिकांना अवलोकनासाठी अभिलेख उपलब्ध करुन देणेबाबत शासन नियम!
- माहितीच्या अधिकाराचा हक्क म्हणजे काय ? जाणून घ्या सविस्तर
- माहिती अधिकार कायद्यान्वये सर्व नागरिकांना दिलेले अधिकार, विषयी सविस्तर माहिती!
- माहिती अधिकाऱ्याला कोणती माहिती देणे नाकारता येईल? जाणून घ्या सविस्तर (माहिती अधिकार कलम ८ : माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद)
- अर्जदारास माहितीच्या शुल्काची रक्कम अर्ज प्राप्त झाल्यानंतर 10 दिवसांत जलदगती कळविण्याबत शासन नियम!
- प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडे अभ्यांगतांना अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्याबाबत शासन नियम!
- सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ते आणि व्हिसल ब्लोअर यांना पोलीस संरक्षण देणेबाबत शासन नियम!
- 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणेबाबत शासन नियम !
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ४(१)(क) व (ख) च्या अंमलबजावणीबाबत परिपत्रक
- माहिती आयोगांचे अधिकार व कार्ये, अपील व शास्ती (माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम १८ ते २० नुसार)
- कायदा माहितीचा अन् अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा !
- तलाठ्याची कर्तव्ये कोणती आहेत? तलाठ्याकडून माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज कसा करायचा?
- ग्रामसेवकाची कामे व जबाबदाऱ्या कोणत्या? ग्रामसेवकांकडून माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज (RTI) कसा करायचा?
- ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) साठी असा करा माहिती अधिकार अर्ज
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!