महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजनासामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना !

आपण या लेखात गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान (Gopinath Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Anudan Yojana) योजने विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये साखर उद्योग हा एक प्रमुख उद्योग असून सद्यःस्थितीमध्ये राज्यात कार्यरत सुमारे १२७ सहकारी क्षेत्रातील व १२९ खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये अंदाजे ८ ते १० लाख ऊसतोड कामगार या क्षेत्रात काम करतात. बहुतांश ऊसतोड कामगार हे मराठवाडा विभागातील व विशेषतः बीड तसेच अहमदनगर, जालना, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव या जिल्हयांतील असून राज्यातील विविध जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या परिसरातील ऊस शेती/फडावर स्थलांतरीत होऊन काम करतात.

ऊस तोडणी व वाहतूक करताना होणारे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटूंबाचे उत्पन्न बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातात ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादमास व त्यांच्या कुटूंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम, त्यांचे झोपडी व बैलजोडी यांच्याकरीता अपघात विमा योजना तसेच त्यांचे झोपडी व बैलजोडी यांच्याकरीता विमा संरक्षण योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मात्र दिनांक ४ ऑक्टोबर, २०२४ रोजी मा. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये सदर विषयाबाबत सविस्तर चर्चा होवून राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम त्यांचे झोपडी व बैलजोडी यांच्याकरीता “गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना – Gopinath Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Anudan Yojana ” राबविण्याबाबत निर्णय झाला.

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना – Gopinath Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Anudan Yojana:

ऊस तोडणी व वाहतूक करतांना होणारे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात, यामुळे या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते.

घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्न बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातात मृत्यू झालेल्या अथवा अपंगत्व आलेल्या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादमास व त्यांच्या कुटूंबास आर्थिक लाभ देण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांच्या अंतर्गत असलेल्या परंतु महाराष्ट राज्याचे रहिवासी असलेले सर्व ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम झोपडी व बैलजोडी यांच्याकरीता “गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना – Gopinath Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Anudan Yojana” राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

योजने अंतर्गत लाभ:

“गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना – Gopinath Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Anudan Yojana” या योजने अंतर्गत खालील लाभ अनुज्ञेय असतील. :-

अ.क्र.बाबसानुग्रह अनुदानाची रक्कम
आग झोपडी आणि सामग्रीरु.१०,०००/-
वैयक्तिक अपघात (मृत्यू)रु.५,००,०००/-
वैयक्तिक अपघात (अपंगत्व)रु.२,५०,०००/-
वैयक्तिक अपघात – वैद्यकीय खर्चरु. ५०,०००/-
बैलजोडी लहान- मृत्यू/अपंगत्वरु.७५,०००/-
बैलजोडी मोठी- मृत्यू/अपंगत्वरु.१,००,०००/-

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना (Gopinath Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Anudan Yojana) ऊस गाळप हंगामाच्या कालावधीसाठी लागू राहील. या कालावधीत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांना किंवा त्यांच्या बैलांना केव्हाही अपघातामुळे मृत्यू झाला किंवा अपघातामुळे अपंगत्व आले तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र राहतील.

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान (Gopinath Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Anudan Yojana) योजनेच्या लाभास पात्र असणाऱ्या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांनी अथवा त्यांच्या वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी “गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना – Gopinath Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Anudan Yojana” या योजनेंतर्गत लाभास पात्र ठरणार नाही.

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान (Gopinath Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Anudan Yojana) योजनेअंतर्गत पात्रतेसाठी १) रस्ता/रेल्वे अपघात २) पाण्यात बुडून मृत्यू ३) जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा ४) विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात. ५ वीज पडून मृत्यू ६) उंचावरून पडून झालेला अपघात ७) सर्पदंश व विचुदंश ८) जनावरांच्या हल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी / मृत्यू ९) बाळंतपणातील मृत्यु १०) दंगल ११) अन्य कोणतेही अपघात इ. अपघातांचा समावेश असेल.

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान (Gopinath Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Anudan Yojana) योजनेमध्ये १) नैसर्गिक मृत्यू २) योजना अंमलबजावणी पूर्वीचे अपंगत्व ३) आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करुन घेणे ४) गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात ५) अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असतांना झालेला अपघात ६) भ्रमिष्टपणा ७) शरीरातर्गत रक्तस्त्राव ८) बैलगाड्यांची / मोटार शर्यतीतील अपघात ९) युध्द १०) सैन्यातील नोकरी ११) जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा समावेश असणार नाही.

आवश्यक कागदपत्रे:

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान (Gopinath Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Anudan Yojana) योजनेचे लाभ प्राप्त होण्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील. –

१) ग्रामसेवक यांच्याकडील ऊसतोड कामगार असल्याबाबत ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र.

२) मृत्यूचा दाखला.

३) ऊसतोड कामगाराचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. ६. क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.

४) ऊसतोड कामगाराच्या वयाची पडताळणी करीता शाळा सोडल्याचा दाखला / आधारकार्ड / निवडणूक ओळखपत्र. ज्या कागदपत्रांच्या आधारे वयाची ओळख खात्री होईल अशी कोणतीही कागदपत्रे.

५) प्रथम माहिती अहवाल / स्थळ पंचनामा / पोलीस पाटील माहिती अहवाल

६) झोपडी आणि सामुग्रीचे वस्तूंचे आग / दंगल/संप/वादळ महापूर इ. मुळे नुकसान झाल्यास नुकसानीचा फोटो, नुकसानीची यादी, पंचनामा

७) अपघाताच्या स्वरुपानुसार प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रेः

अपघाताच्या स्वरुपानुसार ” गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना – Gopinath Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Anudan Yojana” प्रस्तावासोबत सादर करायवाची कागदपत्रे

अ. क्र.अपघाताचे स्वरुपआवश्यक कागदपत्रे
रस्ता रेल्वे अपघातप्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टेम अहवाल
पाण्यात बुडून मृत्यूप्रथम माहिती अहवाल / पोलीस पाटील अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल व अशा प्रकारच्या अपघातातील मृत व्यक्तीचे प्रेत न सापडल्यास ६ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर कुटूंबातील सदस्याचे घोषणापत्र (Declaration) व अपघातग्रस्त खातेदाराचा बुडून मृत्यू झाल्याचे सक्षम प्राधिका-याचे तलाठी/ग्रामसेवक प्रमाणपत्र
विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघातप्रथम माहिती अहवाल / पोलीस पाटील अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टम अहवाल
वीज पडून मृत्यूप्रथम माहिती अहवाल / पोलीस पाटील अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टम अहवाल,
उंचावरुन झालेला अपघात पडूनप्रथम माहिती अहवाल / पोलीस पाटील अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टेम अहवाल
जंतुनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधाप्रथम माहिती अहवाल / पोलीस पाटील अहवाल, पोस्ट मॉर्टम अहवाल, व्हिसेरा रिपोर्ट, (रासायनिक विश्लेषण अहवाल)
सर्पदंश/जनावराने चावा घेणे/रेबीज/ कोणत्याही प्राण्याने जखमी केल्यामुळे अपंगत्व येणे किंवा मृत्यू ओढावणे.उपलब्धतेनुसार प्रथम माहिती अहवाल, पोलीस पाटील अहवाल. इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल (Viscera Report), शव विच्छेदन अहवाल (P. M. Report) किंवा वैद्यकीय विश्लेषण अहवाल उपलब्ध होऊ शकत नसल्यास अशा प्रकरणी अपघातग्रस्ताच्या अपंगत्व अथवा मृत्यूबाबतचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिकाने दिलेले प्रमाणपत्र, किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र येथील सक्षम अधिका- वाने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. श्रापदाने अपघातग्रस्ताचे शरीर ओवत नेल्यामुळे व खाऊन टाकल्यामुळे मृतदेह सापडत नसल्यास ६ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर कुटूंबातील सदस्याचे घोषणापत्र (Declaration) व अपघातग्रस्त व्यक्ती श्रापदाच्या हल्ल्यामुळे मृत्यू पावली असे सक्षम प्राधिका-याचे (तलाठी ग्रामसेवक) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
दंगलीमध्ये अपंगत्व अथवा मृत्यूप्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल
आगीमुळे अपघात झालेलाप्रथम माहिती अहवाल पोलीस पाटील अहवाल, पोस्टमॉर्टम अहवाल (जर अपघातग्रस्त ऊसतोड मजूराचे शरीर आगीत पूर्णपणे जळून भस्म झाले असेल तर अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांचे घोषणापत्र (Declaration) व सक्षम प्राधिकाऱ्याचे (तलाठी/ग्रामसेवक) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे)
१०बाळतपणातील मृत्यूबाळंतपणात मृत्यू झाला असल्याबाबत शासकीय आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांचे प्रतिस्वाक्षरीसह प्रमाणपत्र,
११अन्य कोणतेही अपघातप्रथम माहिती अहवाल / पोलीस पाटील अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, आणि सक्षम प्राधिका-याने अपघात पडून मृत्यू झाल्याचे कायमच अपंगत्व आल्याचे दिलेल्या प्रमाणपत्राची साक्षांकित सत्य प्रत.
१२१, रस्ता, रेल्वे अपघात २. विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात ३. आगीमुळे झालेला अपघात ४. वीज पडल्याने ५. सर्पदंश झाल्यामुळेनमूद कारणामुळे बैलास अपंगत्व आल्यास, १. पशुवैद्यकीय प्राधिकरणाने जारी केलेले अपंगत्व प्रमाणपत्र, २. बैलाचा कानात टॅग असलेला फोटो (३ प्रती). ३. साखर कारखान्याच्या कृषी कार्यालयाचा अहवाल. ४. पांजरपोळ गोशाळेत बैल जमा केल्याचे प्रमाणपत्र,
नमूद कारणांमुळे बैलांचा मृत्यू झाल्यास, १. बैलाचा शव विच्छेदन अहवाल २. बैलाचा कानात टॅग असलेला फोटो (३ प्रती) ३. साखर कारखान्याच्या कृषी कार्यालयाचा अहवाल
१३क्रमांक १ ते १२ मधील नमूद कारणांव्यतिरिक्त इतर काही कारणांमुळे मृत्यू/अपंगत्व आले असल्यास अशा विवक्षित प्रकरणात जिल्हा समितीने विभागीय समितीच्या सहमतीने निर्णय घ्यावा.

जेव्हा ऊसतोड कामगार, बाहतूक कामगार व मुकादम तसेच त्यांची बैलजोडी माच्या अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे ३० दिवसाच्या आत सादर करावा, यासाठी सामाजिक न्याय विभागाचे सर्व क्षेत्रिय अधिकारी/ कर्मचारी संबंधितांना मार्गदर्शन करतील.

अपघातग्रस्त ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित समाज कल्याण अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून त्याबाबतचा अहवाल घटना झाल्यापासून ८ दिवसांच्या आत सादर करत्तील.

संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करून पात्र असलेले प्रस्ताव संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये ३० दिवसाच्या आत सादर करण्यात यावेत. सदर समिती मार्फत मंजूर प्रस्ताव गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास पाठविले जातील. त्यानुसार गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ यांच्यामार्फत संबंधित अपघातग्ररत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्या कुटुंबाच्या वारसदारांच्या बैंक खात्यात ECS द्वारे अनुदान वाटप करण्यात येईल.

योजनेअंतर्गत अनुदानासाठी मृत कामगाराचे वारसदार पात्रता प्राधान्यक्रम:

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाने साखर कारखान्यांकडून रु. १० प्रति टन प्रमाणे प्राप्त होणा-या निधीतून सदर खर्च करावा. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ योजनेअंतर्गत (Gopinath Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Anudan Yojana) अनुदानासाठी मृत कामगाराचे वारसदार पुढील प्राधान्यक्रमाने पात्र असतील.

  1. मृत कामगाराची पत्नी / पती
  2. मूत कामगाराची अविवाहित मुलगी
  3. मृत कामगाराची आई
  4. मृत कामगाराचा मुलगा
  5. मृत कामगाराचे वडील
  6. मृत कामगाराची सून
  7. अन्य कायदेशीर वारसदार

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडन सानुग्रह अनुदान योजना – Gopinath Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Anudan Yojana” या योजनेअंतर्गत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्या वारसदारांना तातडीने मदत मिळण्यासाठी शासन निर्णयाच्या प्रस्तावनेत नमूद जिल्हयांकरीता जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान (Gopinath Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Anudan Yojana) योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे यांची राहील. तसेच व्यवस्थापकीय संचालक, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे यांनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रत्येक ३ महिन्यास आढावा घेऊन त्याबाबचा प्रगती अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक राहील.

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय: गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना बाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पुढील लेख देखील वाचा!

  1. ऊसतोड कामगार नोंदणी : स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभासाठी ग्रामसेवक देणार ओळखपत्र !
  2. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान योजना – Subsidy Scheme for Purchase of Sugarcane Cutting Machine
  3. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणा-या मजुरांना मस्टर बंद होण्याच्या 8 दिवसाच्या आत मजूरी मिळणार, शासन निर्णय जारी

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.