Godown Subsidy Scheme : गोदाम बांधकाम अनुदान योजनेसाठी अर्ज सुरु २०२४ !
अन्नधान्य उत्पादनाच्या सुधारित साठवणुकीसाठी व मूल्यवृद्धीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे. योजनेत 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी (Godown Subsidy Scheme) प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लक्ष 50 हजार यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान मिळते.
गोदाम बांधकाम अनुदान योजनेसाठी अर्ज सुरु २०२४ ! Godown Subsidy Scheme :
अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य सन 2024-25 अंतर्गत, स्थानिक पुढाकाराच्या बाबींतंर्गत, शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (FPO/FPC) करिता गोदाम बांधकाम (250 मे.टन क्षमता) या बाबीचा भौतिक संख्या व आर्थिक रक्कम लक्षांक राज्यातील जिल्ह्यांस प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (FPO/FPC) यांनी आपले अर्ज 31 जुलै 2024 पूर्वी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्यामार्फत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
अनुदान:
लाभार्थी निवड ऑगस्ट 2024 मध्ये होईल. लक्षांकाच्या तुलनेत अर्ज जास्त आल्यास सोडत पध्दतीने निवड करण्यात येईल. अन्नधान्य पिके, कडधान्य पिके घेतली जातात तथापि गोदामाची व्यवस्था नाही अशा ठिकाणी गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा रक्कम 12.50 लाख रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.
कोण सहभाग घेऊ शकतात?
इच्छूक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना किंवा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार पात्र ठरेल.
निकष:
ही बाब बँक कर्जाशी निगडीत आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी या बाबीच्या लाभास पात्र राहील. गोदाम बांधकामाचे मंजूर लक्षांक व मार्गदर्शक सुचनेनुसार अंमलबजावणी करण्यात येईल.
बीज प्रक्रिया संच व गोदाम सुविधेसाठी (Godown Subsidy Scheme) जुलैच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा. जिल्ह्यासाठी प्राप्त लक्ष्यांकापेक्षा अधिक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीचे अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समितीच्या मान्यतेने सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होते.
अर्ज कुठे करावा?
गोदाम बांधकाम अनुदान (Godown Subsidy Scheme) योजनेसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे अर्ज करावा, व इतर तांत्रिक माहितीसाठी देखील आपण आपल्या तालुक्यातील कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!