महावितरणच्या ‘गो- ग्रीन’ योजनेंतर्गत नोंदणी करा आणि दरमहा वीजबीलामध्ये 10 रुपये वाचवा – MSEDCL Go Green Ebill Application
ग्राहकांना ऑनलाइन वीजबिल भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारतील, अशा सर्व ग्राहकांना प्रती बिल १० रुपये सवलत दिली जाणार आहे.
महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलाची माहिती व वीजबिल भरण्यासाठी मोबाइल ॲप व महावितरणच्या पोर्टलवर ऑनलाइनसह विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबिलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. या सर्व ग्राहकांना प्रतिबिलची नोंदणी महावितरणच्या मोबाइल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन करावी लागणार आहे.
गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून, संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही सोपे राहणार आहे. तसेच गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे. वीजग्राहकांनी जास्तीत जास्त कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणच्या ‘गो- ग्रीन’ योजनेंतर्गत नोंदणी करण्याची प्रोसेस – MSEDCL Go Green Ebill Application Registration:
‘गो- ग्रीन’ योजनेंतर्गत नोंदणी करण्यासाठी सर्व प्रथम खालील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या पोर्टलला भेट द्या.
https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp
पोर्टल ओपन झाल्यानंतर Go Green Registration मेनू मध्ये ग्राहक जोडणी प्रकार, ग्राहक क्रमांक, आणि बिलिंग युनिट एन्टर करून Search Consumer पर्यायावर क्लिक करा.
पुढे छापिल वीजदेयकांमध्ये नमूद असलेला 15 अंकी GGN क्रमांक प्रविष्ट करा आणि Submit बटनवर क्लिक करा.
15 अंकी GGN क्रमांक सबमिट केल्यानंतर तुम्हाला ईमेल पाठवला जाईल. कृपया GoGreen अर्ज पूर्ण करण्यासाठी ईमेलमध्ये प्रदान केलेल्या पुष्टीकरण दुव्यावर क्लिक करा. पुढील बिलिंग सायकलपासून, तुम्हाला नोंदणीकृत मेल आयडीवर ई-बिल प्राप्त होईल.
सुचना:
- छापिल वीजदेयकांमध्ये नमूद असलेला 15 अंकी GGN क्रमांक प्रविष्ट करा (स्क्वेअर बॉक्समध्ये)
- आपण नोंदणी केल्यास आपल्या पत्त्यावर हार्ड कॉपी बिल प्राप्त होणार नाही. त्याऐवजी आपल्याला नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर ई-बिल मिळेल.
- गो-ग्रीन नोंदणी पूर्ण करण्यासाठी कृपया मेलद्वारे पाठविलेल्या लिंक वर क्लिक करा.
- नोंदणीनंतर ग्राहकांना पुढील बिलात रु. 10 / – प्रति बिल Go -Green सवलत मिळेल.
- आपले बिल ई-मेल वर मिळवा. आपले ई-बिल स्पॅम फोल्डरमध्ये अडकू नये यासाठी कृपया आपल्या ॲड्रेस बुकमध्ये महावितरणचा ईमेल पत्ता msedcl_ebill@mahadiscom.in जोडा.
गो ग्रीन नोंदणी रद्द करण्यासाठी लिंक (Go Green Unsubscription):
तुम्हाला गोग्रीनचे सदस्यत्व रद्द करायचे असल्यास खालील लिंकला भेट द्या.
https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreenUnsubscribe.jsp
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!