सरकारी योजनाघरकुल योजनावृत्त विशेष

ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची घरकुल यादी ऑनलाईन पोर्टलवर कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर !

जर आपण ग्रामीण आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला असेल तर आता सरकारनं लाभार्थ्यांची नावं (Gharkul Yadi Online) जाहीर करायला सुरुवात केली आहे. आपल्या घरकुलासाठी केलेल्या ज्या अर्जांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्या त्या लाभार्थ्यांची नावे जाहीर केली जात आहेत. जसं जसं लाभार्थ्यांची नावं मंजूर होतील, तसंतशी त्यांची नावं या यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. या लेखामध्ये आपण ही घरकुल यादी कशी पाहायची, याची माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत पाहणार आहोत.

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस – Gharkul Yadi Online:

घरकुलासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी PMAY-G च्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाते. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला खालील प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण विभागाची वेबसाईट ओपन करा.

https://pmayg.nic.in/netiay/home.aspx

यानंतर तुमच्यासमोर PMAY-G वेबसाईट ओपन होईल. आता वरच्या बाजूला असलेल्या Awaassoft या पर्यायावर जाऊन यातील दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे Report यावर क्लिक करा.

Awaassoft - Report - Gharkul Yadi Online
Awaassoft – Report

आता एक नवीन RHReporting वेब पेज तुमच्यासमोर ओपन होईल, त्यामध्ये PMAY-G Report पर्यायामध्ये वेगवेगळे रिपोर्ट दिलेले तुम्हाला दिसून येतील. त्यातील सगळ्यात शेवटच्या Social Audit Reports मधील Beneficiary Details for Verification वर क्लिक करा.

Beneficiary Details for Verification : Gharkul Yadi Online
Beneficiary Details for Verification

पुढे MIS Report चे एक वेब पेज ओपन होईल यापेजवर Selection Filters या पर्यायाखालील स्थानिक लोकेशनुसार पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.

त्यामध्ये सुरुवातीला राज्य, त्यानंतर जिल्हा, मग तालुका आणि सगळ्यात शेवटी गाव निवडायचं आहे. हे निवडून झालं की मग तुम्हाला कोणत्या वर्षीची यादी पाहायची आहे ते वर्ष निवडायचं आहे.

आता आपल्याला ज्या वर्षातील लाभार्थ्यांची यादी पाहायची आहे ते वर्ष निवडा.

त्यानंतर कोणत्या विविध घरकुल योजनेचे पर्याय दिसतील त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण) योजनेची यादी पाहण्यासाठी “Pradhan Mantri Awas Yojana Gramin” हा पर्याय निवडू. तुम्ही इथे दुसऱ्या योजनेचीही यादी (Gharkul Yadi Online) पाहू शकता.

तसेच नंतर समोर दिलेल्या बेरीज किंवा वजाबाकीच्या प्रश्नाचं उत्तर कॅप्चाच्या रकान्यात टाकायचं आहे.

शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी ओपन होईल.

MIS Report - Gharkul Yadi Online
MIS Report

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील कुणाला घरकुल मंजूर (Gharkul Yadi Online) करण्यात आलं, याची माहिती पाहू शकता.

हेही वाचा – ग्रामीण लाभार्थ्यांची घरकुल यादी (Gharkul Yadi Online), हप्त्याचा तपशील व FTO ट्रॅकिंग ई. ऑनलाईन चेक करा !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.