वृत्त विशेष

नांदेड जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांनी सेतू केंद्रात अर्ज करून मिळवावी विनामूल्य रेती

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून ज्यांना घरकुल मिळाली आहेत अशा लाभार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने मोफत रेतीसाठा उपलब्ध केला आहे. शासन निर्णयानुसार सेतू केंद्रात अर्ज करून घरकुल लाभार्थी मोफत रेतीसाठा घरासाठी मिळवू शकणार आहे.

शासन निर्णयानुसार जिल्ह्यात घरकुलाच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात 3 हजार ६६२ लाभार्थ्यांसाठी एकूण १७ हजार ३७२ ब्रास रेतीसाठा वितरित करण्यात आला आहे. अशा विनामुल्य वाळु उपलब्ध करुन दिलेल्या घरकुलाच्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनाने https://nanded.gov.in/en/notice_category/announcements/ या वेबसाईटवर जाहीर केली आहे.

घरकुलाच्या विविध योजनातून ज्यांना शासकीय घर मंजूर करण्यात आले आहे. अशा मंजुर घरकुल लाभार्थीची माहिती महाखनिज प्रणाली या वेबसाईटवर नोंदविण्यात आली आहे. या यादीमध्ये नोंद असलेल्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या 19 एप्रिल 2023 व 16 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयान्वये बांधकाम करण्यास मोफत रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच जिल्हा प्रशासनाने वाळु डेपोमध्ये वाळू डेपोनिहाय रेतीसाठा आरक्षित केला आहे याची माहिती सुध्दा https://nanded.gov.in/en/notice_category/announcements/  या वेबसाईटवर जाहीर केली आहे. जिल्ह्यामध्ये आता घरकुल लाभार्थ्यांसाठी एकूण 18,633 ब्रास रेती आरक्षित करण्यात आली आहे. यामध्ये देगलूर उपविभागात देगलूर तालुक्यात शेवाळा येथे ४४४,तमलूर येथे ३३० तर शेखापूर येथे ३९३ ब्रास रेसीसाठा उपलब्ध आहे. बिलोली उपविभागात येसगी १९९९, नागणी ४८९, सगरोळी – १ येथे १८३९,सगरोळी -२ येथे ४८९१ तर हुनगुंदा १२६०, गंजगाव ६३०, बोळेगाव २४ ब्रास साठा राखीव आहे. उपविभाग हदगाव बेलमंडल या डेपोमध्ये ४९२, उपविभाग किनवट माहूर तालुक्यामध्ये केरोळी ८३९, कोळी बे. ६४५ तर धर्माबाद उपविभागात बळेगाव ६९३ रेतीसाठा उपलब्ध आहे.कंधार उपविभागात येळी १२६, बेटसावंगी १२९२ साठा उपलब्ध आहे. नांदेड उपविभागात खुपसरवाडी १४८२, भायेगाव १७२, वाघी ५८५ ब्रास रेतीसाठा आरक्षित आहे.

अत्यंत सोप्या पद्धतीने ही रेती लाभार्थ्यांना मिळणार आहे त्यासाठी फक्त वाळूची आवश्यकता असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांनी नजीकच्या सेतू केंद्रात जाऊन संपर्क करावा. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून विनामूल्य वाळू उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

हेही वाचा – वाळू मिळणार ऑनलाइन राज्य सरकारकडून सुधारित वाळू धोरणाला मंजुरी

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.