आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत असे बनवा आभा हेल्थ आयडी कार्ड ऑनलाईन – Generate your ABHA Health ID Online

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा) चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि ती ही डिजिटल स्वरूपात मिळावी, म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. सामान्यतः रुग्ण आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कागदी फाईल दिली जाते. दरवेळी तपासणीसाठी रुग्णांना फाईल सोबत बाळगावी लागते. त्याचप्रमाणे डॉक्टरांनासुद्धा मागील सर्व रिपोर्ट्स तपासून पहावे लागतात. या सर्व बाबीचा विचार करता शासनाकडून आता नागरिकांना आभा आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. आभा आरोग्य कार्ड म्हणजेच आयुष्मान भारत आरोग्य खाते होय. आभा कार्ड नावाने डिजिटल स्वरूपातील हेल्थ आयडी मिळणार असून, या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या, केलेले उपचार इत्यादी माहिती साठविली जाणार आहे. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आभा कार्डवर साठविली जाणार असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार आदींची माहिती जलद आणि सोयीस्करपणे समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.

आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे. या हेल्थ कार्डचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

आभा कार्डसाठी आधार कार्ड आणि आधार संलग्न असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. आभा कार्ड मुळे उपचार करण्यासाठी प्रत्येक जागी रिपोर्ट आणि कागदपत्र घेऊन जाण्याची गरज नाही. आभा कार्डमध्ये तुमचा ब्लड ग्रुप, आजार, मेडिकल इत्यादीबदलची संपूर्ण माहिती असेल. ऑनलाईन उपचार, टेलिमेडिसिन, ई- फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड इत्यादी सुविधा यामध्ये नागरिकांना मिळतील. आपला मेडिकल रिपोर्ट किंवा रेकॉर्ड सहजरित्या तुम्ही हॉस्पिटल, मेडिकल, इन्शुरन्स यांना शेअर करू शकाल, असे अनेक फायदे आभा कार्डचे आहे.

आयुष्यमान भारत डिजिटल मिशनबद्दल :

जन धन, आधार आणि मोबाईल (जेएएम) आणि सरकारच्या इतर डिजिटल उपक्रमांद्वारे रचलेल्या पायावर आधारित, पीएम-डीएचएम व्यापक डेटा, माहिती आणि पायाभूत सेवांच्या तरतुदीद्वारे एक वेगवान ऑनलाइन मंच तयार करेल आणि आरोग्य-संबंधित वैयक्तिक माहितीची सुरक्षा, गोपनीयता आणि खासगीपणा सुनिश्चित करताना खुल्या, आंतर परिचालन, मानकांवर आधारित डिजिटल प्रणालींचा योग्य वापर करेल. मिशन त्यांच्या संमतीने नागरिकांच्या आरोग्य नोंदींमध्ये प्रवेश आणि देवाणघेवाण सक्षम करेल.

पीएम-डीएचएमच्या मुख्य घटकांमध्ये प्रत्येक नागरिकाचे आरोग्य ओळखपत्राचा समावेश आहे जे त्यांचे आरोग्य खाते म्हणून देखील काम करेल आणि त्याच्याशी वैयक्तिक आरोग्य नोंदी जोडल्या जाऊ शकतात आणि मोबाईल ऍप्लिकेशनचं मदतीने पाहिल्या जाऊ शकतात. हेल्थकेअर प्रोफेशनल्स रजिस्ट्री (एचपीआर) आणि हेल्थकेअर फॅसिलिटीज रजिस्ट्रीज (एचएफआर) हे आधुनिक आणि पारंपारिक औषध पद्धतीच्या सर्व आरोग्य सेवा प्रदात्यांचे केंद्र म्हणून काम करतील. यामुळे डॉक्टर/रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी व्यवसाय करणे सुलभ होईल.

मिशनचा एक भाग म्हणून तयार केलेले पीएम-डीएचएम सँडबॉक्स हे तंत्रज्ञान आणि उत्पादन चाचणीसाठी एक चौकट म्हणून काम करेल जे जे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेचा भाग बनू इच्छिणाऱ्या खाजगी कंपन्यां आणि संघटनांना मदत करेल. ते आरोग्य माहिती प्रदाते किंवा आरोग्य माहिती वापरकर्ता बनतील किंवा पीएम-डीएचएमशी कार्यक्षमतेने जोडले जातील.

हे मिशन डिजिटल आरोग्य परिसंस्थेत आंतर परिचालन क्षमता निर्माण करेल, ज्याप्रमाणे पेमेंटमध्ये क्रांतिकारी बदल करण्यात युनिफाइड पेमेंट इंटरफेसने भूमिका बजावली होती. आरोग्य सेवा सुविधांचा लाभ घेण्यापासून नागरिक केवळ एक क्लिक दूर असतील.

हेल्थ आयडी म्हणजे काय?

ABDM मध्ये भाग घेण्याची इच्छा असणारे आणि त्यांचे आरोग्य रेकॉर्ड डिजिटल उपलब्ध करून देणारे कोणीही हेल्थ आयडी तयार करून सुरुवात करावी. हेल्थ आयडी हा यादृच्छिकपणे तयार केलेला 14 अंकी क्रमांक आहे ज्याचा वापर व्यक्तींना विशिष्टपणे ओळखणे, त्यांचे प्रमाणीकरण करणे आणि त्यांचे आरोग्य रेकॉर्ड (केवळ त्यांच्या सूचित संमतीने) अनेक प्रणाली आणि भागधारकांमध्ये धागा घालण्यासाठी केला जातो.

PHR एड्रेस काय आहे? 

PHR (पर्सनल हेल्थ रेकॉर्ड्स) एड्रेस हे स्वयं घोषित केलेले वापरकर्ता नाव आहे जे हेल्थ इन्फॉर्मेशन एक्सचेंज आणि संमती व्यवस्थापक (HIE-CM) मध्ये साइन इन करण्यासाठी आवश्यक आहे. प्रत्येक आरोग्य ID ला डेटा शेअरिंग सक्षम करण्यासाठी संमती व्यवस्थापकाशी जोडणे आवश्यक आहे. सध्या, सर्व हेल्थ आयडी वापरकर्ते हेल्थ आयडी साइन अप दरम्यान त्यांचा स्वतःचा PHR पत्ता व्युत्पन्न करू शकतात.

हेल्थ आयडी – Health ID :

हेल्थ आयडी वापरणे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित आणि कार्यक्षम डिजिटल आरोग्य रेकॉर्ड तयार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. तुम्ही डिजिटल सुरक्षित आरोग्य आयडी तयार करण्यासाठी निवड करू शकता, जे तुम्हाला तुमच्या आरोग्य संमतीसह सहभागी आरोग्य सेवा प्रदाते आणि देयकांसह तुमच्या आरोग्य डेटामध्ये प्रवेश आणि शेअर करण्याची परवानगी देते.

तुमचा हेल्थ आयडी ही तुमच्या आरोग्य नोंदी डिजिटल पद्धतीने ऍक्सेस आणि शेअर करण्याची एक त्रास-मुक्त पद्धत आहे. हे सहभागी आरोग्य सेवा प्रदात्यांशी तुमचा संवाद सक्षम करते आणि तुम्हाला सत्यापित आरोग्यसेवा व्यावसायिक आणि आरोग्य सेवा प्रदात्यांकडून तुमचे डिजिटल लॅब अहवाल, प्रिस्क्रिप्शन आणि निदान अखंडपणे प्राप्त करण्याची परवानगी देते.

  • डिजिटल आरोग्य नोंदी (Digital Health Records) : प्रवेशापासून उपचारांपर्यंत आणि पेपरलेस पद्धतीने डिस्चार्ज करण्यापर्यंत तुमच्या माहितीवर प्रवेश करा.
  • वैयक्तिक आरोग्य नोंदी (Personal Health Records – PHR) : रेखांशाचा Personal Health Records (PHR) आरोग्य इतिहास तयार करण्यासाठी आपल्या वैयक्तिक आरोग्य रेकॉर्ड (PHR) ला आरोग्य ID सह प्रवेश करा आणि जोडा.
  • डॉक्टरांना प्रवेश (Access to doctors) : देशभरातील सत्यापित डॉक्टरांना प्रवेश सक्षम करते.
  • नामनिर्देशित जोडा (Add a nominee) : तुमचा हेल्थ आयडी ऍक्सेस करण्यासाठी नामनिर्देशित जोडा आणि तुमचे रेकॉर्ड पहा किंवा मदत करा.
  • बाल आरोग्य ओळखपत्र (Child Health ID) : आपल्या मुलासाठी हेल्थ आयडी तयार करा आणि अशा प्रकारे जन्मापासूनच डिजिटल आरोग्य रेकॉर्ड तयार करा.

हेल्थ आयडी कार्ड ऑनलाईन काढण्यासाठी प्रोसेस:

हेल्थ आयडी कार्ड ऑनलाईन काढण्यासाठी सर्व प्रथम खालील राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन (NDHM) च्या पोर्टलला भेट द्या.

https://healthid.ndhm.gov.in/register

राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन (NDHM) पोर्टल ओपन झाल्या नंतर खाली चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे, तुमचा मोबाईल नंबर जर आधार कार्डला लिंक असेल तर “Generate Via Aadhaar” वर क्लिक करा आणि आधार कार्डला लिंक नसेल तर “I don’t have Aadhaar / I don’t want to use my Aadhaar for creating Health ID.” च्या पुढे “Click here” वर क्लिक करा आणि लॉगिन करा किंवा अगोदरच आरोग्य आयडी असेल तर Already have a Health ID? च्या पुढे “Login” वर क्लिक करा.

मी इथे “Generate Via Aadhaar” वर क्लिक करणार आहे.

Generate your Health ID
Generate your Health ID

आता इथे आधार नंबर किंवा वर्चुअल आयडी टाका आणि I Agree वर क्लिक करून I’m not a robot वर क्लिक करा आणि Submit बटन वर क्लिक करा.

Aadhaar Number
Aadhaar Number

नंतर मोबाइलवर ओटीपी येईल तो एन्टर करा.

ओटीपी
ओटीपी

आता इथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी येईल तो टाका.

मोबाईल नंबर
मोबाईल नंबर

पुढे तुमचा आधार कार्ड वरची माहिती हेल्थ आयडी कार्डसाठी जनरेट होईल त्यामध्ये तुम्ही तिथे बदल करू शकता. (उदा. फोटो, ई-मेल आयडी, राज्य आणि जिल्हा निवडा) तसेच PHR Address मध्ये तुमचे युजरनेम टाका ( उदा. msdhulap हे मी युजनेमसाठी माझ्या नावातील अक्षरे टाकणार आहे.)

वरील सर्व माहिती भरल्यानंतर “Submit” बटन वर क्लिक करा. पुढे तुमचा Health ID Card तयार झालेला दिसेल तो “Download Health ID Card” वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.

Download Health ID Card
Download Health ID Card

या डिजिटल आभा आरोग्य कार्डचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी आपले ‘आभा’ कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

संपर्क : तुम्हाला तुमच्या हेल्थ आयडीमध्ये समस्या येत असल्यास कृपया ndhm@nha.gov.in वर संपर्क साधा किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करा- 1800-11-4477 / 14477

हेही वाचा – राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आरोग्य नोंदी व्यवस्थापन करण्यासाठी सुधारित आभा (ABHA) मोबाईल अ‍ॅप्लिकेशन

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.