गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ !
राज्यातील गट प्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या गट प्रवर्तकांच्या मानधनात (Gatpravartak Mandhan) मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ ! Gatpravartak Mandhan:
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कामकाज करीत असतात. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतुन अनुक्रमे रु. ५०००/- व रु. १०००/- इतकी वाढ करण्यात आलेली आहे.
सद्यस्थितीत आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून रु. १०,०००/- व केंद्र शासनाच्या निधीतून रु. ३०००/- असे एकुण रु. १३,०००/- इतके मानधन अदा करण्यात येते.
तसेच, गटप्रवर्तकांना राज्य शासनाच्या निधीतून रु. ७२००/- व केंद्र शासनाच्या निधीतून रु. ८७७५/- अशी एकुण रु. १५,९७५/- इतके (Gatpravartak Mandhan) मानधन अदा करण्यात येते.
आशा स्वयंसेविकांना रु. ५०००/- इतकी तर त्याचवेळी गटप्रवर्तकांना केवळ रु. १०००/- इतकी वाढ (Gatpravartak Mandhan) मंजूर करण्यात आली आहे.
सदर वाढीमध्ये असलेल्या मोठ्या तफावतीमुळे गटप्रवर्तकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. तसेच, सदर तफावत दुर करण्याबाबत वारंवार निवेदने प्राप्त होत असल्यामुळे; सद्यस्थितीत महागाईच्या निर्देशांकात होत असलेली वाढ तसेच, आरोग्य व पोषण यासंदर्भातील गटप्रवर्तकांची भुमिका व जबाबदारी विचारात घेवून गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या दिनांक २५/०८/२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.
(१) “गट प्रवर्तक” यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये ७२००/- या मानधनात दरमहा एकूण रुपये ४०००/- एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.
(२) उपरोक्त प्रस्तावित केलेली वाढ एप्रिल, २०२४ या महिन्यापासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली.
(३) सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली रु. १७.५९ कोटी इतक्या अतिरिक्त आवर्ती वार्षिक खर्चाची तरतुद पुरवणी मागणीद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली.
सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय – Gatpravartak Mandhan GR:
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत गटप्रवर्तक यांच्या मानधनात (Gatpravartak Mandhan) वाढ करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पुढील लेख देखील वाचा!
- आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी 10 लाख, अपंगत्वासाठी 5 लाख !
- आशा स्वयंसेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, प्रशिक्षण, मानधन आणि जबाबदाऱ्या/कामे!
- अंगणवाडी सेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, पात्रता, अटी व शर्ती!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!