गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरवणे योजना !
रस्त्याच्या कडेला पादत्राणे दुरूस्त करुन गुजराण करणाऱ्या कष्टकरी हातांचे उन्हा-तान्हापासून संरक्षण करण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गटई कामगारांना उन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे, त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवन उंचवावे यासाठी संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (Lidcom) व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने पत्र्याचे स्टॉल देण्याची (Gatai Stall Yojana) योजना कार्यान्वित आहे.
गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरवणे योजना – Gatai Stall Yojana:
आवश्यक कागदपत्रे:
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- या योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र
योजनेसाठीच्या अटी पुढीलप्रमाणे:
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागात चाळीस हजार रुपये व शहरी भागात पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे (शासन निर्णय दि. 1.3.2008 अन्वये तहसिलदार यांच्या निर्गमित केलेल्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.).
- अर्जदार ज्या जागेत गटई स्टॉल मागत असले ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड (कॅन्टॉनमेंट बोर्ड) किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्यांची स्वमालकीची असावी.
- लाभार्थ्यांना स्टॉलचा ताबा दिल्यानंतर त्या स्टॉलची देखभाल दुरुस्ती इ. बाबी लाभार्थ्यांनी स्वत: करणे आवश्यक राहील.
- गटई पत्र्याचे स्टॉल हे एकाच घरात एकाच व्यक्तिला दिले जाईल.
- एकदा गटई स्टॉलचे वाटप झाल्यानंतर सदर स्टॉलची विक्री/ भाडे तत्वावर तसेच स्टॉलचे हस्तांतरण करता येणार नाही.
- गटई लाभार्थ्यांनी एकदा स्टॉलचा लाभ घेतला असल्यास पुन:श्च अर्ज करु नये.
गटई काम करणाऱ्या कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेचा लाभ देण्याकरिता सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातून कार्यालयीन वेळेत विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन आवश्यक त्या कागदपत्रांसोबत अर्ज भरुन या कार्यालयास सादर आवश्यक आहे.
संपर्क: सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण कार्यालय.
हेही वाचा – बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!