या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलर पंप; असा करा ऑनलाईन अर्ज !
कृषी विभागामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/ क्षेत्राबाहेरील) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनांतर्गत विविध योजना राबविण्यात येतात; त्यामध्ये या शेतकऱ्यांना मिळणार (Free Solar Pump) मोफत सोलर पंप. सन २०२४-२५ साठी मोफत सोलर पंप (Free Solar Pump) योजनांच्या लाभासाठी इच्छुक शेकऱ्यांनी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर ‘फार्मर’ लॉगइनवर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत केले आहे.
योजनेच्या लाभासाठी अटी-शर्ती:
- लाभार्थी शेतकरी हा अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील असावा.
- जात प्रमाणपत्र
- या योजनेअंतर्गत कमाल क्षेत्र मर्यादा ६ हेक्टर शेतजमीन राहील. त्याचप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल ६ हेक्टर धारण क्षेत्राची अट लागू असणार आहे.
- शेतकऱ्याच्या नावे जमिनीचा ७/१२ दाखला व ८-अ उतारा असणे आवश्यक आहे. (नगर पंचायत/ नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्राबाहेरील)
- लाभार्थ्याकडे स्वत:चे बँक खाते.
- बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
मोफत सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस ! Free Solar Pump:
मोफत सोलर पंप (Free Solar Pump) योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.
शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
“वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा.
ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.
अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
पुढे अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावर क्लिक करा. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
बाबी निवडा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका, गाव, गट क्र., ही माहिती दाखवली जाईल. त्याखाली बाब या पर्यायामध्ये सौर ऊर्जा चलित पंप हा पर्याय निवडायचा आहे व अटी व शर्थी मान्य करून जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
त्यानंतर किती अर्ज केले आहेत त्यानुसार प्राधान्यक्रम द्यायचा आहे व तुम्ही जर यापूर्वी कोणत्या योजनेसाठी अर्ज केला असेल तर पेमेंट करावं लागणार नाही जर पहिल्यांदा अर्ज केला असेल तर पेमेंट करावं लागणार आहे. पेमेंट केल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहे.
मोफत सोलर पंप (Free Solar Pump) योजनेसाठी तुम्हाला २३.६० एवढे शुल्क भरावे लागणार आहे.
आता मोफत सोलर पंप (Free Solar Pump) योजनेसाठी पेमेंट करण्याचा पर्याय निवडा. Proceed for Payment या पर्यायावर क्लिक करा. पेमेंट करण्याचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्हाला जो सोपा वाटेल तो पर्याय निवडून पेमेंट करा. शक्यतो क्यूआर कोड हा पर्याय पेमेंट करण्यासठी वापरा कारण तो अधिक सोपा आहे. पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या.
महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप: महाडीबीटी शेतकरी अॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका: शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800
या लेखात, आम्ही मोफत सोलर पंप (Free Solar Pump) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; असा करा ऑनलाईन अर्ज!
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
- कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी सुरु; असा करा ऑनलाईन अर्ज ! – Kusum Solar Pump Yojana Online Registration
- सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !
- कुसुम सोलर पंपाचे दर, कंपनी संपर्क व लाभार्थी यादी पहा ऑनलाईन !
- पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
- सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप” वर – MahaDBT Farmer App
- कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य (कृषी यांत्रिकीकरण) योजनेसाठी असा करा महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज!
- महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे !
- शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
- महाडीबीटी पोर्टल वरील योजना प्रभावीपणे राबविणेबाबत परिपत्रक जारी – MahaDBT Portal Schemes.
- महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!