eShram : मत्स्यव्यवसायाशी संबंधित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आवाहन
केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाच्या ई-श्रम (eShram) पोर्टलवर मत्स्यव्यवसाय कामगार, मत्स्यविक्रेते व मत्स्यव्यवसाय अनुषांगिक कामाशी प्रत्यक्ष सहभाग असलेले कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसायचे सहाय्यक आयुक्त जे. एस. पटेल यांनी केले आहे.
असंघटित क्षेत्रातील मत्स्यव्यवसाय कामगार, मत्स्यविक्रेते व मत्स्यव्यवसाय अनुषांगिक कामाशी प्रत्यक्ष सहभाग असलेले कामगारांना सामाजिक सुरक्षिततेच्या योजनांचे कवच मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाने ई-श्रम (eShram) संकेतस्थळा सुरु केले आहे. श्रमिकामधील अत्यंत वंचित घटकाला ई-श्रम संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख आणि संघटित रूप मिळवता येणार आहे.
केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाच्या https://register.eshram.gov.in/#/user/self या पोर्टलवर राज्य सरकार, कामगार संघटना आणि सामाईक सेवा केंद्र यांच्या मदतीने मत्स्यकामगारांची नोंदणी केली जाणार आहे. मत्स्यव्यवसायाशी संबंधित कामगारांचे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व बँक खात्याचा तपशील इत्यादी माहितीसह नोंदणी करता येईल.
नाव नोंदणीसाठी आवश्यक पात्रता
व्यक्ती भारताचा नागरिक आणि 16 ते 59 वर्षे वयोगटातील असावा. मत्स्यव्यवसाय, मत्स्यशेती क्षेत्रातील मच्छीमार व मत्स्यमुल्य साखळी इत्यादीमध्ये समाविष्ट असलेले मत्स्य कामगार, इम्प्लोयीज स्टेट इन्शुरन्स, एप्लोयीज प्रोव्हीडेंट फंड ऑर्गनायझेशनचे सभासद नसावेत, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व शासन सेवेतील कर्मचारी नसावेत. आयकर भरणारे नसावेत.
संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी 14434 हा राष्ट्रीय निःशुल्क संपर्क क्रमांक तयार करण्यात आला असून याद्वारे मच्छिमार, मत्स्यकास्तकारांना मार्गदर्शन आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. ई-श्रम (eShram) पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आधार क्रमांक, जन्म दिनांक, बँक खाते तपशील, मुळ गाव, संपर्क क्रमांक आणि सामाजिक श्रेणी यासारखी माहिती आवश्यक आहे.
मत्स्यकामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास मिळतील लाभ ! (eShram):
ई-श्रम (eShram) पोर्टलवर असंघटीत मजूर, मच्छीमार, मत्स्यशेती व मत्स्य अनुषंगिक कामामध्ये समावेश असलेले मजूर इत्यादींची एकत्रित माहिती आधार नंबरशी जोडून अपलोड करण्यात येईल. जे मच्छिमार, मत्स्यकास्तकार या पोर्टलवर नोंदणी करतील, त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत व्यक्ती मृत झाल्यास 5 लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये देणे शक्य होईल.
असंघटीत मच्छिमार/मत्स्यकास्तकारांना सामाजिक सुरक्षा फायदे या पोर्टलमार्फत देण्यात येणे शक्य होईल. पोर्टलवरील डेटाबेस, अचानक उद्भवणाऱ्या व राष्ट्रीय महामारी सारख्या परिस्थितीमध्ये, सहाय्यासाठी वापरता येणे शक्य होईल. असंघटीत क्षत्रातील मच्छिमार/मत्स्यकास्तकारांची माहिती घेऊन त्यानुसार सरकार विविध योजना आणि नियम तयार करू शकेल. सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनांचा लाभ असंघटीत क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहचू शकेल.
हेही वाचा – UMANG पोर्टल वरून असे बनवा ई-श्रम यूएएन कार्ड – E Shram Card
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!