माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत पहिले अपील करण्यासाठी काही सुचना !
माहितीचा अधिकार ही भारतीय संसदेची एक कृती आहे जी नागरिकांच्या माहितीच्या अधिकारासंदर्भात नियम व कार्यपद्धती ठरवते. मागील लेखा मध्ये आपण माहिती अधिकार कायदा कोणासाठी व कशासाठी? माहिती अधिकार कायद्याची व्याप्ती पहिली. आता आपण माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत पहिले अपील करण्यासाठी काही सुचना आहेत त्या पाहणार आहोत.
माहितीचा अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत पहिले अपील कधी करावे:
- तुमचा अर्ज लोकमाहिती अधिकार्याने फेटाळला असेल तर.
- ३० दिवस किंवा ४८ तासांच्या आत माहिती पुरवण्यास असमर्थ असेल तर.
- जर सार्वजनिक आस्थापनाने माहितीचे अर्ज स्वीकारण्यासाठी किंवा माहिती पुरवण्यासाठी सहाय्यक लोकमाहिती अधिकारी/लोकमाहिती अधिकारी नियुक्त केला नसेल तर.
- सहाय्यक लोकमाहिती अधिकार्याने अर्ज स्वीकारण्यस किंवा लोकमाहिती अधिकार्याकडे पाठविण्यास नकार दिला तर.
- जर लोकमाहिती अधिकार्याने दिलेला निकाल समाधानकारक नसेल तर.
- दिलेली माहिती अपूर्ण, चुकीची किंवा दिशाभूल करणारी आहे असे वाटत असेल तर.
- जर सरकारी अधिकार्याने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती देतांना घेतलेली फी अवाजवी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर.
पहिल्या अपीलासाठीची मुदत:
- राज्य/ केंद्रीय लोकमाहिती अधिकार्याने केलेला शेवटचा पत्रव्यवहार (निकाल किंवा विनंती नाकारल्याचे पत्र) मिळाल्याच्या तारखेपासून किंवा ठरवून दिलेली तारीख उलटल्यावर ९० दिवसांच्या आत.
- अपीलकर्त्याला माहिती न देण्याचे कारण प्रथम अपीलीय अधिकार्यास मान्य असल्यास ९० दिवसांनंतर ही अपील करता येते.
पहिल्या अपीलासाठी अर्ज लिहिणे:
- एका पांढर्या कागदावर तुमचा अर्ज लिहा
- अर्ज हस्तलिखित किंवा टंकलिखित ही असू शकतो.
- अर्ज इंग्रजी किंवा हिंदीत (केंद्रीय माहिती आयोगाकडे पाठवायचा असेल तर) किंवा त्या विशिष्ट राज्याच्या (राज्य माहिती आयोगाकडे पाठवायचा असेल तर) अधिकृत भाषेत असावा.
- हवी असलेली माहिती अर्जात विहित नमुन्यात स्पष्टपणे नमूद करावी.
- विनंतीअर्ज, फी दिल्याचा पुरावा, लोकमाहिती अधिकार्याने दिलेली पोचपावती, अर्जावर दिलेला निकाल, इ. कागदपत्रांची स्वसाक्षांकित छायाप्रत अर्जासोबत जोडा.
- प्रत्येक कागदपत्राच्या छायाप्रती तयार करा आणि त्या स्वतःच्या संदर्भासाठी जपून ठेवा.
ऑनलाईन RTI पहिले अपील करण्यासाठी इथे क्लिक करा. (Online RTI First Appeal Form)
पहिला अपील अर्ज कोठे पाठवावा:
- अर्ज त्याच आस्थापनाच्या प्रथम अपीलीय अधिकार्याकडे दाखल करावा.
- श्रेणीमध्ये प्रथम अपीलीय अधिकारी लोकमाहिती अधिकारी आणि सहाय्यक माहिती अधिकारी यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी असतो जो आवश्यक ती माहिती पुरवितो किंवा अर्ज नाकारू शकतो.
- पहिला अपीलीय अर्ज दाखाल करताना त्यावरील प्रथम अपीलीय अधिकार्याचे नाव, फी, फी देण्याची पद्धत तपासून पहा. (काही राज्यांमध्ये पहिले अपील मोफत असते तर काही राज्यांत त्यासाठी फी आकारण्यात येते.)
पहिला अपील अर्ज कसा पाठवावा:
- अर्ज केवळ रजिस्टर पोस्टाद्वारेच किंवा स्वहस्तेच पाठवावा.
- कुरिअर सेवा वापरणे टाळा.
- तसेच अर्जासोबत पोचपावती देखील जोडा
माहिती पुरविण्यासाठी कालमर्यादा:
- सर्वसामान्य प्रकरणांच्याबाबतीत निर्णय साधारणतः ३० दिवसांत दिला जातो. अपवादात्मक स्थितीत ही मर्यादा ४५ दिवसांपर्यंत जाऊ शकते.
- प्रथम अपीलीय अधिकार्याकडे अर्ज पोहोचल्याच्या दिवसापासून निर्णयासाठी कालमर्यादा मोजली जाते.
माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत नमुना अर्ज PDF:
माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत नमुना अर्ज PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
पुढील माहिती अधिकार कायदा (RTI) संबंधित लेख देखील वाचा!
- माहिती अधिकार कायदा (RTI) कोणासाठी व कशासाठी? माहिती अधिकार कायद्याची व्याप्ती.
- माहितीचा अधिकाराचा वापर कसा करावा आणि त्याबाबतची सूत्रे (RTI).
- माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन मोबाईलद्वारे माहिती मिळवण्यासाठी विंनती अर्ज कसा करायचा?
- माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी विनंती अर्ज कसा करायचा हे जाणून घ्या सविस्तर.
- 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणेबाबत शासन नियम !
- माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत दुसरे अपील करण्यासाठी काही सुचना!
- माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 नागरिकांना अवलोकनासाठी अभिलेख उपलब्ध करुन देणेबाबत शासन नियम!
- माहितीच्या अधिकाराचा हक्क म्हणजे काय ? जाणून घ्या सविस्तर
- माहिती अधिकार कायद्यान्वये सर्व नागरिकांना दिलेले अधिकार, विषयी सविस्तर माहिती!
- माहिती अधिकाऱ्याला कोणती माहिती देणे नाकारता येईल? जाणून घ्या सविस्तर (माहिती अधिकार कलम ८ : माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद)
- अर्जदारास माहितीच्या शुल्काची रक्कम अर्ज प्राप्त झाल्यानंतर 10 दिवसांत जलदगती कळविण्याबत शासन नियम!
- प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडे अभ्यांगतांना अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्याबाबत शासन नियम!
- सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ते आणि व्हिसल ब्लोअर यांना पोलीस संरक्षण देणेबाबत शासन नियम!
- माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागविणाऱ्या अर्जदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांचे वेगळी नोंदवही ठेवण्याबाबत शासन नियम
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ४(१)(क) व (ख) च्या अंमलबजावणीबाबत परिपत्रक
- माहिती आयोगांचे अधिकार व कार्ये, अपील व शास्ती (माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम १८ ते २० नुसार)
- कायदा माहितीचा अन् अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा !
- तलाठ्याची कर्तव्ये कोणती आहेत? तलाठ्याकडून माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज कसा करायचा?
- ग्रामसेवकाची कामे व जबाबदाऱ्या कोणत्या? ग्रामसेवकांकडून माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज (RTI) कसा करायचा?
- ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) साठी असा करा माहिती अधिकार अर्ज
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!