कामगार व त्यांच्या कुटूंबासाठी आर्थिक सहाय्य योजना – शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परिक्षा!
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE) या शासकीय संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय संगणक टंकलेखन अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबियांना अभ्यासक्रमाकरिता भरलेल्या १०० टक्के शुल्क रक्कमेच्या ५० टक्के रक्कम सहाय्यता म्हणून सन २०२३-२४ या वर्षापासून शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परिक्षा (GCC-TBC) आर्थिक सहाय्य योजना” खालील नियम व अटीच्या अधीन राहून लागू करण्यात येत आहे.
शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परिक्षा! (GCC TBC):
कामगार व त्यांच्या कुटूंबासाठी आर्थिक सहाय्य योजनेच्या नियम व अटी
१. मंडळाकडे कामगार कल्याण निधी (MLWF) भरणाऱ्या (LIN धारक) कामगार व त्यांच्या कुटुंबियांना सदर योजनाचा लाभ घेता येईल.
२. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार/कामगार कुटुंबियांना मंडळाच्या कामगार केंद्राचे सर्वसाधारण वार्षिक सभासद होणे आवश्यक आहे.
३. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या संगणक टंकलेखन बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग मराठी-३०/४० किंवा हिंदी -३०/४० शब्द प्रती मिनिट (६ महिने) या पैकी एका अभ्यासक्रमासाठी तसेच इंग्रजी-३०/४० शब्द प्रती मिनिट (६ महिने) या पैकी एका अभ्यासक्रमासाठी अशा प्रकारे दोन वेळा ५० टक्के मर्यादेत अर्थसहाय्य देता येईल. याप्रमाणे एक किंवा दोन अभ्यासक्रम पूर्ण असलेल्या अर्जदारास अर्थसहाय्य मंजूर करण्यात यावे.
४. शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परिक्षा किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण कामगार व कामगार कुटुंबियांना अभ्यासक्रमाकरिता भरलेल्या एकूण फी / शुल्काच्या ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून मंडळामार्फत मंजूर करण्यात येईल. दिव्यांग अर्जदारास ५० टक्के गुणांची अट राहणार नाही व किमान उत्तीर्ण अर्जदारास एकूण फी / शुल्काची सरसकट १०० टक्के रक्कम अनुदान मजूर करण्यात येईल. (एकूण फी/शुल्कामध्ये अभ्यासक्रमाकरीता भरलेल्या प्रवेश शुल्क, मासिक शिकवणी शुल्क, परीक्षा शुल्क व परीक्षा सामग्री या सर्व रक्कमेचा समावेश राहील.)
५. अर्जदाराने अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून कमाल मागील १ वर्षामध्ये शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
६. अर्जदाराने नियम व अटीचे पालन करून मंडळाच्या https://public.mlwb.in/public या वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
७. अर्ज सादर करण्याची मुदत दरवर्षी १ एप्रिल ते ३१ डिसेंबर अशी राहील.
८. अर्जदाराने अर्ज सादर करतांना पुढीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. –
अ) शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.
ब) शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमाकरिता जमा केलेल्या फी/शुल्काची पावती. (सोबत फी/शुल्काच्या पावतीचा नमुना परिशिष्ट डी-२ नुसार)
क) आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान कार्ड/पासपोर्ट या पैकी कोणतेही एक ओळखपत्र.
ड) कामगार कुटुंबीय असल्याचे पुराव्याकरीता रेशनकार्डची प्रत.
इ) राष्ट्रीयकृत बँकेतील चालू बचत खात्याच्या तपशिलासाठी बँक पास बुकची प्रत/ कॅन्सल चेक.
संबंधित केंद्र प्रमुख व अधिकारी यांनी योजनेकरिता वरीलप्रमाणे नियम अटीचे पालन करणाऱ्या अर्जदाराचे केंद्रात ऑनलाईन सभासद नोंदणीद्वारे प्राप्त वेतन पावती (पेमेंट स्लीप)/आस्थापना दाखला, आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान कार्ड/पासपोर्ट, रेशनकार्ड आदी कागदपत्रांची माहिती काळजीपूर्वक तपासणी करावी तसेच योजनेकरिता आवश्यक इतर कागदपत्रांची खातरजमा करून अर्जास स्विकृती द्यावी.
प्राप्त अर्जाची तपासणी विहित मुदतीत होईल याबाबत संबंधित केंद्र प्रमुख, कामगार कल्याण अधिकारी, सहायक लेखा अधिकारी व विभाग प्रमुख यांनी उचित नियोजन करावे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांत तपासणी करून उचित कार्यवाही करण्याची संबंधितानी दक्षता घ्यावी. विभागप्रमुखांनी या योजनेच्या नियम व अटीनुसार, गुणांच्या मेरीटनुसार व अर्थसंकल्पाच्या तरतुदीनुसार मंजुरी द्यावी व माहे फेब्रुवारी च्या आत लाभार्थ्यांना रक्कम उपलब्ध करून द्यावी. तसेच वरील नियम अटीनुसार दोन अभ्यासक्रमाकरिता लाभ मंजूर केलेल्या लाभार्थीस पुन्हा लाभ मंजूर करू नये, याकरिता संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात नोंदी करून ठेवाव्यात. शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परिक्षा ( GCC-TBC ) अभ्यासक्रमाकरिता शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या शुल्कानुसार लाभार्थ्यास अनुदान मंजुरीबाबत कार्यवाही करावी. सध्या लागू असलेल्या शासन निर्णयानुसार शुल्काचा तक्ता खालील प्रमाणे आहे.
अभ्यासक्रमाचे नाव | प्रवेश शुल्क | मासिक शुल्क | परीक्षा शुल्क परीक्षा परिषद | परीक्षा सामग्री शुल्क | एकूण फी/शुल्क |
संगणक टंकलेखन (GCC-TBC) संगणक टायपिंगमधील मूलभूत अभ्यासक्रम विषय: मराठी -३०/४० श.प्र.मि., हिंदी- ३०/४० श.प्र.मि., इंग्रजी-३०/४० श.प्र.मि. (कालावधी -६ महिने) | २००/- | शिकवणी शुल्क रु.८००/- प्रतीमाह प्रमाणे ६ महिन्याचे एकूण रु. ४८००/- | रु. १०००/- | रु. ५००/- | रु. ६५००/- |
सन २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षापासून पुढील आदेश निघेपर्यंत अंमलात राहील.
हेही वाचा – बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!