माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना – Financial Assistance Scheme for Children of Ex-Servicemen
महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांतर्गत माजी सैनिकांच्या पाल्यांनादेखील शैक्षणिक सवलत देण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थेत पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या माजी सैनिकांच्या मुलामुलींना शैक्षणिक खर्चाशी निगडित सवलत दिली जाते. राज्य शासनाच्या महा-डीबीटी पोर्टलच्या (MahaDBT Portal) माध्यमातून हा लाभ माजी सैनिकांच्या पाल्यांना घेता येणार आहे.
माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना – Financial Assistance Scheme for Children of Ex-Servicemen:
या योजनेंतर्गत राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणाऱ्या किंवा राज्यात भरती झालेल्या मेजर या पदावरून किंवा त्याखालील पदावरून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना, पत्नी किंवा विधवा यांना शैक्षणिक सवलतीचा लाभ मिळणार आहे. यामध्ये तिन्ही दलांच्या माजी सैनिकांचा समावेश आहे. माजी सैनिकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणादरम्यान कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी उद्भवू नये, हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेमुळे लाभार्थी विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची रक्कमदेखील महाविद्यालयांकडून आकारली जात नाही. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांसाठी सवलतीचा लाभ मिळणार नाही. तर आपल्या पाल्यांसाठी या शैक्षणिक सवलतीचा लाभ मिळविण्याकरिता माजी सैनिकांना योग्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, असेही या योजनेत म्हटले आहे.
योजनेचा उद्देश:
राज्यातील मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थेत पदवी व पदव्युत्तर स्तरावर शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलत.
योजनेच्या अटी व शर्ती:
१) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या किंवा महाराष्ट्रात भरती झालेल्या मेजर, नौदल किंवा वायू दलातील तत्सम दर्जाच्या हुद्यापर्यंत (वा त्यापेक्षा कमी दर्जाच्या हुद्यावरुन) सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांची मुले/मुली/पत्नी/विधवा यांना या योजनेखाली शैक्षणिक सवलती देय.
२) वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास अथवा वरच्या वर्गात पदोन्नत न झाल्यास या सवलती स्थगीत ठेवण्यात येतील. मात्र त्यानंतर विद्यार्थी वरच्या वर्गात पदोन्नत झाला की त्यास ही सवलत पुढे चालू ठेवण्यात येईल.
३) या सवलतीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीस अन्य दुसऱ्या योजनेखाली शुल्क माफी, पुस्तक अनुदान, गणवेश अनुदान आदी सवलतीचा लाभ घेता येणार नाही.
४) एकाच वेळी एका विद्यार्थ्याला एका पेक्षा जास्त अभ्यासक्रमांना या सवलतीचा लाभ दिला जाणार नाही.
५) शासकीय, अनुदानित महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थीच अर्ज करण्यास पात्र आहेत.
६) महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
७) या सवलती समाधानकारक प्रगती, चांगली वर्तवणूक व नियमित उपस्थिती असल्यास विहित अभ्यासक्रम संपेपर्यंत चालू राहतील.
आवश्यक कागदपत्रे:
१) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र.
२) डी.एस.एस.ए. किंवा सी.एस.एस.ए. मंडळाचे महाराष्ट्र राज्याचे अधिकार पत्र धारण करीत असल्याचे किंवा महाराष्ट्रात भरती झाल्याचे तसेच मेजर व नौदल आणि वायुदलातील तत्सम दर्जाच्या हुद्दापर्यंत (वा त्यापेक्षा कमी हुद्दावरुन) निवृत्त माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र.
३) मागील वर्षांची गुणपत्रिका.
लाभाचे स्वरूप:
१) प्रवेश शुल्क, सत्र शुल्क, ग्रंथालय शुल्क, प्रयोगशाळा शुल्क १०० टक्के देण्यात येते.
२) लाभार्थी विद्यार्थ्याच्या शिक्षण शुल्काची रक्कम महाविद्यालयांकडून आकारली जात नाही.
अर्ज करण्याची पद्धत:
१) नवीन मंजुरी व नूतनीकरणासाठी ऑनलाईनरित्या Maha DBT संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक.
२) नूतनीकरणासाठी मागील वर्षीच्या अर्ज ओळख क्रमांकाचा उपयोग करणे आवश्यक.
ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
संपर्क: शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, जिल्हा माहिती कार्यालय.
हेही वाचा – महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Online For Maha DBT Scholarship
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!