शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग २ जमिनींवर कर्ज मिळणार !
शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर (Farmer Loan) तारण म्हणून भोगावटा वर्ग दोनमधील जमीनी बँका, वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक यापूर्वीच निर्गमित करण्यात आले आहे. यासंबंधी वित्तीय संस्थांना माहिती व्हावी व शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुलभता यावी यासाठी हे परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात येणार आहे. तसेच याची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना द्यावी, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग २ जमिनींवर कर्ज मिळणार ! Farmer Loan:
देवस्थान इनाम वर्ग ३ (दुमाला), भोगवटा वर्ग २, रेघेखालील कुळ, प्रकल्पाकरिता राखीव इ. धारण प्रकार असणाऱ्या शेतजमिनीवर अल्प मध्यम व दीर्घ मुदत तसेच व्यावसायिक कर्ज वाटप (Farmer Loan) करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह राजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, अपर जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपसचिव संजय धारुरकर, सत्यनारायण बजाज, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, बँकेचे संचालक तथा माजी आमदार प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजुपुरे, प्रदीप विधाते, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे आदी यावेळी उपस्थित होते.
देवस्थान इनाम वर्ग ३ (दुमाला), भोगवटा वर्ग २, रेघेखालील कुळ, प्रकल्पाकरिता राखीव इ. धारण प्रकारच्या जमिनी तारण ठेवता येत नसल्याने या जमिनधारकांना विविध बँका, वित्तीय संस्थांकडून कर्ज (Farmer Loan) मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
कर्ज (Farmer Loan) मिळण्यासाठी इनाम जमिनी तारण ठेवण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. मात्र, भोगवटा वर्ग २ च्या जमिनी तारण ठेवणे, कर्ज (Farmer Loan) थकित झाल्यास त्या जमिनी विक्री करणे, बोजा चढविण्याचे अधिकार बँकांना देण्यासंदर्भात महाराष्ट्र महसूल अधिनियमात तरतूद असून तथापि यासंबंधी बँकांना या संबंधी माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांना कर्ज (Farmer Loan) घेण्यास येणाऱ्या अडचणी दूर होऊन सुलभता यावी, यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांनी ही तरतूद सर्व बँकांच्या निर्दशनास आणावी, अशा सूचना यावेळी श्री. बावनकुळे यांनी दिल्या.
पुढील लेख देखील वाचा!
- पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- आता शेतकऱ्यांना मिळणार विनाहमी २ लाख रुपयांचे पीक कर्ज!
- शेतकऱ्यांना मिळणार ५ मिनिटांत पीक कर्ज, आरबीआय-नाबार्ड सोबत करार!
- शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी १ टक्का कमी व्याज दराने अर्थसहाय्य !
- शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द करण्याचे सहकार आयुक्तांचे आदेश !
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : 50 हजार प्रोत्साहनपर लाभासाठी कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण करा !
- शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती
- कृषी कर्ज मित्र योजना – Krishi Karj Mitra Yojana
- बँकेचे कर्ज फेडल्यानंतर बँकेकडुन हि कागदपत्रे अवश्य घ्या नाहितर होऊ शकते आर्थिक नुकसान !
- किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- E-Peek Pahani DCS App : ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ हे सुधारित ई-पीक पाहणी व्हर्जन -३ ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध!
- भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया सुरु – २०२४ !
- महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 (सुधारणा) अधिनियम 2023 अन्वये कलम 28-1 अअ मध्ये केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत शासन निर्णय!
- गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन!
- जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा (Satbara Utara ७/१२) ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर!
- गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती !
- सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे? जाणून घ्या महत्वाच्या बाबी!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!