फळबाग लागवड योजना २०२४ : मनरेगा अंतर्गत फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी अर्ज सुरु!
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२४-२५ मध्ये समाविष्ट फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी तसेच सलग क्षेत्रावर फळबाग लागवड, बांधावर फळझाडे लागवडसाठी संबंधित गावाचे कृषी सहायकांकडे अर्ज करावा.
फळबाग लागवड योजनेत आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, संत्रा, मोसंबी, सिताफळ, नारळ, आवळा, अंजीर, जांभुळ, चिंच, फणस, शेवगा, काजू, ड्रॅगनफ्रूट, केळी, द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. गुलाब, मोगरा व निशीगंध या फुलपिकांसाठी व सन २०२४-२५ या वर्षात बांबू लागवड मोहिम स्वरुपात करण्याच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लागवडीस बारामती २४० हेक्टर, इंदापूर २३० हेक्टर, दौंड- २२२ हेक्टर व पुरंदर २२० हेक्टर असे एकूण ९१२ हेक्टरवर फळपीक, फुलपीक व बांबू लागवडीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे.
क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी जास्त करण्यास परवानगी आहे. परंतु देय अनुदान फळपीक लागवडीचे निकष, विद्यापीठ शिफारशीनुसार अंतर मर्यादेतच देय राहील. अतिरिक्त कलमे, रोपे यांचे अनुदान दिले जाणार नाही. लागवड वर्षासह सलग ३ वर्षात मंजुर अंदाजपत्रकानुसार अनुदान देय राहील.
दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती फळपिकांकरीता जे लाभार्थी ९० टक्के फळझाडे जीवंत ठेवतील व कोरडवाहू फळपिकांचे ७५ टक्के फळझाडे जीवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील. वैयक्तिक बांधावरील फळपिके लागवडीसाठी हेक्टरी २० रोपे या मर्यादेत ही योजना राबविण्यात येते.
प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा कमीत कमी ०.०५ हेक्टर व जास्तीत जास्त २.०० हेक्टर आहे. इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. सातबारावर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक राहील. अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, भटक्या जाती, द्रारिद्र्य रषेखालील व्यक्तींना तसेच अल्प व अत्यल्प, महिला लाभार्थी, दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी ग्रामपंचायतीचे जॉबकार्ड धारक असावा, असे लाभार्थी निवडीचे निकष आहेत,
हेही वाचा – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!