माजी सैनिक/अवलंबितांना नोकर भरतीमध्ये प्राधान्यक्रम !
माजी सैनिकांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने युद्ध विधवांची मुले, युद्ध विधवा, युद्धात अपंग झालेले सैनिक, इतर अपंग सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, माजी सैनिकांचे पाल्य, इत्यादीना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे.
शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे या व अशा शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये, माजी सैनिकांच्या / त्यांच्यावर अवलंबून असणा-या कुटुंबातील पात्र व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मेस्को महामंडळाकडून सेवा घेण्यास प्राधान्य देणे आवश्यक झाले आहे. तदनुषंगाने दि. १७/०७/२०१९ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी होणेसाठी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयाकडून अधिकाधिक आस्थापना, महामंडळे यामध्ये माजी सैनिकांच्या/अवलंबितांच्या रोजगारासाठी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मेस्को महामंडळाकडून सेवा घेण्यास प्रोत्साहित करण्याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करण्यात येणार आहे.
माजी सैनिक/अवलंबितांना नोकर भरतीमध्ये प्राधान्यक्रम ! Ex-Servicemen Dependents are given priority in recruitment:
महाराष्ट्र राज्यातील सैन्यदलातील (भूदल, नौदल, वायुदल) निवृत्त होणाऱ्या माजी सैनिकांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना निवृत्तीनंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून तसेच विविध योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारकपणे करण्याकरिता महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाच्या ठळक उद्दिष्टांपैकी माजी सैनिकांना सरकारी, निमसरकारी, शासकीय महामंडळे व प्राधिकरण व खाजगी संस्थांमध्ये सुरक्षा क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध करुन देणे हे एक उद्दिष्ट आहे. माजी सैनिकांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने युध्द विधवांची मुले, युध्द विधवा, युध्दात अपंग झालेले सैनिक, इतर अपंग सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, माजी सैनिकांचे पाल्य, इत्यादीना सुध्दा रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशनमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.
महामंडळाच्या सर्व व्यावसायिक उपक्रमांमध्ये माजी सैनिकांच्या पाल्यांना रोजगार पुरवितांना त्यांचे पाल्य कोणास मानावे या विषयी बरीच संदिग्धता निदर्शनास आली यास्तव माजी सैनिकांच्या पाल्यांची पात्रता ठरविण्यासाठी त्यांचे मापदंड निश्चित करणे शासनाच्या विचाराधीन आहे.
मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने माजी सैनिकांच्या अवलंबितांसाठी खालीप्रमाणे पात्रता निश्चित करण्यात येत आहे.
१) माजी सैनिकांचा मुलगा ज्याचे वय भरतीच्या वेळी ३५ वर्षापर्यंत आहे. आणि त्याचा तपशील डिसचार्ज बुक मध्ये नमूद केलेला आहे. तसेच तो त्या माजी सैनिकावर अवलंबून असला पाहिजे.
२) माजी सैनिकांची अविवाहीत मुलगी, जिचे लग्न झालेले नाही व भरतीच्या वेळी ३५ वर्ष वया खालील असेल, त्याचा उल्लेख डिसचार्ज बुक मध्ये केलेला असावा, तसेच ती त्या माजी सैनिकावर अवलंबून असली पाहिजे.
३) मुलगा अथवा मुलीचा पार्ट दोन ऑर्डर चा उल्लेख डिसचार्ज बुक मध्ये नसल्यास पर्यायी कागदपत्रांचे निरिक्षण करुन जसे की आधार कार्ड, राशन कार्ड, व्होटर कार्ड, इत्यादी नुसार पात्रता ठरविण्यात यावी.
४) माजी सैनिकांच्या विधवा/विवाहीत / घटस्फोटीत मुलींना पाल्य मानले जाणार नाही.
५) माजी सैनिकांच्या पत्नीस व विधवेस नोकरीस पात्र मानले जाईल.
६) माजी सैनिकाने दत्तक घेतलेल्या मुलास अथवा मुलीस वरील १,२,३, व ४ मधील मापदंड अनुसार पाल्य मानले जाईल. अशा मुलांना/मुलींना दत्तक घेतल्याचे कायदेशीर दस्ताऐवज सादर करणे आवश्यक आहे.
एका ठिकाणी माजी सैनिकाच्या एकाच पाल्याला महामंडळाद्वारे नोकरी देण्यात येईल. त्या माजी सैनिकांचे इतर पाल्य असल्यास त्यांना दुसऱ्या जिल्हयात जागा उपलब्ध असतील तर महामंडळाद्वारे नोकरी देण्यात येइल वरील पात्रते प्रमाणे महामंडळाच्या सर्व व्यावसायिक उपक्रमांमध्ये सामाविष्ठ करण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. पुणे यांनी त्वरीत कार्यवाही करावी.
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय : माजी सैनिक/अवलंबितांना नोकर भरतीमध्ये प्राधान्यक्रम देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – राष्ट्रीय करिअर सेवा : 10वी/12वी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन अर्ज करा ! – National Career Service
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!