गिग व प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आवाहन!
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने असंघटित कामकारांनासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध असून गिग व प्लॅटफॉर्म कामगारांनी (eShram Registration for Gig and Platform Worker)
पोर्टलवर नोंदणी करुन लाभ घेण्याचा सल्ला दिला आहे. गिग (Gig) व प्लॅटफॉर्म (Platform) कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणे हे अत्यंत सोपे आहे. ही नोंदणी केल्यामुळे त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो.
गिग व प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आवाहन! eShram Registration for Gig and Platform Worker:
“गिग” म्हणजे लघुकालीन किंवा तात्पुरते काम. गिग कामगार Gig Workers) हे असे लोक असतात जे, कायमस्वरूपी नोकरीऐवजी एकावेळी एक किंवा अनेक छोट्या कामांवर काम करतात, हे काम कोणत्याही कंपनीशी दीर्घकालीन कराराशिवाय असून हे काम तासावर, दिवसभरावर, किंवा प्रोजेक्टवर आधारित असते उदाहरण: फ्रीलान्सर लेखक, डिझायनर, फोटोग्राफर, किंवा डिलिव्हरी बॉय वगैरे.
प्लॅटफॉर्म कामगार (Platform Workers) हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असतात. म्हणजेच ते एखाद्या ऑनलाइन अॅप किंवा वेबसाइटमार्फत ग्राहक आणि सेवादात्याच्या दरम्यान संपर्क साधतात. उदाहरण: Zomato, Swiggy वर डिलिव्हरी करणारे, Uber, Ola चे ड्रायव्हर्स, Urban Company चे टेक्निशियन, Amazon/Flipkart चे कूरियर डिलिव्हरी बॉय (eShram Registration for Gig and Platform Worker) यांना विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे.
नोंदणीसाठी आवश्यक गोष्टी:
- आधार कार्ड (Aadhaar Number)
- बँक खाते तपशील (Bank Account Details)
- मोबाईल नंबर (जो आधार कार्डला लिंक असावा)
- कामाचा तपशील (उदा. डिलिव्हरी बॉय, कॅब ड्रायव्हर, फ्रीलान्सर, इ.)
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया:
स्टेप 1: ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम https://eshram.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
स्टेप 2: “Register on e-Shram” वर क्लिक करा.
स्टेप 3: आधार क्रमांक टाका यामध्ये आपला 12-अंकी आधार क्रमांक टाका. नंतर CAPTCHA भरा आणि Send OTP वर क्लिक करा.
स्टेप 4: OTP तपासा यामध्ये तुमच्या आधार-लिंक मोबाइलवर आलेला OTP टाकून पुढे जा.
स्टेप 5: वैयक्तिक माहिती यामध्ये नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता इत्यादी माहिती भरा. गिग/प्लॅटफॉर्म (eShram Registration for Gig and Platform Worker) कामगार म्हणून कामाचा प्रकार निवडा.
स्टेप 6: बँक तपशील भरा यामध्ये तुमचे खाते क्रमांक, IFSC कोड वगैरे माहिती भरा.
स्टेप 7: नोंदणी पूर्ण करा यामध्ये सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर “Submit” करा.
यानंतर तुम्हाला e-Shram कार्ड डाउनलोड करता येईल.
नोंदणीचे फायदे:
- PM सुरक्षा बीमा योजना अंतर्गत ₹2 लाखांचा अपघाती विमा कवच मिळतो. व हा विमा मोफत आहे.
- भविष्यकाळात कामगार कल्याण योजनांचा लाभ
- कामगार म्हणून ओळख मिळते.
- छोट्या किराणा दुकानाचे मालक कामगार म्हणून ओळख मिळते.
- सरकारच्या डेटाबेसमध्ये तुमची अधिकृत नोंद होते.
- भविष्यकाळात तुमच्या कामाच्या प्रकारावर आधारित योजना सुरू झाल्यास तुमच्यापर्यंत त्या थेट पोहोचवता येतात (DBT – Direct Benefit Transfer).
- सरकारकडे असलेला तुमचा डेटाचा वापर करून नवीन काम, प्रशिक्षण किंवा कर्ज योजना जाहीर केल्या जाऊ शकतात.
- लॉकडाऊनसारख्या काळात आर्थिक मदतीचा लाभ दिला गेला होता. नोंदणीकृत असाल, तर अशा मदतीसाठी प्राथमिकता दिली जाऊ शकते.
- थोडक्यात – ई-श्रम कार्ड म्हणजे तुमची ‘कामगार ओळख’ + सरकारी लाभांसाठी पासपोर्ट!
नोंदणीसाठी पात्रता (Eligibility Criteria):
- 16 ते 59 वर्षांदरम्यान असलेले कोणतेही कामगार (जन्मतारीख 1963 ते 2007 दरम्यान असावी).
- असंघटित क्षेत्रात काम करणारा असावा (Unorganized Sector Worker):
- म्हणजे असा कामगार ज्याचे कोणत्याही प्रकारचे PF (EPFO), ESIC किंवा सरकारी नोकरीत योगदान नाही.
- गिग कामगार (उदा. डिलिव्हरी बॉय, कॅब ड्रायव्हर), प्लॅटफॉर्म (eShram Registration for Gig and Platform Worker) कामगार (उदा. Swiggy, Zomato, Ola/Uber), फ्रीलान्सर, बांधकाम मजूर, रिक्षाचालक, शेतमजूर, घरकाम करणारे, इत्यादी.
- नोंदणी करणारा व्यक्ती भारताचा नागरिक असावा.
- आधार कार्ड आवश्यक आहे
- आधार कार्ड आणि ते मोबाईल नंबरशी लिंक असलेले असावे.
- बँक खाते असणे गरजेचे कारण नोंदणी दरम्यान बँक तपशील भरावा लागतो.
नोंदणीस अपात्र कोण?
- केंद्र/राज्य सरकारी कर्मचारी
- PF (EPFO) किंवा ESIC मध्ये नोंदणीकृत असलेले कामगार
- आयकर भरणारे (Taxpayers), काही अपवाद वगळता
ई-श्रम पोर्टलवर कोण नोंदणी करू शकतात?
असंघटित क्षेत्रातील कामगार (Unorganized Workers):
जे लोक कोणत्याही स्थायिक नोकरीत नाहीत आणि नियमित पगार, PF किंवा ESIC अंतर्गत नोंदणीकृत नाहीत. यामध्ये शेतमजूर, बांधकाम कामगार, रिक्षा / टॅक्सी / ट्रक चालक, घरगुती कामगार, धोबी, न्हावी, लोहार, सुतार, फेरीवाले, विक्रेते, हातमजूर, मत्स्य व्यवसायात काम करणारे, सफाई कर्मचारी, हॉटेल / ढाबा कामगार
गिग व प्लॅटफॉर्म कामगार (Gig & Platform Workers)
तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांसाठी काम करणारे यामध्ये Swiggy / Zomato डिलिव्हरी बॉय, Ola / Uber चालक, Amazon / Flipkart डिलिव्हरी, Urban Company वर काम करणारे, फ्रीलान्स डिझायनर, लेखक, ट्रान्सलेटर इ.
स्वयंरोजगार करणारे (Self-employed)
ज्यांनी स्वतःचा छोटा व्यवसाय, स्टॉल, सेवा व्यवसाय चालवलेला आहे यामध्ये चहा टपरीवाले, भाजी विक्रेते, मेकअप आर्टिस्ट, मोबाईल रिपेअरिंग, सायकल मेकॅनिक.
हेल्पलाईन क्रमांक: 14434 टोल फ्री: 1800 -1374 -150 (सोमवार ते शनिवार सकाळी 8:00 ते रात्री 8:00) ईमेल: eSHRAM-care@gov.in
या लेखात, आम्ही गिग व प्लॅटफॉर्म कामगार (eShram Registration for Gig and Platform Worker) ई-श्रम पोर्टलवर नोंदणी विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचू शकता!
- ई-श्रम यूएएन कार्डसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी!
- UMANG पोर्टल वरून असे बनवा ई-श्रम यूएएन कार्ड – E Shram Card
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना – Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana
- पीएम विश्वकर्मा योजना – PM Vishwakarma Scheme
- कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) मध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि त्यांच्या वेबसाईट लिंक !
- प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना ५ लाख विमा हेल्थ कार्ड मोफत डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!