विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती पहा आणि ठरवा कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे?
आज आपण विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवाराची (ECI Candidate Affidavit) संपूर्ण माहिती कशी पाहायची? ते सविस्तर जाणून घेणार आहोत. कुठे नाव, कुठे काम तर कुठे केवळ पक्षाचा झेंडा दाखवित मतदारांकडे मतांची मागणी करण्यात उमेदवार व्यस्त आहेत. मतांचा हा जोगवा मागताना तोंडभरून आश्वासने देताना उमेदवार थकत नाहीत. निवडणुकांच्या रणधुमाळीचे बिगुल वाजताच सर्वत्र जोरदार प्रचाराची नांदी होते, मात्र या प्रचाराचा प्रत्यक्ष तरुण मतदारावर परिणाम कितपत होतो, आश्वासनांच्या फैरी झाडणारे उमेदवार तरुणांना आदर्श वाटतो का, काम, नाव, पक्ष की जाहीरनामा, नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरून मतदार मत देतो.
कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे?
आपल्या समस्या सोडवण्यासाठी किंबहुना जनसामान्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्यातीलच कोणीतरी उमेदवार म्हणून पुढाकार घ्यायला हवा. उमेदवार निवडताना त्या व्यक्तीला ज्या परिसरातून आपण निवडणूक लढवणार आहोत निदान त्याची माहिती आहे का, हे तपासून घेणे हा प्राथमिक निकष असायला हवा.
जर उमेदवार आपल्यापासून अलिप्त राहत असेल तर त्याला आपल्या समस्यांची जाणीव असणे शक्य नाही. परिणामी त्यांवर तोडगा काढतानाही त्या उमेदवाराची तटस्थ भूमिका असू शकते. त्यामुळे आपल्यात राहणारा, नागरिकांच्या समस्यांचा प्रत्यक्ष अनुभव असलेला उमेदवार निवडण्यावर मी भर देईन.
अनेकदा निवडणूक तोंडावर आली की वर्षानुवर्षे आपल्या कार्यालयाच्या वातानुकूलित जागेत लपलेले राजकारणी गल्लोगल्ली फिरू लागतात. या अचानक वाटलेल्या काळजीच्या ढोंगाला न भुलता आपण एक सूज्ञ नागरिक म्हणून सारासार विचार करणे गरजेचे आहे. आपण योग्य उमेदवाराची निवड करताना त्या व्यक्तीची पूर्वकामगिरी तसेच आपल्या परिसरात केलेली कामे यांचा आढावा घ्यावा.
विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवाराची संपूर्ण माहिती ऑनलाईन पहा – ECI Candidate Affidavit:
विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवाराची संपूर्ण (ECI Candidate Affidavit) माहिती पाहण्यासाठी सर्व प्रथम खालील निवडणूक आयोगा ची वेबसाईट ओपन करा.
निवडणूक आयोगा ची वेबसाईट ओपन झाल्यावर आता उमेदवार शपथपत्र व्यवस्थापन मध्ये आपल्याला उमेदवाराची संपूर्ण (ECI Candidate Affidavit) माहिती पाहण्यासाठी निवडणूक प्रकार, राज्य, फेज व मतदारसंघ निवडून फिल्टर करायचे आहे.
उमेदवारांची यादी:
निवडलेल्या वॉर्ड मधून किती उमेदवारांनी अर्ज केला आहे? किती मंजूर झाले आहेत? किती जणांनी अर्ज मागे घेतला आहे? हे पाहता येईल.
पुढे कोण कोण उमेदवार उभे आहेत त्यांचे पूर्ण नाव तुम्हाला दिसेल.
View more वर क्लिक करून पुढे आपल्याला Affidavit Download वर क्लिक करून त्याचे प्रतिज्ञापत्र पाहायचे आहे.
निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, व्यवसाय किंवा कामधंदा याचा तपशील, मत्ता व दायित्व यांचा तपशील, जंगम मालमत्तेचा तपशील, स्थावर मालमत्तेचा तपशील आणि सार्वजनिक वित्तीय संस्था यांच्याकडील व शासकीय / निमशासकीय संस्थांकडील दायित्वे/ थकीत रकमा तपशील, इत्यादी आपण पाहू शकतो.
खालील लेख देखील वाचा !
- मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य; पहा संपूर्ण यादी !
- घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- अंतिम मतदार यादी वार्डनुसार PDF फाईल मध्ये ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी विविध उपयोगी प्रणाली पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- मतदार यादीत नाव नसेल तर पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन !
- मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून घेण्याचे आवाहन !
- दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध ! Saksham-ECI App
- निवडणूक उमेदवारांच्या गुन्हेगारी रेकॉर्ड पूर्ववृत्तांसाठी Know Your Candidate ॲप सुरू !
- मतदारकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!