७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना सुरु !
समाजातील सामाजिक व आर्थिक मागासलेपणाची दरी कमी व्हावी याकरिता शासनामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध जातीच्या तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. याअंतर्गतच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत या प्रवर्गासाठी ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचा गट (Dudhal Janavare Gat vatap Yojana) पुरवठ्याची योजना राबविण्यात येत आहे.
७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना ! Dudhal Janavare Gat vatap Yojana :
सद्यस्थितीत जनावरांच्या बाजारात चांगल्या दूध देणाऱ्या संकरित गाई तसेच म्हशींच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेरील झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक क्षमता कमी असलेल्या कुटुंबांना पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या या योजनांमुळे स्वयंरोजगाराचा मार्ग गवसला आहे. शेतीपूरक व्यवसाय असल्याने आर्थिकदृष्टीनेही तो फायदेशीर ठरला आहे.
योजनेअंतर्गत देण्यात येणारे लाभ:
दोन दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करण्यासाठीच्या (Dudhal Janavare Gat vatap Yojana) योजनेअंतर्गत खालील प्रजातीच्या पशुधनासाठी अर्थसहाय्य देण्यात येते.
- संकरित गाय- एच. एफ. किंवा जर्सी म्हैस –मुऱ्हा किंवा जाफराबादी,
- देशी गाय-गीर,
- साहिवाल,
- लाल सिंधी,
- राठी,
- थारपारकर,
- देवनी,
- लाल कंधारी,
- गवळाऊ
- डांगी
पात्रता व योजनेचा लाभ देण्याचा प्राधान्यक्रम:
दुधाळ जनावरे गट वाटपाची (Dudhal Janavare Gat vatap Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता लक्षात घेऊन प्राधान्यक्रमाने योजनेचा लाभ देण्यात येतो.
- अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे.
- दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी,
- 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले अत्यल्प भूधारक,
- १ ते २ हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेले अल्प भूधारक,
- रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेला सुशिक्षित बेरोजगार
- महिला बचत गटातील लाभार्थी
- लाभार्थ्यांची निवड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थ्यांची निवड करते.
- लाभार्थी निवडतांना ३० टक्के महिला आणि ३ टक्के दिव्यांगांना प्राधान्य देण्यात येते.
- निवड झाल्यावर एका महिन्यात लाभार्थ्यांचा हिस्सा किंवा बँकेचे कर्ज उभारणे आवश्यक राहील.
- दुधाळ जनावरांची खरेदी तालुक्याचे पशुधन विस्तार अधिकारी करतील.
आवश्यक कागदपत्रे:
दुधाळ जनावरे गट वाटपाची (Dudhal Janavare Gat vatap Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- आधारकार्ड,
- मोबाईल क्रमांक,
- ७/१२
- ८-अ उतारा,
- शिधापत्रिकेची सत्यप्रत,
- राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक सत्यपत्र,
- अर्जदाराचे छायाचित्र,
- अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत.
- दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र
- दिव्यांग असल्यास दाखला
दुधाळ जनावरांसाठी दिलेला लाभ
यासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत २ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. या तुरतुदीमधून ३१२ लाभार्थ्यांना १ कोटी ९८ लाख ७३ हजार रूपयांचा लाभ देण्यात आला.
आदिवासी उपयोजनेंतर्गत ४७ लाभार्थ्यांना २९ लाख ९८ हजार रूपयांचा लाभ देण्यात आला. तर आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजनेअंतर्गत ३५ लाभार्थ्यांना २२ लाख ३३ हजार रूपयांचा लाभ देण्यात आला.
एकूण २ कोटी ५६ लाख १९ हजार रुपये उपलब्ध तरतुदीच्या तुलनेत २ कोटी ५५ लाख ८२ हजार रुपये खर्च करण्यात आला. त्याद्वारे ३९४ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण २ कोटी ५६ लाख १९ हजार रूपयांची तरतुद करण्यात आली असून निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी तालुकास्तरावर तरतुद वितरणाची कार्यवाही सुरू आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध प्रवर्गाच्या आर्थिक सक्षमतेसाठी राबविण्यात येत असलेली दुधाळ जनावरांची गट वाटप योजना ((Dudhal Janavare Gat vatap Yojana)) अत्यंत लाभदायी असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
संपर्क: अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागासी संपर्क करा.
खालील लेख देखील वाचा !
- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना – कृषि प्रक्रिया उद्योगांकरीता १ लाख ते १ कोटीपर्यंत प्रोत्साहन योजना (PMFME)
- यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म : आता बचतगटांच्या उत्पादनाची होणार ऑनलाईन खरेदी विक्री!
- ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना सुरु !
- राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM); शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा – National Livestock Mission
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!