आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

ड्रोन अनुदान योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !

केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उप अभियान योजनेमध्ये सन २०२४-२५ अंतर्गत ड्रोन (Drone Anudan Yojana) खरेदीसाठी अर्थसहाय्य या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने सन २०२२-२३ मध्ये राज्यासाठी किसान ड्रोन (Drone Anudan Yojana) अर्थसहाय्य सेवा सुविधा केंद्र स्थापनेसाठी – २५ व कृषी पदवीधर साठी १३ असे एकूण ३८ ड्रोन साठी अनुदान रक्कम रुपये १.६५ कोटी एवढा लक्षांक मंजूर करण्यात आला होता. सदर मंजूर लक्षांकापैकी सन २०२२-२३ मध्ये ८ ड्रोन, सन २०२३-२४ मध्ये १७ ड्रोन तसेच उर्वरित १३ ड्रोन सन २०२४-२५ मध्ये ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येऊन सन २०२२-२३ चा मंजूर लक्षांक पूर्ण झाला आहे.

सन २०२४-२५ साठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी (Drone Anudan Yojana) अर्थसहाय्य या घटकासाठी १०० ड्रोन साठी रक्कम रु. ४.०० कोटी निधीचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी सन २०२२-२३ च्या मंजूर निधीचा कार्यक्रम ड्रोन हा घटक महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत असल्याने ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात आलेला आहे.

मा. आयुक्त, कृषी यांचे निर्देशान्वये ड्रोन हा घटक इतर औजारांप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर (Drone Anudan Yojana) राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ड्रोन हा घटक फार्मर पोर्टलवर अर्ज करण्यासाठी तसेच महाडीबीटी पोर्टलवर निवड प्रक्रियेसाठी सेवा सुविधा केंद्र या घटकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सन २०२४-२५ मध्ये ड्रोन (Drone Anudan Yojana) अनुदान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांनी पोर्टलवर अर्ज करावे.

ड्रोन अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस ! Drone Anudan Yojana:

ड्रोन अनुदान (Drone Anudan Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.

शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा.

ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.

अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

पुढे अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावर क्लिक करा. कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.

आता एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा जसे कि मुख्य घटक या चौकटीमध्ये क्लिक करून भाडे तत्त्वावरील सेवा सुविधा केंद्र हा पर्याय निवडा.

तपशील या चौकटीवर क्लिक करून योग्य पर्याय निवडून यंत्रसामग्री औजारे या पर्यायावर क्लिक करून किसान ड्रोन हा पर्याय निवडा.

पुढे मशीनचा प्रकार मध्ये किसान ड्रोन प्रकार निवडा.

योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा आणि जतन करा या बटनावर क्लिक करा.

तुम्हाला अजून काही अर्ज करायचे असेल तर yes या बटनावर क्लिक करा नसेल तर No या बटनावर क्लिक करा. आपण फक्त बॅटरी संचलित फवारणी (Battery Spray Pump) पंपासाठी अर्ज करत आहोत त्यामुळे No या बटनावर क्लिक करणार आहोत.

अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा. सूचना वाचून घ्या आणि ओके बटनावर क्लिक करा.

आता पुढे पहा या बटनावर क्लिक करा. या ठिकणी तुम्ही जर एकापेक्षा अनेक योजनांसाठी अर्ज केला असेल तर त्या योजनांना प्राधान्य क्रमांक द्यावा लागेल, तो देवून टाका.

योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

ड्रोन अनुदान (Drone Anudan Yojana) योजनेसाठी तुम्हाला २३.६० एवढे शुल्क भरावे लागणार आहे त्यासाठी Make Payment या बटनावर क्लिक करा.

पेमेंट करण्याचा पर्याय निवडा. Proceed for Payment या पर्यायावर क्लिक करा. पेमेंट करण्याचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्हाला जो सोपा वाटेल तो पर्याय निवडून पेमेंट करा. शक्यतो क्यूआर कोड हा पर्याय पेमेंट करण्यासठी वापरा कारण तो अधिक सोपा आहे. पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या.

महाडीबीटी पोर्टल: https://mahadbt.maharashtra.gov.in/

महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप: महाडीबीटी शेतकरी अ‍ॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका: शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800

पुढील लेख देखील वाचा!

  1. ड्रोन परवाना : ड्रोन वापरासाठी करा नोंदणी ! – Drone License
  2. सारथी मार्फत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण
  3. ड्रोन अनुदान योजना: ड्रोन खरेदीसाठी 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार; असा करा अर्ज
  4. सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप” वर – MahaDBT Farmer App
  5. कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य (कृषी यांत्रिकीकरण) योजनेसाठी असा करा महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज!
  6. महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे !
  7. शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
  8. महाडीबीटी पोर्टल वरील योजना प्रभावीपणे राबविणेबाबत परिपत्रक जारी – MahaDBT Portal Schemes.
  9. महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.