आधार कार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड करण्याची प्रोसेस !
आपले ई-आधार कार्ड हे तुमच्या आधार कार्डचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप आहे. याचा अर्थ तुम्ही तुमचे ई-आधार विविध सरकारी पडताळणीसाठी वापरू शकता. आधार कार्डाप्रमाणेच, ई-आधारमध्ये तुमचा बायोमेट्रिक डेटा, लोकसंख्याशास्त्रीय तपशील, आधार क्रमांक, छायाचित्र आणि तुमचे नाव, जन्मतारीख आणि लिंग यासह सर्व आवश्यक माहिती असते. तुमचे ई-आधार वापरण्यासाठी, तुम्हाला ते डाउनलोड (Download Aadhaar Card) करावे लागेल.
आधार कार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड करण्याची प्रोसेस ! Download Aadhaar Card in PDF File:
आधार कार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड (Download Aadhaar Card) करण्यासाठी सर्व प्रथम खालील UIDAI च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
आता मुख्य मेनू मध्ये My Aadhaar पर्यायामध्ये Download Aadhaar वर क्लिक करा.
Download Aadhaar वर क्लिक केल्यानंतर माय आधार पोर्टल ओपन होईल. तुम्ही थेट खालील लिंक वरून माय आधार पोर्टलला भेट देऊ शकता.
https://myaadhaar.uidai.gov.in
ऑनलाइन डेमोग्राफिक्स अपडेट सेवा, आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डरिंग आणि ट्रॅकिंग आणि UIDAI द्वारे ऑफर केलेल्या अधिक मूल्यवर्धित सेवा एक्सप्लोर करण्यासाठी माय आधार पोर्टल ओपन झाल्यानंतर Login बटणावर क्लिक करा.
लॉगिन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारशी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. आधार नंबर, Captcha आणि OTP टाकून लॉगिन करा.
लॉगिन झाल्यानंतर Services मध्ये विविध ऑनलाइन आधार सेवांचे प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. सेवा-विशिष्ट पृष्ठावर नेव्हिगेट करण्यासाठी टॅबवर क्लिक करावे लागेल.
आपल्याला आधार कार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड (Download Aadhaar Card) करण्यासाठी Download Aadhaar करू.
पुढे आपल्या आधार कार्डचा डेटा पहा आणि तपासा. तुम्हाला कोणताही डेमोग्राफिक डेटा दुरुस्त किंवा अपडेट करायचा असल्यास, कृपया “आधार ऑनलाइन अपडेट करा” विभागाला किंवा जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्या.
आधार कार्डचा डेटा योग्य असल्यास Download पर्यायावर क्लिक करा.
Download पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे आधार कार्ड यशस्वीरित्या (Download Aadhaar Card) डाउनलोड होईल.
आधार कार्ड PDF फाईलचा पासवर्ड 8 अक्षरांचा असेल. तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे (आधार प्रमाणे) कॅपिटल अक्षरांमध्ये आणि YYYY फॉरमॅटमध्ये जन्माचे वर्ष.
उदाहरण : तुमचे नाव ANISH Y KUMAR आहे तुमचे जन्म वर्ष 1989 आहे. मग तुमचा ई-आधार पासवर्ड ANIS1989 आहे.
पुढील लेख देखील वाचा!
- आधार PVC कार्ड ATM सारखं दिसणार आधार कार्ड ऑनलाईन ५० रुपयात बनवा, जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Aadhaar PVC card)
- आधार कार्ड वरील पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
- मुलींच्या लग्नानंतर आधार कार्डवरील नाव बदलण्याची प्रोसेस !
- आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आधार बायोमेट्रिक लॉक/अनलॉक कसे करायचे?
- तुमच्या आधारकार्डवर किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत ते पहा !
- तुमचे आधार कार्ड कुठे वापरले जातेय ? असे तपासा !
- घरबसल्या आधारकार्डला नवीन मोबाईल नंबर अपडेट होणार!
- आता पोस्टमन काढणार लहान मुलांचे आधारकार्ड; जाणून घ्या सविस्तर माहिती !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!