वृत्त विशेषRTIमाहिती अधिकार

LPG Gas Cylinder : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांचे अधिकार

एलपीजी ग्राहकाला त्याचे अधिकार मिळत नसतील तर ग्राहकाने गॅस एजन्सी विरोधात तक्रार करायला पाहिजे. आपण या लेखात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) ग्राहकाचे अधिकार काय आहेत ते सविस्तर पाहूया.

Table of Contents

एलपीजी गॅस ग्राहकांचे हक्क:
  • GAS गॅस कनेक्शन घेताना शेगडी घेणे बंधनकारक नाही.
  • सिलेंडर घेताना तो वजन काट्यावर तोलून घ्या.
  • कॅश अँड कॅरी केल्यास १५ रुपये रिबेट मागा.
  • दोन बुकींग दरम्यान २१ दिवस थांबण्याची गरज नाही.
  • दोन वर्षातून एकदा शेगडी ट्युब व रेग्युलेटर तपासणी आवश्यक.
  • कोणतीही तक्रार असल्यास गॅस कंपनीच्या अधिका-यास संर्पक करा.
 नवीन गॅस कनेक्शन मिळणेकरिता प्रक्रिया:

आपल्या निवासाच्या जवळ असलेल्या घरगुती गॅस वितरकाकडे नवीन गॅस कनेक्शनसाठी नोंदणी करता येईल. तसेच नवीन गॅस कनेक्शनकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

के.वाय.सी.म्हणजे काय?

के.वाय.सी.(Know Your Consumer) म्हणजे ग्राहकाचे निवासाचा व ओळखीबाबतची माहिती नमूद असलेला तसेच ग्राहकाचे वैयक्तिक माहितीचा तपशील असलेला फॉर्म आहे.

के.वाय.सी.फॉर्म भरणे आवश्यक आहे का?

आपणाकडे एकापेक्षा जास्त घरगुती गॅस कनेक्शन किंवा वेगवेगळया कंपनीची एकापेक्षा जास्त घरगुती गॅस कनेक्शन असल्यास आपणास के.वाय.सी.फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यासाठी निवासाचे व ओळखपत्राचे पुराव्यासह फॉर्म भरणे आवश्यक आहे.

के.वाय.सी.फॉर्म कोठे मिळेल?

के.वाय.सी. फॉर्म आपले विभागातील वितरकाकडे मोफत उपलब्ध आहेत.

नवीन गॅस कनेक्शन घेतेवेळी गॅस शेगडी व गॅस विषयक इतर साहित्य वितरकाकडून घेणे बंधनकारक आहे का?

नाही. तुम्ही गॅस वितरकाव्यतिरिक्त अन्य दुकानातून ISI प्रमाणित गॅस शेगडी खरेदी करू शकता. तुम्ही बाहेरून शेगडी घेतल्यास गॅस एजन्सीचा कर्मचारी तुमच्या घरी येऊन व्हेरीफिकेशन करतो त्यांची योग्य ती फिस भरावी व पावती घ्यावी. गॅस एजन्सीकडून शेगडी घेणे बंधनकारक नाही असा फलक एजन्सीच्या कार्यालयात दर्शनी भागात मराठी भाषेतून लावला पाहिजे असा शासन आदेश आहे. गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गॅस वितरकांचे नाव पत्ता संपर्क क्रमांक गॅस/तेल कंपनीच्या अधिकाऱ्याचे नाव पत्ता संपर्क क्रमांक ई मेल ऍड्रेस इत्यादी तपशील दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे. जर एजन्सी चालक तुम्हाला शेगडी घेण्याची सक्ती करीत असेल तर तुम्ही तेल कपंनीच्या अधिकाऱ्यांकडे तसेच कंपनीच्या बेवसाईटवर जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदवावी.

गॅस सिलेंडरमध्ये रात्री/सुट्टीचे दिवशी गळती झाल्यास संपर्क कोठे साधावा?

गॅस सिलेंडरमध्ये रात्री/सुट्टीचे दिवशी गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यास तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचे तात्काळ मदत केंद्र (Emergency Service Cell (ESC)) येथे संपर्क साधावा.

घरगुती गॅस सिलेंडर वितरण व सिलेंडर काळया बाजाराशी संबंधित तक्रारीसाठी कोठे संपर्क साधावा?

घरगुती गॅस सिलेंडर वितरण व सिलेंडर काळया बाजाराशी संबंधित तक्रारीसाठी एल.पी.जी.ग्राहक सहाय्यता केंद्र (LPGCustomer Service Cell) किंवा जवळचे एल.पी.जी. कंपनीचे क्षेत्रिय कार्यालयात संपर्क साधावा. तसेच आपण तक्रार ऑनलाईन दाखल करू शकता किंवा कंपनीच्या हेल्पलाइन: ऑइल इंडस्ट्री: 1800 2333555 (टोल फ्री), भारत पेट्रोलियम: 020-26345141/42,26342176, हिंदुस्थान पेट्रोलियम: 020-26213104/05 आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन: 020-26332661 संपर्क साधू शकता. तसेच आपल्या तालुक्यातील शिधावाटप अधिकारी वा तहसील कार्यालयातील पूरवठा अधिकारी यांच्याकडे ही तक्रार करू शकता.

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा मोटार सायकल, गिझर इत्यादी करिता वापर करता येईल का?

एल.पी.जी. नियंत्रण कायदान्वये घरगुती वापराचे गॅस सिलेंडरचा मोटार सायकल, गिझर इत्यादी करिता वापर करण्यास प्रतिबंध करणेत आला आहे. मोटार सायकलमध्ये Auto LPG चा वापर करू शकता. तथापि, घरगुती सिलेंडरचा वापर स्वयंपाकाचे इंधन (cooking fuel) म्हणूनच मर्यादित आहे.

ग्राहकांना गॅस सिलेंडर घरपोच आणून देणे वितरकांना बंधनकारक आहे का?

होय, वितरकांमार्फत गॅस सिलेंडर ग्राहकांचे राहत्या घरी पोहचविण्यात येतो. याकरिता स्वतंत्र शुल्क आकरणेत येत नाही. वितरकाच्या कार्यक्षेत्राबाहेर सिलेंडर पोहचविण्या करिता निर्धारित भाडे आकरले जाते.

सिलेंडरमध्ये कमी गॅस भरलेला कसे ओळखावे? याची खातरजमा कशी करावी?

गॅस सिलेंडर घरी पोहचविणाऱ्या कर्मचाऱ्याकडे वजने मापे निरिक्षकांनी प्रमाणित करून दिलेला वजन काटा असणे बंधनकारक आहे. माझ्याकडे वजनकाटा नाही असे कायद्याने तो म्हणू शकत नाही. घरगुती वापराच्या सिलेंडरमधील सिलेंडर मधील गॅस चे वजन १४.२ किलो इतके असते. आपण घेत असलेल्या सिलेंडरमध्ये खरेच १४.२ किलो गॅस भरलेला आहे काय याची खातरजमा करून घ्यावी. रिकाम्या सिलेंडरचे वजन सिलेंडरच्या वरच्या भागावर प्रिंट केलेले असते. सिलेंडरचे रिकामे वजन अधिक १४.२ किलो. म्हणजेच सिलेंडरचे एकूण वजन भरेल. भरलेल्या सिलेंडरचे एकूण वजन वजा सिलेंडरच्या रिकाम्या टाकीचे वजन बरोबर सिलेंडरमधील एकूण गॅस चे वजन हे वजन १४ किलो २०० ग्रॅम इतके आले पाहिजे. यात साधारणत १५० ग्रँम चा फरक प्रमाण मानला जातो.जर सिलेंडरमधील गॅस चे वजन १४ किलो ५० ग्रॅम पेक्षा कमी असेल तर असा सिलेंडर कमी वजनाचा सिलेंडर ग्राहकांनी घेऊ नये. तो बदलून योग्य त्या वजनाचा दुसरा सिलेंडर मागावा.

कॅश अँड कॅरी म्हणजे काय? आपण स्वत: सिलेंडर घेऊन आलो तर वाहतूक खर्च म्हणून आपणास आकारले जाणारे पैसे परत मिळतात काय?

जेव्हा कधी कधी आपण गॅस एजन्सीच्या गोदामावर कार्यालयात जाऊन आपण स्वतः पैसे देऊन भरलेला सिलेंडर घेऊन येतो. यास कॅश ॲण्ड कॅरी म्हणतात. अशा वेळी ग्राहकांना गॅस सिलेंडरच्या एकूण किंमतीमध्ये वाहतूक खर्च वजा केला पाहिजे. म्हणजेच १५ रूपये वाहतूक सवलत मूल्य म्हणून कमी घेतले पाहिजेत. आपण कष्ट करून पैसे कमावतो. तेव्हा कॅश ॲण्ड कॅरी करताना एजन्सीला हे १५ रूपये कमी द्यावेत.

घरगुती गॅस सिलेंडरचे दोन बुकींगमधील कालावधी किती दिवसाचा असेल?

घरगुती गॅस सिलेंडरचे दोन बुकींगमधील कालावधी ग्राहकाच्या गरजेनुसार असेल. दोन बुकींग मधील अंतर किमान १८ दिवस किंवा २१ दिवसाचे असते असे बऱ्याच वेळा गॅस एजन्सीतून सांगितले जाते. पंरतु गॅस ॲण्ड ऑईल खात्याच्या कायद्याप्रमाणे वा गॅस कंपनींच्या नियमाप्रमाणे असे कोणतेही नियमाचे बंधन नाही. आपल्या गरजेनुसार आपण बुकींग करू शकतो.

सिलेंडरची एक्सपायरी डेट असते काय? ती कशी ओळखावी?

घरगुती गॅस चा सिलेंडर हा भक्कम अशा धातूपासून व पूर्ण सुरक्षीत राहिल असा बनविलेला असतो. परंतु सिलेंडर भरल्यानंतर आतील गॅसचा सिलेंडरवर खूप मोठा दाब असतो. त्यामुळे सिलेंडर टाकी तयार केल्यानंतर वारंवार रिफिल करण्यासाठी जास्तीत जास्त किती दिवस वापरता येईल याची एक काल मर्यादा ठरवलेली असते. या अधिकतम कालावधीस एक्सपायरी डेट म्हणतात. ही काल मर्यादा ए. (जाने.फेब्रु.मार्च) बी. (एप्रील.मे.जून) सी. (जूलै. ऑगस्ट. सप्टें) डी. (ऑक्टो. नोव्हे. डिसें.) असे गट व पुढे वर्ष अशी असते. सिलेंडरच्या टाकीवर वरच्या तीन पट्याच्या आतील एका पट्टीवर सिलेंडरची एक्सापायरी डेट नोंदवलेली असते. उदा.जर ती कालमर्यादा ए-२२ अशी असेल तर तो सिलेंडर मार्च २०२२ पर्यंत वापरासाठी सुरक्षित आहे. असे समजावे. आपल्या घरी नवीन सिलेंडर घेताना त्यावरील एक्सपायरी डेट पाहून घ्यावी. एक्सपायरी संपलेला सिलेंडर घेऊ नये.

गॅस सिलेंडरचा नुकसानी अपघात किंवा स्फोट झाल्यास विमा सरंक्षण असते काय?

आपण जेव्हा गॅस सिलेंडरची रक्कम भरतो त्यातील काही रक्कम ही गॅस कंपनीकडून सिलेंडरच्या स्फोटामुळे होणाऱ्या सांभाव्य दुर्घटनेतील नुकसान भरपाईचा विमा म्हणून विमा कंपनीकडे भरलेली असते. यास सार्वजनिक दायीत्व पॉलीसी म्हणतात त्यामुळे अशा दुर्घटनेतून होणारी नुकसान भरपाई ग्राहक गॅस कंपनी कडे मागू शकतो. योग्य त्या प्रक्रियेनंतर गॅस कंपनी जर गॅस कंपनी जबाबदार ठरत असेल तर अशी नुकसान भरपाई मिळू शकते. ही मर्यादा मालमत्ता नुकसानीच्या बाबतीत अधिकतम ४० लाख आहे. तसेच मृत्यू दुर्घटनेच्या बाबतीत अधिकतम ५० लाख रूपये इतकी आहे.

सिलेंडर जोडणीचा/ग्राहकांचा मालकी हक्क बदलू शकतो काय?

होय, चालू ग्राहकांच्या मृत्यूनंतर काही कागदपत्रांच्या पूर्तते नंतर ग्राहकांच्या एका वारसाच्या नावे जोडणीचा मालकी हक्क घेता येतो. तसेच आपल्या कुटुंबातील नात्यामध्येही ना हरकत व अन्य कागदपत्राच्या पूर्ततेनंतर गॅस जोडणीचा मालकी हक्क बदलता येतो.

आपल्या घरी गॅस कंपनी किंवा एजन्सीचे कर्मचारी तपासणी येतात व फार मोठी रक्कम आकारतात. यावर उपाय काय?

प्रत्येक ग्राहकांनी किमान दोन वर्षातून एकदा गॅस शेगडी, रबरी ट्युब, रेग्लुलेटर यांची तपासणी करून घेणे हे नियमाप्रमाणे बंधनकारक आहे. परंतु जेव्हा गॅस कंपनीचे लोक तपासणी साठी घरी येतात तेव्हा त्यांचे आय कार्ड, तपासणी अधिकार पत्र याची विचारणा करावी.

गॅस एजन्सीकडे फोन करून ते अधिकृत प्रतिनिधी आहेत काय?

याची खात्री करून घ्यावी. ते जर अधिकृत असतील तरच त्यांना तपासणी करू द्यावी. तपासणी नंतर शेगडी दुरूस्ती, रबर ट्युब बदलणे किंवा इतर किरकोळ दुरस्ती यांची एकूण किती रक्कम आकारली त्याचे बील घ्यावे. त्यांना रोख पैसे देऊ नयेत. हे बील जेव्हा ग्राहक पुढच्या वेळेचा सिलेंडर भरून घेईन त्यावेळसच्या एकूण बील आकारणीत आकारण्यात येईल तेव्हा चुकते करावे. त्यामुळे दुरूस्ती प्रतिनिधीनी ग्राहकांना काय सेवा दिली व त्याचे शुल्क किती आकारले यांची अधिकृत नोंद राहते. व ग्राहकांची लुबाडणूक होत नाही. ऑईल आणि गॅस खात्याने यासाठी वरील प्रमाणे नियमच केलेला आहे.

गॅस एजन्सी चालकाविरोधात तक्रार करा:

आपले अन्नधान्य वितरण अधिकारी जे तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकारी असतात त्यांच्याकडे देखील आपण तक्रार करू शकतो. एजन्सीच्या ज्या काही वेबसाईट आहेत. जसे की भारत गॅस, HP गॅस, इंडियन गॅस या तीन मोठ्या कंपन्या भारतात गॅस डिस्ट्रिब्युशनच काम करतात. आपण त्यांच्या वेबसाईटवर ती जाऊनही तक्रार करू शकतो. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या पिजी पोर्टल वरून आपण तक्रार करू शकतो.

HP GAS –  https://www.hindustanpetroleum.com/cms

Bharat GAS – https://www.ebharatgas.com/

Indian Oil – https://www.iocl.com/

गॅस ग्राहकांची अडवणूक करणाऱ्या गॅस एजन्सी चालकाविरोधात माहितीचा अधिकार RTI वापरा:

गॅस ग्राहकांची अडवणूक करणाऱ्या गॅस एजन्सी चालकाविरोधात माहितीचा अधिकार RTI वापरा, माहितीचा अधिकार RTI नमुना अर्जासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – एलपीजी ग्राहकांसाठी रिफिल बुकिंग पोर्टेबिलिटी सुविधा – आता गॅस भरा आपल्या पसंतीच्या वितरककडून

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “LPG Gas Cylinder : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांचे अधिकार

  • SAM Awale

    माहिती अधिकार कायदा व सुव्यवस्था यांची माहिती फार छान मिळत आहे तरी माहिती किंवा माहिती अधिकार कायद्याच्या pdf फाईल डाऊन लोड कसा करायचा ते जर आपण माहिती देण्यात यावी अशी अपेक्षा आहे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.