दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी आता दिव्यांग सांगाती पोर्टल सुरु – जिल्हा परिषद,रत्नागिरी
नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देणे यासाठी शासन नेहमी आग्रही असते. या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचावणेसाठी जिल्हा परिषद,रत्नागिरी मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत “दिव्यांग सांगाती” राबविण्याचे निश्चित झाले आहे.
दिव्यांग सांगाती ऑनलाईन नोंदणीची उद्दिष्टे
- सर्व पात्र दिव्यांग लाभार्थींना ‘स्वावलंबन कार्ड’ उपलब्ध करून देणे.
- जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंदणी १००% करून ती संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करणे.
- अपंगत्व प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र देणे.
- तपासणी पश्चात पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या दिव्यांगाना संदर्भ सेवा देऊन शासनाच्या विविध योजनाद्वारे उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देणे.
- दिव्यांगांसाठी उपकरणे आवश्यक असल्यास उपलब्ध करून देणे. (उदा.३% अपंग निधी, इतर शासकीय योजना, स्वयंसेवी संस्था, CSR इ.)
- प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ देण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करणे. (उदा. ३% खर्च योजना, विमा योजनेचा लाभ मिळवून देणे, पेन्शन योजना, एसटी / रेल्वे पास, इतर शासकीय लाभ इ.)
दिव्यांग सांगाती ऑनलाईन नोंदणीचा उद्देश
- विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि आरोग्य विषयक संदर्भ सेवा उपलब्ध करून देऊन अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
- या अभियानांतर्गत जिल्यातील सर्व दिव्यांगांची नोंदणी करणे,
- दिव्यांगांची तपासणी करून त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे.
दिव्यांग सांगाती, विविध योजनांची माहिती – जिल्हा परिषद,रत्नागिरी
- शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण
- स्वयंसेवी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा/ कार्यशाळांमधून अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण
- अपंग कल्याण राज्य पुरस्कार
- अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे
- अपंग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य.
- अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल.
- अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके
- मतिमंद बालगृहे अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण
- वृध्द व अपंगांसाठी गृहे जिल्हा परिषद
- अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना.
- शालांत परिक्षोत्तर ( मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.
- शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
- मुदत कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सूक्ष्म वित्त पुरवठा, थेट कर्ज योजना
दिव्यांग नोंदणी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
१. स्कॅन केलेला फोटो
२. दिव्यांग प्रमाणपत्र
३. दिव्यांग जात प्रमाणपत्र
४. वयाचा पुरावा
टीप : नोंदणी करण्यासाठी वरील कागदपत्रे स्कॅन करून घ्यावीत.
दिव्यांग ऑनलाईन नोंदणी फॉर्म:
दिव्यांग नोंदणी फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://zprtndivyangsangati.com/pgeHome.aspx
संपर्क:
समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी. समाज कल्याण अधिकारी.
दूरध्वनी क्रमांक: ०२३५२-२२२३९१
ई-मेल: dswo.zprtn@gmail.com
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!