Cycle Yojana : सायकल खरेदीसाठी या मुलामुलींना मिळणार अर्थसाहाय्य !
जिल्हा परिषदेच्या सेस योजना सन 2024-25 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते नववीमध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींना सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य (Cycle Yojana) पुरविण्यासाठी अर्जदारांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
सायकल खरेदीसाठी या मुलामुलींना मिळणार अर्थसाहाय्य ! Cycle Yojana :
१) या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते नववीमध्ये शिकणारा असावा.
२) त्याचप्रमाणे विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेचे अंतर त्याचा मूळ राहत्या घरापासून 2 कि.मी. असावे.
३) ही योजना डीबीटी तत्वावर राबविण्यात येणार असल्याने निवड केलेल्या लाभार्थ्यांने सर्वप्रथम सायकल खरेदी करुन अनुदानासाठी मूळ देयक व सायकल खरेदी केल्याबाबतचे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्रासह प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी अथवा गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांना सादर करावयाचा आहे.
४) त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर सायकलच्या किंमतीइतके अथवा जास्तीत जास्त 5 हजार रुपये वर्ग करण्यात येणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे:
- कायम रहिवासी प्रमाणपत्र.
- B. P.L. कार्ड.
- जात प्रमाणपत्र.
- शाळेचे प्रमाणपत्र.
- आधार कार्ड.
सायकल खरेदी अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज करा !
जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपले अर्ज गटविकास अधिकारी अथवा जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद या ठिकाणी संबंधित कार्यालयात सादर करावेत.
ज्या विद्यार्थ्यांनी सन 2023-24 मध्ये अर्ज सादर केला होता व कागदपत्राच्या छानणी अंती पात्र आहे परंतु ईश्वर चिठ्ठीमध्ये निवड झाली नाही, अशा विद्यार्थ्यांनी परत अर्ज सादर करावयाची आवश्यकता नाही.
विलंबाने प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण विभागा मार्फत केले आहे.
हेही वाचा – MahaJyoti Free TAB 2025-26 : महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!