वृत्त विशेषसरकारी कामे

स्वामित्व (SVAMITVA) योजनेची सद्यस्थिती

केंद्रीय विभागीय योजनेअंतर्गत, गावांचे सर्वेक्षण आणि ग्रामीण भागात सुधारित तंत्रज्ञानासह आलेखन (SVAMITVA) योजना, आर्थिक वर्ष 2020-21 पासून सुरू झाली. कायदेशीर मालकी हक्क (मालमत्ता पत्रक / स्वामित्व हक्क {टायटल डीड}) देऊन गावातील घरमालकांना, गावांतील रहिवासी भागात घर दिल्याच्या ‘हक्कांची नोंदणी करून घेणे’, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पंचायत राज मंत्रालय, भारतीय सर्वेक्षण विभाग, (SoI), राज्य महसूल विभाग, राज्य पंचायतराज विभाग आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नांनी याची अंमलबजावणी केली जात आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांनी भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश या राज्यासह 29 राज्यांनी एस ओ आय (SoI)सोबत सामंजस्य करार केला आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील, ग्रामीण भागातील लोकांच्या संख्येचा तपशीलासह, ज्यांना स्वामित्व (SVAMITVA) योजनेअंतर्गत त्यांच्या मालमत्तेचे मालकी हक्क देण्यात आले आहेत, त्यांचा तपशील पुढील परिशिष्टात जोडला आहे.

केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी राज्यसभेत लिखित उत्तरात ही माहिती दिली.

02.02.2022 रोजी स्वामित्व (SVAMITVA) योजनेच्या अंमलबजावणीची स्थिती:

अ.क्र.राज्यज्या गावांमध्ये ड्रोन उड्डाण केलेज्या गावांमध्ये प्रॉपर्टी कार्ड वितरित केले गेलेवितरित केलेल्या प्रॉपर्टी कार्डची संख्या
1.आंध्र प्रदेश1,36200
2.हरियाणा6,4623,0613,80,946
3.कर्नाटक2,2018361,90,048
4.मध्य प्रदेश16,5083,5923,85,463
5.महाराष्ट्र11,5191,5992,35,868
6.उत्तर प्रदेश52,25015,94023,47,243
7.उत्तराखंड7,7833,0041,16,000
8.पंजाब67700
9.पंजाब1,40938582
10.गुजरात25300
11.छत्तीसगड1,45800
12.जम्मू आणि काश्मीर44300
13.अरुणाचल प्रदेश11000
14.दादरा आणि नगर हवेली7300
15.केरळ400
16.झारखंड22000
17.आसाम3700
18.ओडिशा10800
19.हिमाचल प्रदेश8900
20.मिझोराम1000
21.त्रिपुरा1800
22.लक्षद्वीप बेट400
23.लडाख5223
24.सिक्कीम100
25.पुद्दुचेरी1900
26.तामिळनाडू200
27.गोवा41000
28.अंदमान आणि निकोबार बेट20900
एकूण1,03,64428,07236,56,173

हेही वाचा – स्वामित्व योजना म्हणजे काय? प्रॉपर्टी कार्डचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर (Svamitva Scheme)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.