फक्त 100 रूपये मध्ये करा रेल्वे तिकीट एजंट रजिस्ट्रेशन !
CSC च्या माध्यमातून अनेक VLE ना चांगला आर्थिक लाभ देण्याचे काम हे IRCTC करणार आहे. आता फक्त 100 रूपये मध्ये रेल्वे तिकीट एजंट (IRCTC Agent Registration) रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. आपण या लेखात रेल्वे तिकीट एजंट रजिस्ट्रेशन CSC मार्फत ऑनलाईन कसे करायचे ते सविस्तर पाहणार आहोत.
CSC IRCTC एजंटचे फायदे:
1. अमर्यादित तिकीट बुकिंग.
2. झटपट कमिशन.
3. इतर एजन्सीच्या तुलनेत कमी नोंदणी शुल्क.
4. IRCTC एजंटना अमर्यादित तिकीट बुकिंग, मोठ्या प्रमाणात तिकीट बुक करण्याची लवचिकता, प्रवासी उद्योगात मान्यता, तत्काळ तिकीट बुक करण्याची परवानगी.
रेल्वे तिकीट एजंट रजिस्ट्रेशन प्रोसेस – CSC IRCTC Agent Registration:
IRCTC सह नोंदणी (IRCTC Agent Registration) करण्यासाठी प्रथम डिजिटल सेवा पोर्टलवर CSC ID ने लॉगिन करा आणि IRCTC Registration असे सर्च करून त्यावर क्लिक करा.
https://digitalseva.csc.gov.in
आता एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये IRCTC Agent Registration वर क्लिक करा.
पुढे IRCTC Agent Registration Form (Rs. 100/- Non Refundable Security Deposit) CLICK HERE वर क्लिक करा.
IRCTC एजंटसाठी नोंदणी फॉर्म ओपन होईल त्यामध्ये खालील तपशील भरा आणि सबमिट करा.
- मोबाईल नंबर एंटर करा.
- ईमेल आयडी एंटर करा.
- पॅन कार्ड आयडी एंटर करा.
सूचना: कृपया तुम्ही IRCTC मध्ये कधीही वापरलेला नसलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी एंटर करायचा आहे.
वरील तपशील सबमिट केल्यानंतर खालील तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- तुम्हाला तुमचा CSC आयडी, नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग, पॅन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक भरावा लागेल.
- तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, राज्य, जिल्हा, पिनकोड आणि पत्ता अचूक भरा.
- कृपया तुमचे पॅन कार्ड आणि पत्ता पुरावा अपलोड करा.
- अर्ज फी भरण्यासाठी पे आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
CSC IRCTC एजंट (IRCTC Agent Registration) नोंदणी ऑनलाइन केल्यानंतर १५ किंवा २० दिवसानंतर, तुमचे सीएससी आयआरसीटीसी एजंट अॅक्टिव्हेशन आपोआप होते आणि CSC IRCTC एजंट नोंदणी ऑनलाईन करताना तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर IRCTC ला लॉग इन करण्यासाठी आयडी आणि पासवर्ड देखील दिला आहे.
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही IRCTC नोंदणी (IRCTC Agent Registration) फॉर्म पेजवर जाऊन आणि Find Your IRCTC Agent Code वर क्लिक करून तुमचा IRCTC ID आणि पासवर्ड पुन्हा मिळवू शकता.
हेही वाचा – CSC सेंटर मध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि त्यांच्या वेबसाईट लिंक
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!