नवीन CSC बँक मित्र BC नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू – CSC Axis Bank BC Registration
CSC ही अनेक सरकारी तसेच खाजगी सेवा एकाच क्षेत्रा खाली देते त्यातील एक महत्वाची सेवा म्हणजेच बँकिंग सेवा. बँक मित्र या नावाने अनेक ठिकाणी बँक आपल्या प्रतींनिधी मार्फत बँकेच्या विविध सेवा पुरवते हीच सेवा CSC च्या माध्यमातून अनेक VLE ना चांगला आर्थिक लाभ देण्याचे काम हे Bank BC अर्थात Banking correspondent ची नेमणूक करून CSC करत आहे.
CSC व अनेक खाजगी तसेच सरकारी बँका यांच्यामध्ये करार होऊन CSC ने अनेक आपल्या VLE ची नेमणूक Bank BC म्हणून केलेली आहे. तुमच्याकडे जर CSC सेंटर (आपले सरकार सेवा केंद्र) म्हणजे CSC ID तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे ती म्हणजे ॲक्सिस बँकेकडून आता बीसी पॉइंटसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे.
नवीन CSC बँक मित्र BC नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस – CSC Axis Bank BC Registration:
नवीन CSC बँक मित्र BC नोंदणी करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला खालील CSC Bank Mitra पोर्टल ओपन करायचा आहे.
http://bankmitra.csccloud.in
CSC Bank Mitra पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे चार पर्याय पाहायला मिळतील त्यामध्ये Application for Axis BC या पर्यायावर क्लिक करा.
अनुपालनानुसार फक्त एका बँकेसाठी एक बीसी अनुमत आहे. तुम्ही आधीपासून इतर कोणत्याही बँकेचे BC चालवत असाल तर तुम्ही नवीन दुसऱ्या कोणत्याही बँकेचे BC नोंदणी करू शकत नाही, त्यामुळे ज्यांच्याकडे इतर कोणत्याही बँकेचे BC नसेल तरच No वर क्लिक करून Submit करा आणि नवीन CSC Bank BC साठी नोंदणी करायची आहे.
आता पुढे आपला CSC ID टाकायचा आहे आणि Continue बटनवर क्लिक करायचे आहे.
आता तुमचं नाव तपासा आणि आपले राज्य, जिल्हा, बँक शाखेचे नाव, बँक शाखा कोड, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरा.
पुढे बँक शाखेपासून अंतर (KM मध्ये) निवडा आणि तुमचे अॅक्सिस बँकेत खाते असेल तर Yes वर क्लिक करून खाते नंबर टाका, अॅक्सिस बँकेत खाते नसेल No क्लिक करून चेक बॉक्स मध्ये क्लिक करा आणि Submit बटन वर क्लिक करून Bank BC Registration फॉर्म सबमिट करा.
Axis Bank BC Registration फॉर्म सबमिट झाल्यानंतर बँक बीसी मिळण्यासाठी तुम्हाला कॉल येईल. त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला कळविली जाईल.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!