गाव नमुना ६-ब (विलंब शुल्क प्रकरणांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 6B
मागील लेखामध्ये आपण “गाव नमुना ६ (फेरफारांची नोंदवही) आणि गाव नमुना ६-अ ( विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही )” विषयीची संपूर्ण माहिती पाहिली. आपण या लेखात गाव नमुना ६-ब (विलंब शुल्क प्रकरणांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
गाव नमुना ६-ब (विलंब शुल्क प्रकरणांची नोंदवही) – Gav Namuna 6B:
ही एक दुय्यम नोंदवही आहे. जी व्यक्ती, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १४९ ( अधिकार संपादनाचे वृत्त ) किंवा कलम १५१ अन्वये ( हक्क हितसंबंध, दायित्वे बाबत आवश्यक माहिती पुरविणे ) विहित केलेल्या मुदतीत ( तीन महिन्याच्या आत ) देण्यात हयगय करेल ती व्यक्ती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १५२ अन्वये दंडासाठी पात्र राहील. असा दंड जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करता येतो. ( दंडाच्या रकमेसाठी अद्ययावत तरतूद बघावी. )
गाव नमुना ६-ब मध्ये नोंद कशी करावी.
गाव नमुना सहा – ब स्तंभ १ मध्ये गाव नमुना सहामधील नोंद क्रमांक ( फेरफार क्रमांक ) नोंदवावा.
गाव नमुना सहा – ब स्तंभ २ मध्ये अधिकार संपादन करणाऱ्या व्यक्तीचे किंवा दस्तऐवज धारण करणाऱ्या व्यक्तीचे नाव लिहावे.
गाव नमुना सहा – ब स्तंभ ३ मध्ये उपरोक्त तरतुदींन्वये दंड बसवावयाच्या संदर्भात तहसिलदार यांनी पारित केलेला आदेश क्रमांक व दिनांक लिहावा.
गाव नमुना सहा – ब स्तंभ ४ मध्ये तहसिलदार यांनी वरील प्रमाणे आदेश दिल्यानंतर, वसूल केलेला दंड संबंधिताने भरल्यानंतर त्याला त्याबाबत पावती द्यावी व सदर पावतीचा क्रमांक ( स्तंभ ४ मध्ये ) येथे लिहावा.
हेही वाचा – तलाठी कार्यालयातील – गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!