गाव नमुना १-ड विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 1-D
मागील लेखामध्ये आपण गाव नमुना १ (जमिनींची नोंदवही), गाव नमुना १ चा गोषवारा, गाव नमुना १-अ (वन जमिनींची नोंदवही), गाव नमुना १-ब (बिन भोगवट्याच्या (सरकारी) जमिनींची नोंदवही) आणि सुधारित गाव नमुना १-क (भोगवटादार वर्ग दोन म्हणून मंजूर केलेल्या जमिनी आणि ग्रामपंचायतीकडे निहित केलेल्या जमीनी यांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. या लेखामध्ये गाव नमुना १-ड (कुळ वहिवाट कायदा आणि महाराष्ट्र शेत जमीन ( जमीन धारणेची कमाल मर्यादा ) अधिनियम १९६१ च्या उपबंधानुसार अतिरिक्त म्हणून घोषित केलेल्या जमीनी दर्शविणारी नोंदवही.) विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
गाव नमुना १-ड (Gav Namuna 1-D):
गाव नमुना एक-ड हि एक दुय्यम नोंदवही आहे. यात कुळ वहिवाट कायदा आणि महाराष्ट्र शेत जमीन ( जमीन धारणेची कमाल मर्यादा ) अधिनियम १९६१ च्या उपबंधानुसार अतिरिक्त म्हणून घोषित केलेल्या जमीनी दर्शविणारी माहिती नोंदवली जाते.
स्तंभ १ अनुक्रमांकाचा आहे.
स्तंभ २ मध्ये भूमापन क्रमांक लिहावा.
स्तंभ ३ मध्ये जमिनीचा हिस्सा क्रमांक ( असल्यास ) नमूद करावा.
स्तंभ ४ मध्ये सदर जमिनीचे क्षेत्र हेक्टर – आर मध्ये नमूद करावे.
स्तंभ ५ मध्ये सदर जमिनीची आकारणी रु. पै. मध्ये नमूद करावी.
स्तंभ क्रमांक ६ अ ते ६ ब अंतर्गत असलेल्या दोन स्तंभांमध्ये, स्तंभ क्रमांक ६ अ मध्ये सदर जमिनीचे जलसिंचित क्षेत्र आणि स्तंभ क्रमांक ६ ब मध्ये सदर जमिनीचे अजलसिंचित क्षेत्र हेक्टर-आर मध्ये नमूद करावे.
स्तंभ ७ हा शेरा स्तंभ आहे.
हेही वाचा – तलाठी कार्यालयातील – गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!