आपले सरकार - महा-ऑनलाईनकौशल्य विकास व उदयोजकता विभागवृत्त विशेषसरकारी योजना

माझा लाडका भाऊ योजना – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ऑनलाईन अर्ज सुरु !

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – CMYKPY Scheme‘ ही आता माझा लाडका भाऊ योजना  (Ladka Bhau Yojana) या नावाने ओळखली जात असून या योजने अंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकार 6 हजार ते 10 हजार रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य करणार आहे. पण त्यासाठी सरकारने काही अटी आणि नियम निश्चित केले आहे. यासाठी सगळ्यात आधी तरुणांना अर्ज करावा लागणार आहे. या योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने कसा करायचा हे आपण पाहूया.

माझा लाडका भाऊ योजना – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – CMYKPY Ladka Bhau Yojana :

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – CM Youth Work Training Scheme” सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

उमेदवाराची पात्रता:

१) उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.

२) उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय / पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.

३) उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.

४) उमेदवाराची आधार नोंदणी असावी.

५) उमेदवाराचे बैंक खाते आधार संलग्न असावे.

६) उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

विद्यावेतन:

या  योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल. सदर विद्यावेतनाचे विवरण खालील प्रमाणे असेल.

अ.क्र.शैक्षणिक अर्हताप्रतिमाह विद्यावेतन रु.
१२वी पासरु. ६,०००/-
आय.टी.आय/ पदविकारु. ८,०००/-
पदवीधर /पदव्युत्तररु. १०,०००/-

माझा लाडका भाऊ योजना – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाईन अर्ज करा ! CMYKPY Ladka Bhau Yojana :

या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील.

नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला खालील माझा लाडका भाऊ योजनाच्या म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (CMYKPY Scheme Portal) योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

https://www.rojgar.mahaswayam.gov.in

वेबसाइटचे होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुम्ही क्लिक करताच, अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल.

नोंदणी पेज मध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड मोबाईलवर येईल.

नोंदणी झाल्यानंतर पुन्हा होमपेज वर येऊन CMYKPY  Traning Login मध्ये आपला आधार क्रमांक किंवा नोंदणी केलेला आयडीपासवर्ड टाकून Login करा.

आता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करावी लागेल.

पुढे अर्जदाराचा फोटो व रिझूम (Biodata) अपलोड करा व माझे प्रोफाइल वर क्लिक करून Generate Receipt वर क्लिक करा. पुढे Employment Card दिसेल ते डाउनलोड करा. अशा प्रकारे, तुम्ही माझा लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

सदर कार्य प्रशिक्षणचा कालावधी ६ महिने असेल. सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल.

प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना /उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बैंक खात्यात (DBT) ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल.

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग शासन निर्णय – CMYKPY  GR : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (Ladka Bhau Yojana) योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.