CM Vayoshree Yojana : मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ : ज्येष्ठ नागरिकांनी ३ हजार रुपये लाभासाठी! असा करा अर्ज
सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ११.२४ कोटी इतकी आहे. त्यापैकी सद्यस्थितीत ६५ वर्षे व त्यावरील अंदाजित एकूण १०-१२ टक्के ज्येष्ठ नागरिक (१.२५ – १.५० कोटी) आहेत. त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो. सदर बाब विचारात घेवून केंद्र शासनाने दारिद्रय रेषेखालील संबंधित दिव्यांग/दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारिरीक अक्षमतेनुसार सहाय्य साधने/उपकरणे पुरविण्याची वयोश्री योजना (CM Vayoshree Yojana) सुरु केली आहे. त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशीलता, संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे, यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना – CM Vayoshri Yojana” राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ : ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये ! CM Vayoshree Yojana :-
राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vayoshri Yojana” राबविण्यास मा. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे.
योजनेचे ध्येय व उद्दिष्ट – CM Vayoshree Yojana objective:
राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी रु. ३०००/- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (D.B.T) प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे.
योजनेचे स्वरूप :-
मुख्यमंत्री वयोश्री (CM Vayoshree Yojana) योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/+ दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने/ उपकरणे खरेदी करता येतील.
उदा:-
- चष्मा
- श्रवणयंत्र
- ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर
- फोल्डिंग वॉकर
- कमोड खुर्ची
- नि-बेस
- लंबर बेल्ट
- सर्वाइकल कॉलर इ.
तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.
निधी वितरण/अर्थसहाय्य:-
(i) राज्य शासनातर्फे १००% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल.
(ii) थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणाली द्वारे रु.३०००/- च्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल.
(iii) शिबीराचे आयोजन करणे :-
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण (पॉप्युलेशन बेस्ड स्क्रिनिंग) व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रिनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. अशाप्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल.
लाभार्थ्याची तपासणी, प्रवास, अल्पोपहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थी यांची नोंदणी, दस्ताऐवज हाताळणी, कागदपत्र तपासणी करुन त्यांना थेट लाभ हस्तांतरण (D.B.T.) द्वारे वितरीत करणे.
योजनेची अंमलबजावणी :-
- ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणालीद्वारे अदा करण्याकरिता आयुक्त, समाजकल्याण, पुणे हे नियंत्रण अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी (DDO) असतील.
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण करेल.
राज्य नोडल एजन्सी / यंत्रणा :-
- प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे, लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खाते यांची माहिती गोळा करणे इ. कामे जिल्हाधिकारी/आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे पार पाडण्यात येतील.
- मुख्यमंत्री वयोश्री (CM Vayoshree Yojana) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरीता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरीता आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येईल.
लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष :-
1. सदर योजनेतंर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नागरिकांनी दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यन्त वयाची ६५ वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक पात्र समजण्यात येतील). ज्या व्यक्तींचे वय ६५ वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
2. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य/केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो.
3. उत्पन्न मर्यादा – लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.२ लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.
4. सदर व्यक्तीने मागील ३ वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. मात्र दोषपूर्ण / अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.
5. पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तीक आधार संलग्न बचत खात्यात रु. ३०००/- थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरीत झाल्यावर मुख्यमंत्री वयोश्री (CM Vayoshree Yojana) योजनेअंतर्गत विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक (Invoice) व प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी प्रमाणित करुन पोर्टलवर ६० दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल.
6. निवड / निश्चित केलेल्या जिल्हयात, लाभार्थ्यांच्या संख्येपैकी ३० टक्के महिला असतील.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधारकार्ड / मतदान कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे २ फोटो
- स्वयं-घोषणापत्र
- शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे
नियंत्रण, मूल्यमापन व कामांचे स्वरूप :-
- नियंत्रण आणि मूल्यमापन-: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे या योजनेचे नियंत्रण केले जाईल.
- विभागाद्वारे या कार्यक्रमाचे मूल्यमापन अंमलबजावणीच्या एक वर्षानंतर आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांचेमार्फत केले जाईल.
- पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी आधार प्रमाणीकरण बँक खाते व आधार जोडणी विभागाशी समन्वयन करणे देय रक्कम थेट लाभ वितरण (DBT) द्वारे खात्यात वळती करण्यात येईल.
मार्गदर्शक तत्वे :
- आयुक्त, समाज कल्याण, पुणे हे जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची ओळख शहानिशा करून घेईल आणि मुख्यमंत्री वयोश्री (CM Vayoshree Yojana) योजनेअंतर्गत नमूद केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वे / अटी इत्यादीची खात्री केल्यानंतर लाभार्थ्यांची यादी अंतिम करेल.
- CPSU द्वारे लाभार्थ्यांकडून सदरील प्राप्त रक्कम नेमून दिलेल्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येईल असे स्वयंघोषणापत्र प्राप्त करून घ्यावे व राष्ट्रीय योजनेचा / केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा लाभ घेतला नसल्याचे देखील त्यात नमूद करून घ्यावे.
- योजनेच्या अंमलबजावणीची तपासणी करण्याचा अधिकार सामाजिक न्याय विभागास असेल.
- मुख्यमंत्री वयोश्री (CM Vayoshree Yojana) योजनेअंतर्गत प्राप्त निधीसाठी स्वतंत्र खाते उघडण्यात येईल. तसेच योजनेअंतर्गत कार्यान्चित होण्यासाठी निधी स्वतंत्र बँक खात्यात ठेवला जाऊ शकतो.
- पात्र लाभार्थ्यांना D.B.T. द्वारे रक्कम प्रदान करण्यात येईल. तसेच अखर्चिक रक्कम, D.B.T. मधील अडचर्णीमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झालेली रक्कम विभागाच्या खात्यात जमा करण्यात येईल.
- आर्थिक वर्षाचे खाते आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत किंवा पुढील मंजुरी यापैकी जे आधी असेल, जे उपयोगिता प्रमाणपत्र आणि अंमलबजावणी यंत्रणेच्या सक्षम अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेल्या लेखा परिक्षित खात्यांद्वारे प्रस्तुत केले जातील.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज व स्वयंघोषणापत्र PDF फाईल डाउनलोड – CM Vayoshree Yojana Form:
ख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये लाभासाठी अर्ज नमुना व स्वयंघोषणापत्र PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी संपर्क :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री-वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी विभागातील जिल्ह्यांच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय – CM Vayoshree Yojana GR:
- मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana) या योजनेतील सुधारणांबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- राज्यातील ६5 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना (CM Vayoshree Yojana) राबविण्यास मान्यता देणे बाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – राष्ट्रीय वयोश्री योजना – Rashtriya Vayoshri Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
good