आपल्या पंतप्रधान जन धन बँक खात्याची शिल्लक अशी तपासा !
केंद्र सरकारने देशाच्या जनतेसाठी सुरू केलेल्या सर्वात लोकप्रिय योजनांपैकी पंतप्रधान जन धन योजना. आपण कोणत्याही बँक शाखेत पीएम जनधन खाते उघडू शकता. पीएमपी जन धन योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण आपले खाते शून्य (PM Jan Dhan Account Balance) बॅलन्ससह उघडू शकता. परंतु जर खातेधारकाला चेकबुक पाहिजे असेल तर त्याने खात्यात किमान शिल्लक ठेवावी लागेल.
आता घरबसल्या तुमच्या जनधन खात्यात (JanDhan Account) किती पैसे (PM Jan Dhan Account Balance) आहेत हे माहीत करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बँकेत किंवा एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. चला तर जाणून घेऊया, घरबसल्या खात्यातील बॅलन्सची माहिती कशी घ्यायची.
आपल्या पंतप्रधान जन धन बँक खात्याची शिल्लक अशी तपासा ! PM Jan Dhan Account Balance:
आपण खालील दोन पर्यायांपैकी एक निवडून तुमच्या जनधन खात्यातील (PM Jan Dhan Account Balance) बॅलन्सची माहिती मिळवू शकता. पहिला आहे पीएफएमएस पोर्टल आणि दुसरे म्हणजे मिस्ड कॉलच्या माध्यमातून.
1. पीएफएमएस (PFMS) पोर्टल:
पीएफएमएस पोर्टलवरून माहिती मिळवायची असल्यास तुम्हाला खालील लिंकवर क्लिक करा.
https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx
पोर्टल ओपन झाल्यावर तिथे तुम्हाला मुख्य मेनू Payment Status मध्ये “Know Your Payment” ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमचा तुमची जन धन बँक निवडायची आहे, आणि तुम्हाला दोन वेळा तुमचा अकाऊंट नंबर टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि “Send OTP on Registered MObile No” वर क्लिक करून ओटीपी टाका, नंतर तुमच्या अकाऊंटमधील शिल्लक (PM Jan Dhan Account Balance) तुम्हाला दिसेल.
2. मिस्ड कॉल:
तुमचं जनधन खातं जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलच्या माध्यमातून अकाऊंट बॅलन्स (PM Jan Dhan Account Balance) जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 1800425380 या अथवा 1800112211 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला बँकेत रजिस्टर्ड मोबाईल नंबरचा वापर करावा लागेल.
हेही वाचा – प्रधानमंत्री जन धन योजना – Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!