वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनसरकारी कामे

काउंटरवर बुक केलेलं रेल्वेचे तिकीट ऑनलाईन रद्द कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर !

अनेकदा आपण कुठं तरी जाण्यासाठी रेल्वे तिकीट बुक करत असतो पण कधीकधी काही कारणास्तव आपलं जाणं रद्द होत असतं. त्यामुळे जर तिकीट ऑनलाइन काढलं असेल तर ते रद्द (Cancel) करता येत होतं. पण आता काउंटरवर आरक्षित केलेले तिकीटही तुम्हाला रद्द (Cancel Counter Train Ticket Online) करता येऊ शकणार आहे.

रेल्वेने एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्याअंतर्गत तुम्ही आता घरी बसून काउंटरवरून घेतलेले तिकीटही रद्द (Cancel Counter Train Ticket Online) करू शकता. पण त्याचे पैसे घेण्यासाठी तुम्हाला काउंटरवर जावे लागेल.

IRCTC च्या नियमानुसार ऑनलाइन तिकीट रद्द (Cancel Counter Train Ticket Online) केलं जाऊ शकतं, यासाठी महत्वाचे म्हणजे तिकीट खरेदी करताना तुमचा वैध मोबाइल क्रमांक द्यावा लागतो, म्हणजे जर तुम्ही तिकीट काढताना योग्य नंबर दिला नाही तर तुम्हाला काउंटरवरून घेतलेले तिकीट ऑनलाईन रद्द करता येणार नाही.

काउंटरवर बुक केलेलं रेल्वेचे तिकीट ऑनलाईन रद्द करण्याची प्रोसेस – Cancel Counter Train Ticket Online:

काउंटरवर बुक केलेलं रेल्वेचे तिकीट ऑनलाईन रद्द (Cancel Counter Train Ticket Online) करण्यासाठी खालील IRCTC च्या पोर्टलला भेट द्या.

www.operations.irctc.co.in/ctcan/SystemTktCanLogin.jsf

Cancel Counter Train Ticket Online
Cancel Counter Train Ticket Online

पुढे पेजवर आल्यावर तुमचा पीएनआर नंबर, ट्रेन नंबरकॅप्चा कोड टाकून सबमिट वर क्लिक करा.

नंतर मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी टाका, हा ओटीपी त्याच नंबरवर येईल जो तुम्ही तिकीट बुक करताना दिला होता.

ओटीपी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा पीएनआर नंबर प्रमाणित (Validate) करावा लागेल व नंतर Cancel Ticket च्या ऑप्शन वर क्लिक करा.

रिफंड अमाउंटची माहिती:

यानंतर तुमची रिफंड अमाउंटची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, तसेच त्याचा फोटोही तुम्हाला तिथं मिळू शकेल.

यामध्ये जरी तुम्ही तिकीट ऑनलाईन पद्धतीने रद्द (Cancel Counter Train Ticket Online) केले तरीही , याची रिफंड तुम्हाला काउंटरवर मिळणार आहे , त्यासाठी हि प्रोसेस झाल्यानंतर तुमचं तिकीट घेऊन पीआरएस काउंटरवर आपल्याला भेट द्यावी लागेल.

पीएनआर आणि परतावा तपशीलांसह एक एसएमएस पाठविला जाईल. नमुना स्वरूप: “तुमचा PNR xxxxxxxxxx रद्द करण्यात आला आहे. प्रवास सुरू होणाऱ्या स्टेशन किंवा जवळपासच्या उपग्रह PRS स्थानांवरून amt xxxxx परतावा गोळा करा.

काउंटर तिकीट रद्द करण्याचे नियम – Rules for Cancel Counter Train Ticket Online:
  1. बुकिंगच्या वेळी वैध मोबाइल नंबर दिलेला असेल तरच हे लागू होऊ शकते.
  2. PRS काउंटर तिकिटांसाठी तिकीट (Cancel Counter Train Ticket Online) रद्द करणे आणि भाड्याचा परतावा देण्याची परवानगी फक्त सामान्य परिस्थितीत असू शकते आणि ट्रेन उशीराने धावणे / ट्रेन रद्द करणे इत्यादी बाबतीत नाही.
  3. जर तिकीट पूर्णपणे कन्फर्म असेल तर ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या 4 तास आधी ऑनलाइन रद्द करण्याची परवानगी असेल.
  4. जर तिकीट आरएसी/वेटलिस्ट असेल तर ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वीच ऑनलाइन रद्द करण्याची परवानगी असेल.
  5. रद्द केलेल्या तिकिटांसाठी (परत प्रवासाच्या तिकिटांसह) कन्फर्म तिकिटांसाठी 4 तासांपर्यंत आणि आरएसी/वेटलिस्टेड तिकिटांसाठी नियोजित निर्गमन वेळेपूर्वी तीस मिनिटांपर्यंत: IRCTC वेबसाइटद्वारे रद्द केलेल्या PRS काउंटर तिकिटांचा परतावा किंवा सध्या 139 वर परवानगी आहे मूळ प्रवासाचे तिकीट समर्पण करून प्रवास सुरू करणारे स्टेशन किंवा जवळपासचे उपग्रह PRS स्थाने. कृपया तुमचे तिकीट रद्द करण्यापूर्वी प्रवास सुरू होणाऱ्या स्टेशनवरून परतावा गोळा करण्याची सोय तपासा. १) दुसऱ्या दिवशी PRS काउंटर उघडण्याच्या पहिल्या दोन तासांमध्ये ज्या गाड्यांचे नियोजित निर्गमन खालीलप्रमाणे आहे त्यांच्या तिकिटांसाठी:- वेळ (i) 1801 तास ते 0600 तासांच्या दरम्यान आहे. २) पीआरएस काउंटर/चालू काउंटर/विशेष काउंटरच्या कामकाजाच्या वेळेत ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या 4 तासांपर्यंत, ज्या गाड्यांची नियोजित सुटण्याची वेळ (i) 0601 तास ते 1800 तासांच्या दरम्यान आहे अशा गाड्यांच्या तिकिटांवर चोवीस तास रद्द करण्याची परवानगी आहे.
  6. प्रवाशांचे तपशील (नाव, वय, लिंग, बुकिंग स्थिती, सद्य स्थिती) आणि प्रवासाचे तपशील वेबसाइटवर प्रदर्शित केले जातील.
  7. एकदा प्रवाशाने पुष्टी केल्यावर PNR चे पूर्ण रद्दीकरण केले जाईल आणि PNR रद्द झाला म्हणून चिन्हांकित केला जाईल परंतु सिस्टममध्ये परतावा मिळणार नाही. सीट/बर्थ सोडला जाईल. प्रवाशाला देय परताव्याची रक्कम वेबसाइटवर देखील प्रदर्शित केली जाईल.
  8. सर्व विशेषाधिकार/कर्तव्य पास/पीटीओ/कंप्लिमेंटरी पास तिकिटे वेबसाइटद्वारे रद्द करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. पासच्या बाबतीत शून्य परतावा अनुज्ञेय आहे, तथापि, नवीन बुकिंगसाठी पासच्या वैधतेसाठी प्रवाशाने विहित नियमानुसार पूर्वी बुक केलेल्या तिकिटांवर तोच रद्द केलेला चिन्हांकित करून पास पुन्हा सत्यापित करण्यासाठी काउंटरवर जावे.

PTO ची तिकिटे एकूण मूळ भाड्याच्या 1/3 तारखेला जारी केली जातात आणि या तिकिटांवर देखील सामान्य रद्दीकरण शुल्क लागू आहे. त्यामुळे बऱ्याच प्रकरणांमध्ये PTOs वरील तिकीटाचे मूल्य रद्दीकरण शुल्कापेक्षा कमी असते त्यामुळे प्रवासी तिकिटे रद्द करू शकतात किंवा करू शकत नाहीत म्हणून PTO च्या बाबतीत देखील IRCTC वेबसाइटवर रद्द (Cancel Counter Train Ticket Online) करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

खालील लेख देखील वाचा !

  1. रेल्वेचं ई-तिकीट रद्द कसे करायचे? आणि रिफंड नियम जाणून घ्या सविस्तर!
  2. ई-तिकीट बुकिंगसाठी असे करा युजर रजिस्ट्रेशन आणि मिळवा IRCTC लॉगिन युजनेम आणि पासवर्ड
  3. IRCTC वर ऑनलाईन ट्रेन तिकीट बुकिंग कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर.
  4. रेल्वेचे ऑनलाईन तात्काळ तिकीट बुकिंग कसे करायचे?
  5. रेल्वे मध्ये खाद्यपदार्थ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ऑनलाइन असे मागवा !
  6. IRCTC ची ऑनलाईन बस तिकीट बुकिंग सेवा सुरू; अशी करा ऑनलाईन IRCTC ची बस तिकीट बुक !
  7. फक्त 100 रूपये मध्ये करा रेल्वे तिकीट एजंट रजिस्ट्रेशन !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.