विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे (Birsa Munda Krishi Kranti Yojana) निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस 4 लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते. इनवेल बोअरिंगसाठी आता 40 हजार तसेच यंत्रसामुग्रीसाठी 50 हजार रुपये आणि परसबागेकरिता 5 हजार देण्यात येईल. नवीन विहिरींबाबत 12 मीटर खोलींची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच दोन सिंचन विहिरींमधील 500 फूट अंतराची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे. शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी सध्या 1 लाख रुपये अनुदान देण्यात येते आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के किंवा 2 लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल. त्याच प्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या 25 हजार रुपये देण्यात येतात. आता तुषार सिंचन संच 47 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के अनुदानापैकी जे कमी असे ते अनुदान देण्यात येईल. अशाच प्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी 97 हजार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्क्यांपैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल.
याशिवाय इतरही अनेक निकषांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krishi Kranti Yojana) (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) या योजनेंतर्गत घटकांचे आर्थिक मापदंड वाढविणे, निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा – Birsa Munda Krishi Kranti Yojana:
बिरसा मुंडा कृषी क्रांती (Birsa Munda Krishi Kranti Yojana) योजनेंतर्गत पुढीलप्रमाणे अनुदानात वाढ व निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण:
प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याचे आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा रू.2 लाख यापैकी जे कमी असेल ते.इनवेल बोअरिंगसाठी 40 हजार रुपये,वीज जोडणी आकारासाठी 20,000 किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी जे कमी असेल ते .विद्युत पंपसंच/डिझेल इंजिनसाठी 10 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंपसंचकरिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 90% किंवा रू. 40,000 यापैकी जे कमी असेल ते. सोलार पंप (वीज जोडणी आकार व पंपसंच ऐवजी) प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा रू. 50,000 यापैकी जे कमी असेल ते. एचडीपीई/ पीव्हीसी पाईपसाठी प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 100% किंवा रू. 50,000 यापैकी जे कमी असेल ते .
सूक्ष्म सिंचन संच मध्ये तुषार सिंचन संचासाठी:
प्रचलित आर्थिक मापदंडान्वये तुषार सिंचन संच-रू. 47,000/- किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदान यापैकी जे कमी असेल ते.
ठिबक सिंचन संचासाठी प्रचलित आर्थिक मापदंडान्वये ठिबक सिंचन संच-रू. 97,000/- किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदान यापैकी जे कमी असेल ते.तुषार सिंचन संच पुरक अनुदान प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत (1) अल्प /अत्यल्प भूधारकांसाठी 55% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25% + बिरसा मुंडा कृषी क्रांती (Birsa Munda Krishi Kranti Yojana) योजनेतून 10% तसेच (2) बहू भूधारकांसाठी 45% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 30% + बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 15% किंवा रू. 47,000/- यापैकी जे कमी असेल ते.
ठिबक सिंचन संच पुरक अनुदान प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत (1) अल्प /अत्यल्प भूधारकांसाठी 55% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25% + बिरसा मुंडा कृषी क्रांती (Birsa Munda Krishi Kranti Yojana) योजनेतून 10% तसेच (2) बहू भूधारकांसाठी 45% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 30% + बिरसा मुंडा कृषी क्रांती (Birsa Munda Krishi Kranti Yojana) योजनेतून 15% किंवा रू. 97,000/- यापैकी जे कमी असेल ते.यंत्रसामुग्री (बैलचलित/ ट्रॅक्टर चलित अवजारे) (नवीन बाब) साठी 50 हजार रुपये.परसबागेसाठी पाच हजार रुपये.
त्याचप्रमाणे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लागू असलेली रु.1,50,000 वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत यंत्रसामग्री (बैलचलित / ट्रॅक्टरचलित अवजारे) ही नवीन बाब समाविष्ट करण्यात आली आहे.
नवीन विहीरीबाबत रू. 4 लाख अनुदान मर्यादेपर्यंत विहीरीची खोली असावी, 12 मीटर खोलीची अट रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये, यास मान्यता देण्यात आली आहे.
ही योजना अनुसूचित जमातीच्या लाभ धारकांसाठीच राबविण्यात येत असल्याने, दोन सिंचन विहिरींमधील 500 फूट अंतराची अट रद्द करण्यात आली आहे.
नवीन विहीर या घटकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थीस 20 वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ देण्यात यावा. शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण या घटकासाठी प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याचे आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा रू.2 लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्याची तरतूद करावी.
शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण या घटकाचा लाभ मागेल त्याला शेततळे या योजनेबरोबरच इतर योजनेंतर्गत शेततळ्याचा लाभ घेण्यात आलेल्या तसेच स्वखर्चाने शेततळे केलेल्या शेतकऱ्यांना देखील देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यास नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती किंवा शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण यापैकी एकाच घटकाचा व त्यासोबतच्या पॅकेजचा लाभ देय राहील.
अ) नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास नवीन विहीर, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन, सोलर पंप(वीज जोडणी व पंपसंच ऐवजी), एचडीपीई/ पीव्हीसी पाईप, सूक्ष्म सिंचन संच, यंत्रसामुग्री, परसबाग या घटकांसह एकूण रु. 6,42,०००/ किंवा रु. 6,92,००० एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. (विहीर- रु. 4,00,000+ इनवेल बोअरिंग-रु. 40,000 + वीज जोडणी आकार-रु.20,000 + विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन- रु. 40,000 किंवा सोलर पंप(वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)- रु. 50,000 + एचडीपीई/पीव्हीसी पाईप- रु. 50,000 + तुषार सिंचन संच रु. 47,000/ठिबक सिंचन संच रु. 97,000 + यंत्रसामुग्री- रु. 50,000+ परसबाग रु. 5,000 = रु. 6,42,000/किंवा रु. 6,92,000)
आ)जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास जूनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन, सोलर पंप(वीज जोडणी व पंपसंच ऐवजी), एचडीपीई/पीव्हीसी पाईप, सूक्ष्म सिंचन संच, यंत्रसामुग्री, परसबाग या घटकांसह एकूण रु 3,42,०००/ किंवा रु. 3,92,००० एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. (जूनी विहीर दुरुस्ती- रु.1,००,०००+ इनवेल बोअरिंग-रु. 40,000 + वीज जोडणी आकार-रु.20,000 + विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन- रु. 40,000 किंवा सोलर पंप(वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)- रु. 50,000 + एचडीपीई/पीव्हीसी पाईप- रु. 50,000 + तुषार सिंचन संच रु. 47,000/ठिबक सिंचन संच रु. 97,000 + यंत्रसामुग्री- रु. 50,000+ परसबाग रु. 5,000 = रु. 3,42,000/किंवा रु. 3,92,000)
इ) शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन, सोलर पंप(वीज जोडणी व पंपसंच ऐवजी), एचडीपीई/पीव्हीसी पाईप, सूक्ष्म सिंचन संच, यंत्रसामुग्री, परसबाग या घटकांसह एकूण रु. 4,०2,०००/किंवा रु. 4,52,००० एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. (शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण – रु. 2,००,००० + वीज जोडणी आकार-रु.20,000 + विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन- रु. 40,000 किंवा सोलर पंप(वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)- रु.50,000 + एचडीपीई/पीव्हीसी पाईप- रु. 50,000 + तुषार सिंचन संच रु. 47,000/ठिबक सिंचन संच रु. 97,000 + यंत्रसामुग्री- रु. 50,000+ परसबाग रु. 5,000 = रु. 4,02,000/किंवा रु. 4,52,000).
महाडीबीटी पोर्टल: https://mahadbt.maharashtra.gov.in/
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800
अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समितीचे कृषी अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
पुढील लेख देखील वाचा!
- शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना
- सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप” वर – MahaDBT Farmer App
- शेतकरी बांधवांची महाडीबीटी प्रणालीवर लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतर आणि पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!