मनरेगा अंतर्गत बिहार पॅटर्न वृक्ष लागवड योजना
मनरेगा अंतर्गत बिहार पॅटर्न वृक्ष लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक परिपूर्ण प्रस्ताव तुमच्या ग्रामपंचायतला सादर करावा लागणार आहे. या लेखामध्ये आपण बिहार पॅटर्न वृक्ष लागवड योजना संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. दर वर्षी लाखो झाडे लावली जातात परंतु, त्यापैकी किती झाडे जगतात हा खरा संशोधनाचा प्रश्न. पण राज्य सरकारने त्यावर उत्तर शोधले आहे ते बिहार पॅटर्न!
झाडे लावण्याबरोबर त्याचे संगोपन, संरक्षण करण्याची मोहीम ‘मनरेगा’अंतर्गत राबवायची. त्यामुळे नागरिकांना हाताला कामही मिळेल आणि झाडेही जगतील. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी राबविलेला हा प्रयोग राज्यभर ‘बिहार पॅटर्न’ नावाने सुरू आहे. पुणे जिल्ह्यातही हा प्रयोग राबविल्याने काही गावे टँकरमुक्त झाली. त्यामुळे ‘बिहार पॅटर्न’ यशस्वी होताना दिसत आहे.
धुळे जिल्ह्यातील बिहारी नावाच्या एका गरीब शेतकऱ्याने राबविलेला वृक्ष लागवडीसह संगोपन, संरक्षणाचा प्रकल्प यशस्वी ठरला. त्यामुळे झाडे लावली गेली नाही तर ती जगविता येऊ शकतात. त्याचे सरंक्षण होऊ शकते, हा विश्वास व्यक्त झाला. हीच संकल्पना राज्य सरकारने उचलली. त्या व्यक्तीच्या नावावरूनच त्या संकल्पनेला अर्थात वृक्ष लागवड, संगोपन आणि संरक्षणाच्या पॅटर्नला ‘बिहार पॅटर्न’ असे नामकरण केले आणि तो प्रयोग राज्यभर राबविण्यास सुरुवात झाली. ‘बिहार पॅटर्न’ हा प्रयोग राज्यात २००८ पासून राबविला जात आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात ‘बिहार पॅटर्न’ प्रभावीपणे राबविण्याचे काम पुणे जिल्हा परिषदेमार्फत सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी बारामती तालुक्यातील जळगाव सुपे हे गाव अतिशोषित गाव म्हणून जाहीर केले होते. भूजल सर्वेक्षण विभागाने या तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने तेथील भूजल पातळी घटली आहे. त्यामुळे विहिरी खोदण्यासाठी परवानगी देता येणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी, तीन वर्षांपूर्वी जळगाव सुप्यातील नागरिकांना पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत होती.
यासारखी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशीच स्थिती. ही गावे हिरवीगार दिसावीत, तेथे पाण्याची पातळी वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. त्या झाडांचे संगोपन, संरक्षण करण्यात आले. आता त्या ठिकाणी एकही टँकर सुरू नाही. शिवाय, त्या ठिकाणी ऊस लागवडही सुरू झाली आहे.
बिहार पॅटर्न वृक्ष लागवड योजना संपूर्ण प्रस्ताव संबधी माहिती :
‘बिहार पॅटर्न’अंतर्गत गावाच्या हद्दीत लावण्यात येणाऱ्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे दिली जाते. ग्रामपंचायतीमार्फत मनरेगांतर्गत गरीब कुटुंबांना काम देण्यात येते. मनरेगांतर्गत पहिले १०० दिवस २०० झाडांचे संगोपन आणि संरक्षणाचे काम करणाऱ्या एका कुटुंबाला दरमहा सहा हजार ७५ रुपयांची रक्कम केंद्र सरकारमार्फत दिली जाते. उरलेल्या २६५ दिवसांमध्ये झाडांच्या संगोपनासह सरंक्षणाचा खर्च हा राज्य सरकारने उचलणे अपेक्षित आहे. परंतु, राज्य सरकारवर आर्थिक बोजा येऊ नये यासाठी पुढील दोन ते तीन महिन्यांसाठी आणखी तीन कुटुंबांना वृक्ष संगोपन, संरक्षणाचे काम प्रत्येकी १०० दिवसांसाठी नव्याने दिले जाते. त्यामुळे त्या कुटुंबांना रोजगाराची हमी मिळते. त्यांच्या खात्यावर केंद्र सरकारमार्फत पैसे जमा होतात.
झाडांच्या संगोपनासाठी ग्रामपंचायतींना सरकारकडून वेगळा निधी देण्यात येत आहे. त्या निधीच्या माध्यमातून रोजगार मिळविणाऱ्या कुटुंबांना खते, अवजारे, हत्यारे, प्लास्टिकचे कागद यासारखे विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात येते. गेल्या दोन वर्षांच्या अनुभवावरून भविष्यात नक्कीच १०० टक्के झाडे जगतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या प्रयोगांतर्गत साग, चंदन, बांबू, आवळा, हिरडा, अर्जुन, सिताफळ, चिंच, जांभूळ, खैर, आंबा यासारखी २२ प्रकारची झाडे लावली जात आहेत. प्रत्यक्षात काम हवे असेल तर ग्रामीण भागातील त्या नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे कामाची मागणी करणे अपेक्षित आहेत. मागेल त्याला काम या धोरणानुसार आता ‘बिहार पॅटर्न’ राबविताना ‘मनरेगा’तून प्रत्येकाला कामही मिळत आहे.
बिहार पॅटर्न वृक्ष लागवड योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:
मनरेगा अंतर्गत बिहार पॅटर्न वृक्ष लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक परिपूर्ण प्रस्ताव तुमच्या ग्रामपंचायतला सादर करावा लागणार आहे, यामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश असेल.
- ग्रामसभेचा ठराव.
- जागेचा नकाशा.
- सदर जागेवर या अगोदर वृक्ष लागवड केली नसल्याबाबत प्रमाणपत्र
- संबधित विभागाची ना हरकत प्रमाणपत्र
- वृक्ष संवर्धन करण्याबाबत हमी पत्र
- अंदाज पत्रक
बिहार पॅटर्न वृक्ष लागवड प्रस्ताव PDF फाईल:
मनरेगा अंतर्गत बिहार पॅटर्न वृक्ष लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक परिपूर्ण प्रस्ताव तुमच्या ग्राम पंचायतला सादर करावा लागणार आहे. बिहार पॅटर्न वृक्ष लागवड प्रस्ताव PDF फाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवड अनुदान योजना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
👌🌲🌳