बांधकाम कामगार कल्याणकारी योजनाआपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी योजना

बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पहा ! लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर काय करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती !

मागील लेखामध्ये आपण बांधकाम कामगार कल्याणकारी योजना, कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी (Bandhkam Kamgar Labharthi Yadi – बांधकाम कामगार यादी) आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची ते सविस्तर जाणून घेतले. या लेखामध्ये आपण बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन कशी पाहायची? लाभार्थी यादी (Bandhkam Kamgar Labharthi Yadi) मध्ये नाव नसेल तर नोंदणीची स्थिती जाणून घेऊन, नोंदणी अपडेट कशी करायची याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने बऱ्याचदा घेत असते. अशा निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदित बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी) जमा करण्याची कार्यवाही सुरू केली जाते. त्यानुसार राज्यातील नोंदित बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात येते. निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याने कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो.

बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस – Bandhkam Kamgar Labharthi Yadi:

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभार्थी यादी (Bandhkam Kamgar Labharthi Yadi) ऑनलाईन पाहण्यासाठी प्रथम खालील लिंक ओपन करा.

mahabocw.in

बांधकाम कामगार नोंदणीची वेबसाईट ओपन झाल्यावर वरती मराठी भाषा निवडा आणि वरील मुख्य मेनू मध्ये “लाभ वितरित” या पर्यायामध्ये बांधकाम कामगारांना विविध लाभ वितरित केल्याच्या याद्या आपण पाहू शकतो.

आता इथे विविध बांधकाम कामगार योजनांच्या लाभार्थी (Bandhkam Kamgar Labharthi Yadi) यादी आपण इथे पाहू शकतो, तुम्हाला ज्या योजनेच्या लाभार्थी यादी (Bandhkam Kamgar Labharthi Yadi) पाहायची असेल त्या योजनेवर क्लिक करा.

आपण इथे “विविध योजनांच्या लाभाचे वितरण” पर्यायावर वर क्लिक करून लाभार्थी (Bandhkam Kamgar Labharthi Yadi) यादी आपण पाहूया.

विविध योजनांच्या लाभाचे वितरण या पर्यायावर वर क्लिक केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये लाभार्थ्याचा जिल्हा, लाभार्थ्याचे नाव, लाभार्थ्याचा बँक अकाउंट नंबर किंवा बँक आयएफएससी कोड टाकून “Search” वर क्लिक करा. सर्च केल्या नंतर तुम्ही बांधकाम कामगार लाभार्थी (Bandhkam Kamgar Labharthi Yadi) यादी मध्ये तुमचे नाव चेक करू शकता.

लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर काय करावे?

बांधकाम कामगार लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर सर्व प्रथम नोंदणीची स्थिती जाणून घ्या व त्यानुसार आपला नोंदणी अर्ज अपडेट करा.

नोंदणीची स्थिती जाणून घ्या:

वरील बांधकाम कामगार लाभार्थी (Bandhkam Kamgar Labharthi Yadi) यादी मध्ये आपले नाव नसेल तर आपण आपल्या बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी करायची आहे.

ऑनलाईन नोंदणी करून सुद्धा जर लाभार्थी (Bandhkam Kamgar Labharthi Yadi) यादी मध्ये नाव नसेल तर आपण आपल्या बांधकाम कामगार नोंदणीची प्रथम ऑनलाईन स्थिती जाणून घ्या.

बांधकाम कामगार नोंदणीची स्थिती जाऊन घेण्यासाठी खालील बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन लिंक वर क्लिक करा.

https://iwbms.mahabocw.in/profile-login

बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन लिंक ओपन झाल्यावर आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकून “Proceed to Form” वर क्लिक करा आणि ओटीपी टाकून बांधकाम कामगार नोंदणीची स्थिती आपल्याला दिसेल आपली नोंदणी “Active” आणि अर्ज “Accept ” केला आहे का? कि Pending किंवा NA दाखवत आहे.

सूचना : बांधकाम कामगार लाभार्थी (Bandhkam Kamgar Labharthi Yadi) यादी मध्ये आपले नाव येण्यासाठी आपला अर्ज “Accept” केलेला असावा आणि नोंदणी “Active” असायला हवी.

अशी करा नोंदणी अपडेट:

आपला बांधकाम कामगार नोंदणी अर्ज Accept केला नसेल म्हणजेच Pending दाखवत असेल आणि नोंदणीची स्थिती NA दाखवत असेल तर आपली नोंदणी अद्ययावत म्हणजेच अपडेट करणे गरजेचं आहे.

नोंदणी अद्ययावत म्हणजेच अपडेट करण्यासाठी खालील बांधकाम कामगार अद्ययावत-नोंदणी लिंक वर क्लिक करा.

https://iwbms.mahabocw.in/registration-and-renewal/update-registration

बांधकाम कामगार अद्ययावत-नोंदणी लिंक ओपन झाल्यावर नोंदणीच्या स्थिती मधील Acknowledgedment नंबर घेऊन आपला आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकून “Proceed to Form” वर क्लिक करा.

Proceed to Form” वर क्लिक केल्यानंतर आपल्याला नोंदणी प्रलंबित का आहे? ते कारण दाखवले जाईल, त्यानुसार आपली नोंदणी अपडेट करावी लागेल.

सूचना: नव्याने नोंदणी/नुतणीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजिकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे.

संपर्क: दूरध्वनी क्रमांक : (022) 2657-2631 ई-मेल : info@mahabocw.in

पुढील लेख देखील वाचा!

  1. बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची जाणून घ्या सविस्तर
  2. बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देऊन नोंदणी करणेबाबत शासन नियम
  3. अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी १ लाख रूपये अर्थसहाय्य !
  4. अटल बांधकाम कामगार आवास योजना – ग्रामीण
  5. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना
  6. बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) कसा करायचा जाणून घ्या सविस्तर.
  7. बांधकाम कामगारांनी अमिषाला बळी पडू नये; कामगार मंडळाचे आवाहन !
  8. UMANG पोर्टल वरून असे बनवा ई-श्रम यूएएन कार्ड !
  9. ई-श्रम यूएएन कार्डसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी!
  10. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

15 thoughts on “बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पहा ! लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर काय करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती !

  • Sachin dattatray jadhao

    My form submit

    Reply
  • राष्ट्रपाल कुष्णराव दंदे.

    मला स्मार्ट कार्ड नोंदणी चे ओळख पत्र कधीपर्यंत मिळेल अशी विनंती.

    Reply
  • राष्ट्रपाल कुष्णराव दंदे.

    गरिब कामगार मजूरांना दिवाळी सानुग्रह अनुदान देण्यात यावे, मजुरांची दिवाळी भेट मिळावं अशी विनंती.

    Reply
  • सिध्दार्थ प्रकाश वानखेडे

    सर माझी रीनिवलची तारिक निघून गेली आहे चार वर्षाचा गॅप पडला आहे आता रिनिवल होत नाही मी खूप प्रयत्न केले तरी काय होत नाही आता काय होत नाही मी काय करू मला सगा सर

    Reply
    • राष्ट्रपाल कुष्णराव दंदे

      अजून ही भांडी किट मिळाले नाही तरी कधी प्रयत्न मिळणार आहे लवकर मिळावे अशी विनंती करतो.

      Reply
  • परमेश्वर आनंद जाधव

    माझे कार्ड रिनिवल झाले नाहि का झाले नाही

    Reply
  • Nana shahinath Ahire

    Hi nana ahire sir

    Reply
  • Dinesh Kokate

    Renewal karna hai

    Reply
      • शरद संतोष मिस्तरी

        सर माझी नोद 2018/2019ची आहे माल स्मार्ट कार्ड भेटणार का व आम्हाला फार्मा नुतनीकरण करण्यासाठी येणारे अडचणी स्वल हेणार का

        Reply
  • Jitendra alawa

    कामगार योजना

    Reply
    • संजू उत्तमराव जंजाळ

      मला दिवाळी बोनस आता प्रयत भेटत नाही काय कराव

      Reply
  • VIKAS anil landagle

    माझे कार्ड रीनिवल झाले नाही का

    Reply
  • Navnath durvaji pal

    Sir mazi nondani 2018 madhe zali sir mala te kitab milal renewal karache aahet

    Reply
  • Yogesh kuwar

    Aarogy shibir

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.